भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक, शेतकरी आक्रमक

वाढत्या आवकीमुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडलेले पहायला मिळाले. केवळ 3200 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. (Farmers throw stones at Khamgaon market committee buldana due to fall in groundnut prices)

भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक, शेतकरी आक्रमक
भुईमुगाचे भाव पाडल्याने खामगाव बाजार समितीत दगडफेक
Follow us
| Updated on: May 28, 2021 | 6:37 PM

बुलडाणा : खामगाव स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीत काही दिवसांपासून भुईमुगाची आवक वाढली आहे. परिणामी, आज बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडले. भुईमुगाला अत्यल्प भाव मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. शेतकऱ्यांचा संताप इतका विकोपाला गेला की यावेळी तुरळख दगडफेकही झाली. या दगडफेकीत दोन शेतकऱ्यांसह एक पोलिसही जखमी झाला आहे. परिस्थिती आटोक्याबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पोलिसांना पाचारण करण्यात आले. (Farmers throw stones at Khamgaon market committee buldana due to fall in groundnut prices)

भुईमूगाची आवक वाढल्याने दर घसरले

बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती असलेल्या खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात भुईमुगाची आवक वाढली आहे. दरम्यान, वाढत्या आवकीमुळे आज कृषी उत्पन्न बाजार समितीत भुईमुगाचे भाव पडलेले पहायला मिळाले. केवळ 3200 रुपये क्विंटल दराने खरेदी करण्याचा पुकारा झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी विघ्नसंतोषी लोकांनी शेतकऱ्यांच्या जमावाच्या दिशेने दगड भिरकावले. यावेळी प्रतिउत्तरात शेतकऱ्यांनीही दगडफेक केली. त्यामुळे दीपक दसरकर या पोलिसासह उंद्री येथील एक शेतकरी जखमी झाला आहे.

त्याचप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर असलेल्या हॉटेलमधील एक जण किरकोळ जखमी झाला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे निर्दशनास येताच, कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने पोलिसांना पाचारण केले होते. भुईमूगाला योग्य भाव मिळावा हीच मागणी शेतकऱ्यांची असून सुरुवातीला 5 हजाराच्या वर भाव मिळाला आणि नंतर 3 ते साडेतीन हजार भाव व्यापाऱ्यांकडून मिळत होता, त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले.

पोलीस घटनास्थळी पोहचताच धावपळ

कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी आक्रमक झाल्याचे समजताच पोलीस आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी शेतकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पोलिसांच्या गाड्या बाजार समितीत दाखल होताच, शेतकऱ्यांसह अडते आणि उपस्थितांमध्ये धावपळ उडाली. पोलिस कारवाईच्या भीतीने अनेकांनी बाजार समितीतून यावेळी काढता पाय घेतला. बाजार समिती प्रशासकांसोबत चर्चा केल्यानंतर गोंधळ थोडा शांत झाला. याप्रकरणी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले. (Farmers throw stones at Khamgaon market committee buldana due to fall in groundnut prices)

इतर बातम्या

Cyclone Yaas: PM मोदींकडून ओडिशा, बंगाल अन् झारखंडला 1000 कोटींची आर्थिक मदत

Big Investment | अमिताभ बच्चन बनणार सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केले 31 कोटींचे घर!

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.