चंद्रपूर : जिल्ह्यातील बल्लारपूर (Ballarpur) तालुक्यातील कळमनामध्ये पेपर मिल लाकूड आगाराला भीषण आग (Fire) लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली. आगीने थोड्याच वेळात रौद्र रूप धारण केले. ही आग इतकी भीषण आहे की, संध्याकाळपासून अग्निशमन दलाच्या (Fire brigade) वतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्यापही आगीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही. अग्निशमन दलाच्या 40 बंबानी 350 हून अधिक फेऱ्या करूनही आग सुरूच आहे. या आगीमध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान झाले असून, 20 एकरावर पसरलेला लाकूड डेपो जळून खक झाला आहे. या घटनेत आतापर्यंत तब्बल 50 कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. दरम्यान आग पसरल्याने डेपो शेजारी असलेल्या पेट्रोल पंपला देखील आग लागली. मात्र पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल नसल्याने हा पंप गेल्या तीन दिवसांपासून बंद होता. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. काल रात्री आग लागलेल्या परिसरात सोसाट्याचा वारा असल्याने देखील आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या.
दरम्यान ही आग रविवारी रात्रीच्या सुमारास लागली. ही आग लाकूड आगाराला लागल्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणे अवघड झाले आहे. काही वेळातच आगीने रौद्र रुप धारण केले. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. काल रात्रीपासून अग्निशमन दलाचे तब्बल 40 बंब आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र रात्रीची वेळ, त्यामध्ये वाऱ्याचा वेग अधिक तसेच पाणीसाठा घटनास्थळापासून दूर असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अडचणी येत होत्या. सकाळी वाऱ्याचा वेग कमी झाल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नाला गती आली आहे. मात्र या घटनेत मोठे नुकसान झाले आहे.
आग काल संध्याकाळच्या सुमारास लागली. अद्यापही या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवता आलेले नाही. या आगीत मोठे नुकसान झाले आहे. सुमारे 20 एकरावर पसरलेला लाकूड डेपो जळून खाक झाला आहे. या घटनेत आतापर्यंत तब्बल 50 कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच डेपोच्या शेजारी असलेल्या पेट्रोल पंपला देखील आग लागली होती. मात्र पेट्रोल नसल्याने हा पेट्रोलपंप गेल्या तीन दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
बल्लारपूर पेपर मिल उद्योगाचे हे लाकूड आगार जिल्ह्यातील सर्वात जुने आणि मोठे आगार आहे. मात्र आगारात अग्निशमन यंत्रणाच उभारण्यात आली नसल्याची चर्चा सुरू आहे. अग्निशमन यंत्रणा उभारताना दाखवलेल्या अक्षम्य हलगर्जीपणामुळे ही आग लागल्याचे समोर येत आहे. या घटनेमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. तसेच काल रात्रीपासून जिल्हा प्रशासनाची धावपळ सुरू आहे. या सर्व प्रकरणात संबंधित उद्योगावर जिल्हा प्रशासन कारवाई करणार का असा प्रश्न आता स्थानिकांमधून उपस्थित करण्यात येत आहे.