Dahi handi :अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला! सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा

प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. या व्यतीरीक्त दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत देखिील प्राधन्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

Dahi handi :अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला! सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ; मुख्यमंत्र्यांची घोषणा
दहीहंडीसाठी पुणे पोलिसांनी नियमावली केली जाहीर केली, रात्री 10 वाजेपर्यंत जल्लोष करता येणार
Follow us
| Updated on: Aug 18, 2022 | 5:47 PM

मुंबई : अखेर दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी विधानसभेत दहीहंडीचा खेळात समावेश करण्यात आल्याची घोषणा केली आहे. यासंदर्भातील सरकारी आदेश देखील शिंदे-फडवणीस सरकारने काढला आहे. प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. या व्यतीरीक्त दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदाना सरकारी नोकरीत देखिील प्राधन्य दिले जाणार आहे. सरकारी नोकरीमध्ये गोविंदाना 5 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले.

दही हंडी दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडीबाबत आणखी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये(include Dahi Handi in the game) करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Chief Minister Eknath Shinde) यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे दहीहंडीला खेळाचा दर्जा मिळाला आहे. राज्यात प्रो कब्बडी प्रेमाणे प्रो दहीहंडी सुरू केली जाणार आहे. दहीहंडी आता एक दिवस नाही तर 365 दिवस खेळली जाणार आहे.

बुधावरी राज्याच्या क्रिडा विभागाची अत्यंत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती क्रिडा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली होती. आज या संबंधीत जीआर काढत या निर्णयाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्यात निर्णय घेण्यात आला आहे.

दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यासाह यात सहभागी होणाऱ्या गोविंदांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून महत्वपूर्ण निर्णय देखील राज्य सरकारने घेतले आहेत. दहीहंडी उत्सवातील गोविंदांना विमा संरक्षण दिले जाणार आहे. दहीहंडी खेळत असताना एखाद्या गोविंदाचा मृत्यू झाल्यास दहा लाख तर गंभीर जखमी झाल्यास 7:50 लाख रुपये दिले जाणार आहेत. हात पाय जायबंदी झाल्यासा 5 लाखांची मदत केली जाणार आहे.

मृत व जखमी गोविंदांसाठी सरकारकडून सहाय्य

गोविंदा पथकातील खेळाडुचा दहीहंडीच्या थरावरुन पडून मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला 10 लाखांचे आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.  दहीहंडी च्या थरावरुन प्रत्यक्ष पडून दोन्ही डोळे अथवा दोन्ही हात, दोन्ही पाय अथवा कोणतेही महत्त्वाचे दोन अवयव निकामी झाल्यास त्याला सरकारतर्फे 7 लाख 50 हजार रुपये इतके आर्थिक सहाय्य करण्यात येणार आहे. दहीहंडीच्या थरावरुन पडल्याने एक हात किंवा एक पाय किंवा कोणताही एक महत्त्वाचा अवयव निकामी झाल्यास किंवा गंभीर इजा झाल्यास त्याला 5 लाख इतके आर्थिक सहाय्य केले जाणार आहे.

दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरवणार

हा आदेश केवळ  2022 या वर्षीसाठी लागू असणार आहे. दहीहंडी उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा उतरविण्याबाबत स्वतंत्रपणे निर्णय घेण्यात येईल. या संदर्भात विम्याचा प्रिमियम भरण्याची योजना शासन तपासत असून दहीहंडी उत्सव उद्याच असल्याने विमा योजनेच्या बाबतीत कार्यवाही करण्यासाठी कमी कालावधी असल्याने आर्थिक सहाय्य देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

अर्थसहाय्य घेण्यासाठी अटी व शर्ती

दहीहंडीसाठी स्थानिक आवश्यक परवानग्या असणे गरजेचे आहे, न्यायालय, प्रशासन व पोलीस यंत्रणेकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे आयोजक संस्था तसेच गोविंदा पथकांनी पालन करणे आवश्यक आहे, गोविंदांच्या सुरक्षेची सर्व काळजी संस्थांनी घेतलेली असावी, त्याचप्रमाणे पथकातील सदस्यांनी औपचारिक किंवा अनौपचारिक प्रशिक्षण घेतलेले असावे, मानवी मनोरे तयार करण्याव्यतिरिक्त अन्य कारणांमुळे अपघात किंवा दुर्घटना झाल्यास सदर आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, गोविंदांच्याबाबतीत वयोमर्यादेचे पालन करणे बंधनकारक असून 18 वर्षाखालील सहभागी गोविंदांना आर्थिक सहाय्य अनुज्ञेय राहणार नाही, मानवी मनोरे रचताना अपघात झाल्यास गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदतीची कार्यवाही आयोजकांनी स्थानिक प्रशासनाच्या सहाय्याने करणे गरजेचे आहे, मनोरे रचताना झालेल्या अपघाताबाबत आयोजकांनी तात्काळ स्थानिक प्रशासन, पोलीस यंत्रणेकडे तत्काळ अहवाल देणे आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.