शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ

नांदेड- हैद्राबाद या हायवेवर ताजा आणि थेट शेतकरी भाजीपाला विक्रीला बसलेला पाहून ग्राहकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. | Farmers

शेतकऱ्यांनी हायवेवर उभारली स्वत:ची बाजारपेठ
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 11:06 AM

नांदेड: कोरोना काळातील लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार हिरावल्याचे आपण पाहिलं. मात्र नांदेड जिल्ह्यातील वाका इथल्या शेतकऱ्यांनी संकटात संधी निर्माण केल्याचे काम केलंय. वाका गावातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला कोरोना काळात शहरात कवडीमोल दराने विकल्या जात होता. त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांनी आपल्या गावाशेजारी असलेल्या हायवेवर भाजीपाल्याचा बाजार भरवला. (Farmers started own market in Nanded)

नांदेड- हैद्राबाद या हायवेवर ताजा आणि थेट शेतकरी भाजीपाला विक्रीला बसलेला पाहून ग्राहकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे लॉकडाऊन काळात शेतकऱ्यांनी हायवेवर सुरू केलेला बाजार आताही सुरू असून या बाजारात रोज शेकडो ग्राहक खरेदी करतायत. त्यातून गावाच्या शेजारीच शेतमाल विकण्यासाठी शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या या बाजाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ग्रामीण जीवनातला उत्साह परतणार; पुण्यातील लहान यात्रा-जत्रा पुन्हा सुरु होणार

राज्याच्या ग्रामीण भागातील समाजव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या यात्रा आणि जत्रा (Jatra) पुन्हा सुरु होण्याचे संकेत मिळत आहेत. कारण, पुणे जिल्ह्यात प्रशासनाने लहान यात्रा आणि जत्रांना परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. (Yatra and Jatra will start in Pune region)

पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पुणे विभागातील पाचही जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील गावांचे प्रस्ताव येतील तसे छोट्या यात्रांना परवानगी दिली जाणार आहे. स्थानिक महानगरपालिका आणि प्रशासनाने तशी परवानगी द्यावी, अशा सूचना सौरभव राव यांनी दिल्या आहेत.

मोठ्याप्रमाणावर गर्दी होणाऱ्या जत्रा आणि यात्रांसाठी विभागीय कार्यालयाची परवानगी आवश्यक असेल. सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतरच विभागीय कार्यालय यासंदर्भात निर्णय घेईल. मात्र, छोट्या यात्रा व जत्रांना तशा परवानगीची गरज नाही, असे विभागीय कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे गेल्या मार्च महिन्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली होती. त्यामुळे अनेक गावांमधील जत्रा व यात्रा रद्द कराव्या लागल्या होत्या. या उत्सवांच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेत मोठी उलाढाल होते. जत्रांच्या काळात ग्रामीण भागांमध्ये उत्साहाचे वातावरण असते. मात्र, कोरोनामुळे वर्षभर हे सर्व ठप्प होते. मात्र, आता पुणे जिल्ह्यापुरता का होईना ग्रामीण जीवनातील हा उत्साह पुन्हा परतणार आहे.

(Farmers started own market in Nanded)

वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.