जाळ्यात मासळीच घावेना; रत्नागिरीतील मच्छीमार हैराण परेशान
समुद्रात निर्यातक्षम मासळी तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे मासळी कमी प्रमाणात जात आहे यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे.
रत्नागिरी : लहरी हवामानाचा फटका मच्छीमारांना देखील बसला आहे. जाळ्यात मासळीच सापडत नसल्याने रत्नागिरीतील मच्छीमार हैराण परेशान झाले आहेत. समुद्रात निर्यातक्षम मासळी तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडे मासळी कमी प्रमाणात जात आहे यामुळे मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे.
एकूण नौकांपैकी 15 ते 20 टक्के मासेमारी नौकांचा रिपोर्ट चांगला आहे. मात्र, इतर ठिकाणी मासेच मिळत नसल्याचे स्थानिक मच्छीकारांडून सांगण्यात आले.
रत्नागिरी जिल्ह्यात 3 हजार मासेमारी नौका आहेत. मासे एक्स्पोर्ट झाले तरच चांगला नफा मिळतो. मात्र, सध्या मासळी कमी झाली आहे. एक्स्पोर्ट होणारे मासेच कमी प्रमाणात मिळत असल्याने मच्छीमार चिंतेत आहेत.
चालु आठवडा मासेमारी व्यावसायिकांना तोट्याचा आहे. दापोलीतील हर्णे बंदर आणि रत्नागिरी बंदराजवळ मासेमारे करणाऱ्या मच्छीमारांना हवामान बदलाचा फटका बसला आहे. या बंदरात पुन्हा मासे गायब झाल्यामुळ मासेमारी व्यवसाय संकटात सापडला आहे.
पावसाळ्यात मासेमारी बंद असते. मात्र, पावसाळा संपल्यावर ही बंदी उठवली जाते. हिवाळ्यातस मोठ्या प्रमाणात मासे मिळतात. हवामान बदलाचा परिणाम माशांच्या प्रजनन क्षमतेवर झाला असून माशांचे उत्पादन घटल्याचा तज्ञांचा अंदाज आहे.