नाना पटोले यांना होमग्राऊंडवर धक्का, गंभीर आरोप करत पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा

एकीकडे कॉंग्रेस पक्षाचे आज छत्तीसगड येथील रायपुर येथे महाअधिवेशन पार पडत असतांना नाना पटोले यांच्या होमग्राऊंडवरील पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे.

नाना पटोले यांना होमग्राऊंडवर धक्का, गंभीर आरोप करत पदाधिकाऱ्यानं दिला राजीनामा
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 4:43 PM

शाहिद पठाण, टीव्ही 9 मराठी, गोंदिया : महाराष्ट्र राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस ( Congress ) मधील थोरात आणि पटोले ( Thorat Vs Patole ) यांच्यातील वाद चव्हाट्या वर आला होता. या सर्व पार्श्वभूमीवर नाना पटोले यांच्यावर कॉंग्रेस पक्षातील विविध नेत्यांनी गंभीर आरोप करत नाना पटोले यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. ही संपूर्ण परिस्थिती ताजी असतानाच आता नाना पटोले यांच्याच होमग्राऊंड असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील एका पदाधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत रत्नदीप दहीवले यांनी राजीनामा दिला आहे. रत्नदीप दहीवले हे गोंदिया जिल्ह्याचे कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष होते.

एकीकडे कॉंग्रेस पक्षाचे आज छत्तीसगड येथील रायपुर येथे महा अधिवेशन पार पडत आहे. त्या दरम्यान कॉंग्रेस पक्षातील विविध नेते या महाअधिवेशनाला हजेरी लावणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील थोरात पटोले वादावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

नाना पटोले यांच्या कारभारावर कॉंग्रेस मधील अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर नाना पटोले यांच्या कारभाराला कंटाळून अनेकांनी उघड नाराजी व्यक्त केली होती.

हे सुद्धा वाचा

त्यामुळे नाना पटोले यांच्यावर पक्षाकडून काही कारवाई केली जाईल का ? अशी चर्चा असतांना गोंदिया जिल्ह्यातील कॉंग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष असलेल्या रत्नदीप दहिवले यांनी राजीनामा दिला आहे. दहिवले यांनी उघड नाराजी व्यक्त केली असून राजीनामा दिला आहे.

कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काम करु देत नसल्याच्या आरोप करत गोंदिया जिल्हा कांग्रेस कार्याध्यक्षाने राजीनामा दिल्याने राज्यभर चर्चा होऊ लागली आहे. आधीच अडचणीत असलेले नाना पटोले यांच्यावर नाराजी व्यक्त करत नाराजी व्यक्त केल्याने जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

रत्नदिप दहीवले यांनी राजीनामा देत असतांना म्हंटलंय की, विशेष म्हणजे 30 वर्षापासून आपण कांग्रेसशी जोडलो गेलेलो असतांना सुद्धा आज नाना पटोले यांच्या कारभारामुळे राजीनामा देण्याची वेळ आल्याचे दुःख त्यांनी व्यक्त केले आहे.

नाना पटोले यांची कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यापासून दुसऱ्या पक्षातील येणाऱ्या लोकांना मानसन्मान मिळत नाही असं रत्नदिप दहीवले यांनी म्हंटलं आहे. एकूणच नाना पटोले यांच्याबद्दल नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे.

जेव्हा पासून नानां पटोले प्रदेशाध्यक्ष झाले तेव्हा पासून आम्हाला काम करु देत नसल्याचा आरोप दहीवाले यानी केला आहे. त्यामुळे रायपुर येथील अधिवेशनाच्या तोंडावर राजीनामा दिल्याने कॉंग्रेस पक्षात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.