ना अट, ना कटकट, केवळ एक अंगठा आणि कर्जमाफी, शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद

कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनी केवळ एका अंगठ्यावर आपली कर्जमाफी झाल्याची भावना व्यक्त केली

ना अट, ना कटकट, केवळ एक अंगठा आणि कर्जमाफी, शेतकऱ्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद
Follow us
| Updated on: Feb 24, 2020 | 5:59 PM

अहमदनगर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने शेतकरी कर्जमाफी योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांनी केवळ एका अंगठ्यावर आपली कर्जमाफी झाल्याची भावना व्यक्त केली (Farmers reaction on loan waiver).

उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याला कर्जमाफीच्या प्रक्रियेत तुम्हाला काही त्रास झाला का? असा विचारला. तेव्हा संबंधित शेतकऱ्याने यावेळीच्या कर्जमाफीच्या प्रक्रियेत कोणताही त्रास झाला नाही. मागील वेळी खूप त्रास सहन करावा लागल्याची प्रतिक्रिया दिली. आज जाहीर झालेल्या कर्जमाफीच्या यादीत अहमदनगर जिल्ह्यातील दोन गावांच्या 972 शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं सर्व कर्ज माफ करण्यात आलं आहे. या कर्जमाफीसाठी कुठलीही गुंतागुंतीची प्रक्रिया नव्हती. केवळ बोटाचा ठसा देऊन कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानं शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं.

अहमदनगर जिल्ह्यामधील जवळपास 2 लाख 58 हजार 787 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी पहिली यादी जिल्हा प्रशासनाच्यावतीने जाहीर करण्यात आली. यामध्ये नगर तालुक्यातील जखणगाव, राहुरीतील ब्राह्मणीचा समावेश आहे. यामध्ये जखणगावचे 116 आणि ब्राह्मणीचे 856 असे एकूण 972 शेतकऱ्यांच्या नावाच समावेश आहे. या शेतकऱ्यांना 2 हजार 286 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे.

Farmers reaction on loan waiver

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.