जालन्यात प्रत्येक रुग्णालयाचे फायर ऑडिट होणार, ऑडिटसाठी ऑक्सिजन मॅनेजरची नियुक्ती
ऑक्सिजन वापर योग्यरित्या व्हावा यासाठी रुग्णालयातील एका जबाबदार व्यक्तीची ऑक्सिजन मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात यावी. (Jalna fire audit of every hospital)
जालना : कोव्हिड रुग्णांची संख्या वाढली असल्यामुळे सद्यस्थितीत ऑक्सिजनच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच राज्यात काही ठिकाणी रुग्णालयात आकस्मात आगीच्या घटना घडल्या आहेत. यासाठी जिल्ह्यातील सर्व कोव्हिड रुग्णालयांनी ऑक्सिजन आणि फायर ऑडिट करुन घ्यावे. तसेच ऑक्सिजन मॅनेजरची नियुक्त करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांनी दिले आहेत. (fire audit of every hospital and appointment of Oxygen Manager order by jalna Collector Ravindra Binwade)
ऑक्सिजन ऑडीट समिती गठित
जालन्याचे विभागीय आयुक्त यांनी ऑक्सिजनच्या अर्निबध वापर टाळण्यासाठी काही सक्तीच्या सूचना देण्यात आल्या आहे. त्यासाठी अपर जिल्हाधिकारी जालना यांच्या अध्यक्षतेखाली ऑक्सिजन ऑडीट समिती जिल्ह्यात गठीत करण्यात आली आहे. तसेच रुग्णालयाच्या ऑक्सिजन पुरवठ्याच्या स्थितीबाबत उपजिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी यांचे मार्फत तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच याबाबत दैनंदिनी पाठपुरावा व्हावा यासाठी प्रत्येक रुग्णालयामध्ये एक अधिकाऱ्याची नियुक्ती केरण्यात आलेली आहे.
ऑक्सिजन मॅनेजर म्हणून एका व्यक्तीची नियुक्ती
या अधिकाऱ्यामार्फत आपल्या दैनंदिन ऑक्सिजन वापराची अचुक माहिती देणे बंधनकारक आहे. त्यासाठी ऑक्सीजन पुरवठ्याचा अहवाल देण्यात यावा. तसेच आपल्या हॉस्पिटलची ऑक्सिजन गळती तपासण्यासाठी, ज्या वेळेस रुग्ण मास्क वापरत नाही त्या वेळी ऑक्सिजन पुरवठा बंद करण्यासाठी आणि ऑक्सिजन वापर योग्यरित्या व्हावा यासाठी रुग्णालयातील एका जबाबदार व्यक्तीची ऑक्सिजन मॅनेजर म्हणून नियुक्ती करण्यात यावी.
ऑक्सिजन मॅनेजरसाठी सूचना काय?
- ऑक्सिजन मॅनेजर यांनी रुग्णालयातील सर्व ऑक्सिजन पुरवठा तसेच सर्व ऑक्सिजन गळती याबाबत दररोज तपासणी करावी. तसेच ऑक्सीजन योग्यरित्या वापर होईल, याची वेळोवळी पाहणी करावी.
- ऑक्सीजन दैनदिन अचूक वापराची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील नेमून दिलेल्या नोडल अधिकाऱ्याकडे दयावी.
- बऱ्याच वेळेस रुग्ण जेवण, शौचालयाकडे गेल्यानंतर किंवा फोनवर बोलताना मास्क काढून ठेवतो. पण अशावेळी ऑक्सिजन पुरवठा चालूच राहतो. त्यामुळे ऑक्सीजन गळती होऊ शकते, यासाठी प्रत्येक वार्डातील नर्स यांनी सतर्क राहण्यासाठी सूचना दयाव्यात.
- काही रुग्णालयामार्फत अत्यवस्थ रुग्णासाठी HNFC चा वापर केल्याचे दिसून आले आहे. अत्यंत बिकट परिस्थिती HNFC चा वापर करावा
- येत्या काळात टप्याटप्याने HNFC वापर कमी होईल यासाठी प्रयत्न करावे. जेणेकरुन ऑक्सीजन मोठ्या प्रमाणात वापर होणार नाही.
आठ दिवसात फायर ऑडिट पूर्ण करा
दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत जिल्ह्यातील सर्व कोवीड रुग्णालयांची तपासणी करण्यात आली. यावेळी काही रुग्णालयांनी फायर ऑडीट केले नसल्याचे दिसून आले आहे. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आपपल्या रुग्णालयाचे फायर ऑडिट येत्या आठ दिवसात पूर्ण करावे. तसेच त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय आणि मुख्याधिकारी, नगर परिषद जालना यांच्याकडे सादर करावा.
तसेच रुग्णालयातील सर्व कर्मचाऱ्यांना आग प्रतिरोधक यंत्र वापरण्याबाबत प्रशिक्षण देण्यात यावे. मराठवाड्यात वीज पडण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात. त्याबाबत प्रत्येक रुग्णालयाने त्यांच्या इमारतीवर वीज अटकाव यंत्रणा उभी करावी. ही सर्व कार्यवाही करुन आपल्या रुग्णालयाचा अनुपालन अहवाल तात्काळ सादर करावा, असेही यात म्हटले आहे. (fire audit of every hospital and appointment of Oxygen Manager order by jalna Collector Ravindra Binwade)
संबंधित बातम्या :
कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचं शिवसेना खासदार कन्येशी लग्न, गुपचूप लगीन उरकलं!