एसटीत पहिली अशोक लेलँडची बस दाखल, दिवाळीपर्यंत इतक्या गाड्यांचा होणार समावेश

एसटी महामंडळाने अलिकडेच अशोक लेलँड कंपनीशी 2430 बसेस खरेदीचा करार केला होता. त्यातील पहिली बस दापोडी येथे दाखल झाली आहे. या बसेस अत्याधुनिक असून लांबपल्ल्याचा प्रवास आरामदायी होणार आहे.

एसटीत पहिली अशोक लेलँडची बस दाखल, दिवाळीपर्यंत इतक्या गाड्यांचा होणार समावेश
Follow us
| Updated on: Oct 20, 2024 | 1:09 PM

एसटी महामंडळात स्वमालकीच्या अशोक लेलँड कंपनीच्या बस दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. पहिली अशोक लेलँडच्या बांधणीची बस दापोडीत दाखल झाली आहे. अशा एकूण 2,430 बसेस महामंडळाला मिळणार आहेत. एसटी दिवाळी सणापर्यंत 300 गाड्या दाखल होण्याची शक्यता आहे.या बसेस आरामदायी आसनांच्या असून त्या स्वमालकीच्या असल्याने महामंडळाचा मोठा फायदा होणार आहे. एसटी महामंडळाने नुकताच अशोक लेलँड कंपनी सोबत बस खरेदीचा करार केलेला आहे.

एसटी महामंडळाकडे पूर्वी 18 हजार बसेसचा ताफा होता. परंतू गेली अनेक वर्षे नवीन बस खरेदी रखडली आहे. त्यामुळे एसटी महामंडळात जुन्या बसेसची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या एसटी महामंडळाकडे 16 हजार बसेस आहेत. नवीन बसेस 2 बाय 2 आसनी असून डिझेलवर धावणाऱ्या आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाला लांबपल्ल्याच्या मार्गावर या बस चालविणे शक्य होणार आहे. एसटी महामंडळाकडे इलेक्ट्रीक बसेस देखील हळूहळू समाविष्ट होत आहेत. तसेच एलएनजीवर धावणाऱ्या बसेस देखील तयार करण्यात येत आहेत.एसटी महामंडळाने साल 2023 रोजी झालेल्या 303 व्या बैठकीत महामंडळाच्या एकूण पाच हजार डिझेल इंधनावर चालणाऱ्या बसेसचे लिक्विफाईड नॅचरल गॅस ( LNG ) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या बसमध्ये रुपांतरण करण्याची योजना आखली आहे.

दापोडीत पहिली बस दाखल

दापोडी कार्यशाळेत एसटीची पहिली अशोक लेलँडने बांधलेली बस आली आहे. या बसेसचे रजिस्ट्रेशन दापोडीतच होणार आहे. या बसेस लांबीला मोठ्या आकाराच्या आहेत. त्यामुळे परिवर्तन बसेस प्रमाणे जादा प्रवाशांना सामावून घेता येणार आहेत. दिवाळीपर्यंत अशोक लेलॅंडच्या 300 गाड्या महामंडळाला मिळतील असे म्हटले जात आहे. या गाड्या महामंडळाच्या स्वमालकीच्या असल्याने एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.एसटी महामंडळ यंदाच्या गणेश चतुर्थीच्या हंगामात प्रथमच फायद्यात आले आहे. ऑगस्ट महिन्यात एसटी महामंडळाला नऊ वर्षांनंतर प्रथमच ऑगस्ट 2024 मध्ये 16 कोटी 86 लाख 61 हजार रुपये फायदा झाला आहे.

Non Stop LIVE Update
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्...
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपीचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, अन्....
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट
मनोज जरांगेंनी घेतली मुस्लीम पर्सनल लॉ बोर्डाच्या प्रवक्त्यांची भेट.
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका
हे षड्यंत्र...राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार? संजय राऊतांची टीका.
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा
औकातीपेक्षा जास्त भेटल्यावर..,ठाकरे गटाच्या नेत्याचा शिरसाटांवर निशाणा.
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?
तिढा सुटला? अमित शाहांनी ठरवला फॉर्म्युला, कोणाच्या वाटेला किती जागा?.
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला
यंदा विधानसभेत शिंदे-ठाकरे-मनसे अशा 3 'सेनां'मध्ये रंगणार मुकाबला.
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन
विधानसभा निवडणुकीला माणूस आमचा अन् निशाण तुमचं? गटबाजीविरोधीत प्लॅन.
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक
भाजपाचे माजी खासदार सुरेश वाघमारे वर्ध्यातून निवडणूक लढविण्यास इच्छुक.
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात
विदर्भात कॉंग्रेस सांगली पॅटर्न राबविणार ?काय म्हणाले बाळासाहेब थोरात.
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु
सावंतवाडी मतदार संघावरुन शिवसेना आणि राष्ट्रवादीत खेचाखेची सुरु.