डोळ्यादेखत मुलगा बुडत होता, बाप धावून आला… गणपती विसर्जनावेळी काय घडलं? पुण्यातील सुन्न करणारी घटना

गुरूवारी अनेक ठिकाणी गौरी-गणपतीचे विसर्जन पार पडले. पुढच्या वर्षी लवकर या , या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र याच दरम्यान पुण्यातीलमावळ येथे अतिशय दुर्दैवी प्रकार घडला. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची धक्कादायक घटना घडली.

डोळ्यादेखत मुलगा बुडत होता, बाप धावून आला... गणपती विसर्जनावेळी काय घडलं? पुण्यातील सुन्न करणारी घटना
Follow us
| Updated on: Sep 13, 2024 | 9:12 AM

गणेशोत्सवाचा आनंदाचा सण सध्या उत्साहात सुरू आहे. काल ( गुरूवार) अनेक ठिकाणी गौरी-गणपतीचे विसर्जन पार पडले. पुढच्या वर्षी लवकर या , या गजरात गणरायाला निरोप देण्यात आला. मात्र याच दरम्यान पुण्यातीलमावळ येथे अतिशय दुर्दैवी प्रकार घडला. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना बाप लेक बुडाल्याची धक्कादायक घटना मावळातील कडधे या गावात घडली. यामुळे एकच गोंधळ माजला. बऱ्या शोधानंतर बुडालेल्या विडलांचा मृतदेह सापडा, पण त्यांच्या मुलाचा मृतदेह अजूनही सापडलेला नसून शोधकार्य सुरू आहे. यामुळे मावळ परिसरात एकच शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संजय आणि हर्षल शिर्के असे वडील-मुलाचे नाव आहे. घरगुती गणपती विसर्जनानिमित्त शिर्के कुटुंब हे घराच्या जवळ असलेल्या माळावर उत्खनन केलेल्या जागेत साचलेल्या पाण्याच्या डबक्याजवळ गेले होते. अचानक मुलगा हर्षल शिर्के हाँ बुडू लागला, ते पाहून त्याचे वडील संजय यांनी मुलाला वाचवण्यासाठी ताबडतोब पाण्यात उडी मारली. मात्र दुर्दैवाने ते दोघेही पाण्यात बुडाले. हे पाहून तेथे एकच गदारोळ माजला. या घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ टीम, कामशेत पोलिस आणि लोणावळ्यातील शिवदुर्ग रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेतली. रेस्क्यू टीमने अथक प्रयत्नांनी शोध मोहीम राबवून वडील संजय शिर्के यांचा मृतदेह शोधून काढला. तर मुलगा हर्षल याचा अद्याप शोध सुरूच आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

गणरायाला घातली सोन्याची चेन, मात्र विर्सजनावेळी काढायलाच विसरले, नंतर 10 तास…

देशभरात गणेशोत्सव उत्साहाने साजरा होत आहे. अनेकांच्या घरी गणराय आला. त्यानंतर विसर्जनही उत्साहात पार पडेल. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… या गजरात भाविकांनी लाडक्या गणपती बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. गणरायाल अनेक जण सोन्या-चांदीचे दागिने घालतात. बंगळुरूतील एका कुटुंबानेही बाप्पाल सोन्याची चेन चढवली. मात्र विसर्जनावेळी ती चेन काढायलाच विसरले. त्यानंतर तब्बल 10 तास ती चेन शोधण्याची मोहीम सुरू होती. अखेर अथक प्रयत्नांनी ती चेन हाती लागली.

रिपोर्टनुसार, बंगळुरूतील विजयनगरमधील दसरहल्ली सर्कलजवळ ही घटना घडली. रमैया आणि उमा देवी या शिक्षक दाम्पत्याच्या घरी गणरायाचे आगमन झाले. त्यांनी फुलांनी आणि दागिन्यांनी गणरायाला सजवले. सुमारे 4 लाख रुपये किमतीची 60 ग्रॅम सोन्याची साखळीही त्यांनी बाप्पाला अर्पण केली होती. नंचर ते विसर्जनसाठी गणरायाची मूर्ती घेऊन मोबाईल टँक जवळ आले. मात्र विसर्जन झाल्यावर त्यांच्या लक्षात आलं की गणरायाला चढवलेली सोन्याची चेन काढायला ते विसरूनच गेले आहेत. मग सुमारे तासाभरानंतर ते पुन्हा विसर्जनस्थळी पोहोचले. विसर्जन स्थळी काही तरुण तेथे उपस्थित होते. त्यांना सांगितल्यावर त्यांनी ती सोन्याची चेन पाहिल्याचे सांगितले, पण त्यांना ती बनावट वाटली होती. तात्काळ या जोडप्याने मगडी रोड पोलीस स्टेशन आणि गोविंदराजनगरच्या आमदार प्रिया कृष्णा यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडे मदत मागितली.

त्यानंतर आमदारांनी टँक बसवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला ही घटना सांगितली. टँकजवळ उपस्थित असलेल्या मुलांनी काही वेळ साखळीचा शोध घेतला मात्र त्यावेळी ती सापडली नाही. मात्र कुटुंबाची परवानगी मिळताच त्यांनी टाकीतून १० हजार लिटर पाणी बाहेर काढले.त्या टँकमध्ये विसर्जनानंतरची गणरायाच्या मूर्तीची माती होती. त्यातूनच शोध घेत अनेक तास हे शोधकार्य चालले. अखेर बऱ्याच काळानंतर ती चेन सापडली आणि ती त्या जोडप्याला परत करण्यात आली.

लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?
'त्या' डॉक्टरमुळे बीड हत्या प्रकरणातील आरोपी सापडले, पुण्यात कसे लपले?.
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब
कामासाठी मराठी मुलं नकारली, कंपनीच्या मालकाला विचारला जाब.
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'
मुंडेंना दिलेल्या इशाऱ्यावर सदावर्तेंचं उत्तर, 'पावशेर पिऊन धमक्या...'.
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....