चार आकड्यांची गोळाबेरीज पालिकेच्या अधिकाऱ्यांना जमत नाही का ? अग्निशमन दलाचे कमर्चारी रस्त्यावर
नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाचा फरक करतांना अन्याय केल्याची भावना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक : नाशिक महानगर पालिकेच्या (NMC) अधिकाऱ्यांना गोळाबेरीज करता येत नाही का ? अशी म्हणण्याची वेळ नाशिकच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांवर आली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार वीस वर्षे पूर्ण झालेल्या अग्निशमन (Firefighters) विभागातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मिळाला नसल्याने अग्निशमन दलाचे कर्मचारी आक्रमक झाले आहे. नाशिकच्या अग्निशमन दलच्या कार्यालयासमोरच काळ्या फिती लावून विविध मागण्यांसाठी आंदोलन केले आहे. या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाचे फरकाचा पहिला हफ्ता योग्य परीगणणा करून ताबडतोब अदा करावा अशी मागणी आंदोलनावेळी करण्यात आली आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सर्व विभागाचा सातव्या वेतन आयोगानुसार फरक काढला आहे, त्यात अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांचा फरक न झाल्याच्या मुद्द्यावरून आंदोलन केले जात आहे.
नाशिक महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाचा फरक करतांना अन्याय केल्याची भावना अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी मागणी करून, निवेदन देऊनही फरक न मिळाल्याने अग्निशमन दलाचे अधिकारी आक्रमक झाले आहे.
आगीशी दोन हात करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फरक देतांना डावल्याने कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात करणार आहात का ? असा सवाल देखील संतप्त कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी हाताला काळ्या फिती लावून निषेध नोंदवत काम बंद करण्याचा इशारा दिला आहे.
सातव्या वेतन आयोगानुसार वीस वर्षे पूर्ण झालेल्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती आश्वासित प्रगती योजनेचा दुसरा लाभ मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
ज्यादा कामाचा मोबदला 7 व्या वेतन आयोजगानुसार सुधारित दराने बेसिक नुसार मिळावा अशी देखील मागणी करण्यात आली आहे.
अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना 7 व्या वेतन आयोगाचे फरकाचा पहिला हफ्ता योग्य परीगणणा करून ताबडतोब अदा करावा, अश्या आदी मागण्यांसाठी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले.