आधी भुजबळ, नंतर फडणवीस…आता थेट राज्य सरकारलाच इशारा; मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?

40 वर्ष एकमेकांचे विचार न पटणारे एका रात्रीत एकत्र आले. तुम्ही मतभेद सोडून एकत्र का येत नाही? असा सवाल करतानाच आपण या वेळेस झोपलो तर मराठ्यांचे वाटोळे ठरलेलेच आहे. जाता जाता एक शब्द देतो तुम्हाला. आरक्षण दिल्याशिवाय मी एक इंचही मागे हटणार नाही, अशी गर्जनाच मनोज जरांगे पाटील यांनी केली. मराठा आरक्षण रॅलीत त्यांनी ही गर्जना केली. यावेळी त्यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं.

आधी भुजबळ, नंतर फडणवीस...आता थेट राज्य सरकारलाच इशारा; मनोज जरांगे पाटील काय म्हणाले?
मनोज जरांगे
Follow us
| Updated on: Dec 10, 2023 | 8:26 PM

संजय सरोदे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, बीड | 10 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांनी राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. या सभांमधून ते जोरदार हल्ला चढवत आहेत. आधी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर हल्ला करणाऱ्या जरांगे यांनी अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. फडणवीस यांनी काड्या करू नये. मराठा आंदोलनाच्या आड येऊ नये, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आता तर त्यांनी थेट सरकारलाच इशारा दिला आहे. 24 तारखेच्या आत आरक्षण द्या. नाही तर आम्हाला काय करायचं हे आम्हाला माहीत आहे, असा सूचक इशारा देतानाच मी मॅनेज होण्यासाठी हे आंदोलन सुरू केले नाही आणि सरकरमध्येही मला मॅनेज करायचा दम नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

आरक्षणचाी ही लढाई इतक्या टोकावर जाईल असं सरकारलाही वाटलं नसेल. आपला लढा गोरगरीब लोकांनाच लढावा लागणार आहे. 24 डिसेंबरला मराठ्यांना सरसकट आरक्षण मिळणार आहे. राजकीय नेत्यांना महत्त्व देऊ नका. आरक्षण मिळाले की काहीही करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. ज्या समाजाला मायबाप मानलंय ते माझ्यावर कौतुकाची थाप नाही तर कुणावर टाकणार? आरक्षणासाठी माणूस गमवायचा नाही. एकेक जोडायचा आहे. मला मराठा समाजाचा स्वाभिमान आहे. ही जात कोट्यवधीच्या संख्येने एकत्र आली, असंही ते म्हणाले.

आता आमच्या आड येऊ नका

मराठा पेटत नाही आणि पेटला तर विझत नाही. मराठे पुन्हा मागे हटत नाही. अख्खा देश मराठ्यांचं आंदोलन बघतोय. काही जण घरात बसून मराठ्यांची एकी बघतात. आपलं बघून बऱ्याचशा जातींचे लोक एकत्र येत आहेत. तुम्हाला आरक्षण मिळालं. आम्ही विरोध केला नाही. आता आम्हाला विरोध करू नका. काय करायचं हे तुम्हीच ठरवा, असं आवाहन त्यांनी केलं. मराठ्यांकडे होतं त्यावेळी मराठ्यांनी सगळ्यांना दिलं. स्वतःच्या मुलांना दिलं नाही ते इतरांना दिलं, याकडेही त्यांनी लक्ष वेधलं.

काढा त्यांनाही बाहेर

यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावरही टीका केली. छगन भुजबळ यांच्याकडे पोटभर असलं तरीही त्यांना दुसऱ्याच खाण्याची सवय लागली आहे. आता त्यांना म्हातारपणात पचत नाही. तरीही खातच आहे. निकष पूर्ण न करता ओबीसींना आरक्षण दिलं. आम्ही निकष पूर्ण करूनही आम्हाला आरक्षण नाही. तुम्ही आरक्षणचे निकष कोणते ठरवले आहेत ते आम्हाला दाखवा. 1989 ला मंडलने मराठ्यांना आरक्षणातून बाहेर काढले. श्रीमंत म्हणून आरक्षण मधून बाहेर काढले का..? मराठ्याकडे पेट्रोल पंप आहे म्हणून आरक्षण नाही का..? मग छगन भुजबळांकडे पेट्रोल पंप आहे. काढा त्यांनाही आरक्षणातून बाहेर, अशी मागणी त्यांनी केली.

तुमचा डाव उधळून लावणार

आमच्यावर टीका करणारे देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे लोक आहेत. फडणवीस यांचा हा जाणून बुजून डाव दिसत आहे. मराठ्यांनी थोडं सावध राहावं. बारकाईने लक्ष ठेवा. फडणवीस शंभर टक्के मराठ्यांवर गरळ ओकण्याची शक्यता आहे. मराठे आरक्षण आणणारच. फक्त पुढे बघा काय काय होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अशाच काड्या केल्या तर आणखी काय होतेय बघा. देवेंद्र फडणवीस तुमचा डाव आम्ही उधळूनच लावणार आहोत, असा इशाराच त्यांनी दिला.

लोढाफोडा कोण?

यावेळी त्यांनी प्रवींण दरेकर आणि मंगलप्रभात लोढा यांच्यावरही टीका केली. तुम्हाला अनेकदा सांगितलं शांत राहा. तुम्ही टोकत राहिला तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल. हा लोढाफोडा कोण आहे? त्यांना आमच्या भानगडीत पडण्याची गरज नाही. दरेकर ही बोलत आहेत. त्यांच्यामुळे फडणवीस यांची प्रतिमा मलिन होणार आहे. फडणवीस यांनी मराठ्यांच्या नजरेतून पडू नये, असं ते म्हणाले.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.