मूर्तिजापुरात घरांना आग, लाखोंचं नुकसान; सुदैवानं जीवितहानी नाही | Akola Fire |

| Updated on: Feb 04, 2022 | 1:55 PM

अकोला (Akola) जिल्हातल्या मूर्तिजापूर (Murtizapur) येथील भीम नगरातल्या राजू मोहोड व भरत इंगळे यांच्या घराला लागलेल्या आगी(Fire Incident)त दोन घरे भस्मसात झाली आहेत. यात लाखोंची हानी झाली असली तरी सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही.

अकोला (Akola) जिल्हातल्या मूर्तिजापूर (Murtizapur) येथील भीम नगरातल्या राजू मोहोड व भरत इंगळे यांच्या घराला लागलेल्या आगी(Fire Incident)त दोन घरे भस्मसात झाली आहेत. यात लाखोंची हानी झाली असली तरी सुदैवाने कुठलीही जीवीतहानी झाली नाही. आज सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास भरत इंगळे हे आपल्या घरात झोपले असताना अचानक बाजूच्या घरास आग लागल्याचे समजताच बाहेर पडले व आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग मोठी असल्याने काहीही करता आले नसून ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आग लागल्यानंतर धुराचे लोट मोठ्या प्रमाणात निघत होते. संपूर्ण परिसरात धूर झाला होता. तर आगीच्या या घटनेनंतर परिसरात बघ्यांची गर्दीही झालेली पाहायला मिळाली.

Amruta Fadnavis यांना मानसिक तज्ज्ञांची गरज, Rupali Chakankar यांचा पलटवार
Agricultural Department : … म्हणून वाढले उन्हाळी सोयाबीन अन् सुर्यफूलाचे क्षेत्र, काय आहे कृषी विभागाची भूमिका?