Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हौसेला मोल नसतं, सुनबाईचं स्वागत करण्यासाठी सासरेबुवांनी केवढा डामडौल केलाय पाहा…

नवरी हेलिकॉप्टरमधून विवाहस्थळी आल्याने आणि शाही विवाह होणार असल्याने संपूर्ण जिल्हाभर या विवाहाची चर्चा होऊ लागली आहे.

हौसेला मोल नसतं, सुनबाईचं स्वागत करण्यासाठी सासरेबुवांनी केवढा डामडौल केलाय पाहा...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 10:04 AM

अनिल केऱ्हाळे, टीव्ही 9 मराठी, अमळनेर : हौसेला मोलं नसतं असं म्हणतात, मग त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी असते. त्यात लग्न ( Wedding )  सोहळा म्हंटलं की विचारायचे कामच नाही. काही ठिकाणी लग्नात रूढी परंपरा यावरून वादविवाद होत असतात. पैशांची किंवा वस्तूंवरुन अडवणूक केली जाते. पण, काही लग्नसोहळे या वादावादीत अडकत नाही. त्याउलट जळगाव मधील ( Jalgaon News )  एक विवाह सोहळा चर्चेचा विषय ठरत आहे. चक्क सासरेबुवांनी नव्या सूनबाईला आणण्यासाठी हेलिकॉप्टर ( Helicopter ) वधूच्या कुटुंबियांना सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे चर्चा तर होणारच.

जळगावच्या अमळनेर येथील सरजू गोकलाणी यांचे सुपुत्र आशीष यांचा विवाह सोहळा आहे. सरजू गोकलाणी हे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक असून आशीष हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे.

आज ( 10 फेब्रुवारी ) ला अमळनेरमध्ये हा विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. आशीषचा विवाह अहमदनगरचे उद्योगपती चंदानी यांची कन्या सिमरन सोबत आहे.

हे सुद्धा वाचा

आशीष आणि सिमरन दोघेही उच्चशिक्षित आहे. आशीष इंजिनियर तर सिमरन ही उच्चशिक्षित असून एका प्रसिद्ध कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत आहे.

आशीष हा गोकलाणी कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने त्याचा शाही विवाह करण्याचे त्याच्या कुटुंबाने ठरविले होते. त्यातच घरात मुलगी नसल्याने घरात येणारी सूनबाई ही सून नसून मुलगी असणार असं त्या कुटुंबाचे मत आहे.

आम्हाला मुलगी असती तर तीचा शाही विवाह केला असतात त्यामुळे घरात येणाऱ्या सूनबाईला सुद्धा तितक्याच आनंदाने आणि मोठ्या दिमाखात आणायचे असं आधीच गोकलाणी कुटुंबाने ठरविले होते.

त्यामुळे सरजू गोकलाणी यांनी वधूच्या कुटुंबाला कुठलीही कल्पना न देता पुण्यावरून अहमदनगर येथे वधूला घेण्यासाठी हेलिकॉप्टर पाठवून सुखद धक्का दिला आहे. त्यामुळे स्वप्नात सुद्धा असा विचार न केला म्हणत नवरीचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.

अहमदनगरहून नवरी आणि तिचे संपूर्ण कुटुंब हे हेलिकॉप्टरमधून अमळनेरमध्ये दाखल झाले असून हा विवाह आज मोठ्या थाटामाटात पार पडणार आहे. सिमरनसह कुटुंबाचे मोठ्या थाटामाटात स्वागतही करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे अमळनेर येथे मंगळगृह मंदिर आहे. त्याच वेळी हेलिकॉप्टरमधून यावेळी तिथे पुष्पवृष्टीही करण्यात आली आहे. त्यानंतर संपूर्ण चंदाणी कुटुंबाचे शाही थाटात स्वागत करण्यात आले.

दरम्यान, आपला लग्नसोहळा शाही थाटात व्हावा असे कुणाला वाटत नाही म्हणत मला हेलिकॉप्टरमधून आणणार असल्याची कल्पना सुद्धा नव्हती, याबाबत मला काहीही सांगितलं गेलं नव्हतं त्यामुळे मोठा आनंद झाल्याचे नवरीनं म्हंटलं आहे.

हेलिकॉप्टरमधून लग्नाच्या ठिकाणी पोहोचेन असा विचार मी स्वप्नात सुद्धा केला नव्हता, त्यात ते माझे सासरे नाहीत तर माझे वडीलच असल्याचेही सिमरनने म्हंटलं आहे. नवरी हेलिकॉप्टरमधून विवाहस्थळी आल्याने आणि शाही विवाह होणार असल्याने संपूर्ण जिल्हाभर या विवाहाची चर्चा होऊ लागली आहे.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.