तुम्ही भाजपसोबत गेला तर मी तुमच्यासोबत नाही, काय सांगितला भास्कर जाधव यांनी किस्सा

Bhaskar Jadhav | आपल्यावर अनेक आरोप करण्यात येतात. मंत्रीपद मिळण्यासाठी, गटनेते पदासाठी, काही तरी मिळेल म्हणून भास्कर जाधव लढत नाही. माझ्या पक्षावर, पक्ष प्रमुखावर अन्याय झाला म्हणून लढत आहे. ठाकरे यांची साथ सोडणार नाही, अशा शब्दात भास्कर जाधव यांनी विषय संपवला.

तुम्ही भाजपसोबत गेला तर मी तुमच्यासोबत नाही, काय सांगितला भास्कर जाधव यांनी किस्सा
Follow us
| Updated on: Mar 10, 2024 | 2:17 PM

चिपळूण, रत्नागिरी | 10 March 2024 : माझ्यावर अनेक आरोप करण्यात येत आहे. मंत्रीपद , गटनेते पदासाठी माझा हक्क असतानाही माझ्या पदरात काहीच पडले नाही, अशी नाराजी व्यक्त करतानाच  भास्कर जाधव यांनी  पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नसल्याचा शब्द दिला. त्यांच्यावर आरोपांची राळ उठल्यानंतर भास्कर जाधव यांनी आज आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांचा समाचार घेतला. मी कुठे ही जाणार नाही, विदर्भातील, मराठवाड्यातील लोक मला तुम्ही अखेरचा यौद्धा असल्याचे सांगतात. उद्धव ठाकरे यांचे सरकार पुन्हा महाराष्ट्रात आणायचे आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.  त्यांनी यावेळी मनातील खदखद व्यक्त केली. तर शिंदे गट फुटून गुवाहाटीला गेल्यावर पहिल्या बैठकीतील किस्सा पण सांगितला.

तर भास्कर जाधव तुमच्यासोबत नाही

पक्षात फुट पडली. कोणी सुरत गेले. कोणी गुवाहाटीला गेले. त्यावेळी मला उद्धवसाहेबांचा फोन आला. त्यांनी ताबडतोब मुंबईला बोलवले. रात्री एक ट्रेन उशीरा होती. मुंबईत गेलो. अनेक आमदार तिथे उपस्थित होते. मी शांतपणे बसलो होतो. तुम्हाला अभिमान वाटेल मी पुढचं वाक्य सांगितले की, वाटायला हवा. ज्याला खऱ्या अर्थाने स्वाभिमान काय तो कळतो. निष्ठा काहीतरी कळते. पक्ष प्रेम काय ते कळतं आणि ज्यांना खऱ्या अर्थाने भास्कर जाधव काय तो माहिती आहे त्यांना अभिमान वाटेल. असं पुढचं वाक्य सांगतो, मी तुम्हाला सगळ्यांचा ऐकून घेतलं मी काही बोललो नाही. भाजप आणि घडामोडींविषयी माहिती दिली. त्यावेळी मी म्हणालो, तुम्ही आमचे नेते तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही काय निर्णय घ्यायचा तो घ्या. पण मला असं वाटतं की तुमचा निर्णय घेण्यापूर्वी मला माझी भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे म्हणून मला आता माझी भूमिका स्पष्ट केली पाहिजे ते मी करतो तुम्हाला वाटेल तो सांगतो तुम्हाला आता ती भूमिका स्पष्ट करतो तुम्ही कुठेही जा पण जर भाजपबरोबर गेलात तर भास्कर जाधव तुमच्या बरोबर नाही. अशा शब्दात त्यांनी भावना व्यक्त केल्या.

हे सुद्धा वाचा

माझ्या पक्ष प्रमुखावर अन्याय

माझ्या पक्ष प्रमुखावर अन्याय झाला आहे. पक्षावर अन्याय झाला आहे. मी बोलत राहणार आहे. लढत राहणार आहे. पक्ष प्रमुखांनी मला विदर्भाची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे आरोप करणाऱ्यांना मोठे करायचे नाही. काम करायचे. ज्यावेळी एखादी व्यक्ती तुम्हाला ऐकत नाही. तुमच्या दबावात येत नाही. त्यावेळी तिला बदनाम करण्यात येते, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. ज्या ज्या वेळेला संघर्ष करायची वेळ येते त्या त्या वेळी भास्कर जाधव स्वतः मैदानामध्ये उभा असतो. कधीही आपण मागे राहत नाही. आपल्या कुटुंबीयांना मागे ठेवत नाही माझे भाऊबंद हे सगळे पुढे असतात. कधीही माय पाठीमागे नसतात आणि त्याचे चित्र तुम्ही सर्वांनी बघितलं बघितलं की नाही, असे ते म्हणाले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.