Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु

महाडमध्ये पाच मजली इमारत कोसळली आहे (Mahad Building Collapse).

Mahad Building Collapse | महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली, बचाव पथकाचं काम युद्ध पातळीवर सुरु
Follow us
| Updated on: Aug 25, 2020 | 1:02 AM

रायगड : जिल्ह्यातील महाडमध्ये 5 मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीखाली शेकडो लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे (Mahad Building Collapse). या इमारतीत जवळपास 200 ते 250 रहिवासी राहत असल्याची माहिती आहे.  महाड शहरातील काजळ पुरा परिसरात ही दुर्घटना घडली.

दुर्घटनाग्रस्त इमारत ही अंदाजे 10 वर्षे जुनी असल्याचं सांगितलं जात आहे. या 5 मजली इमारतीत साधारण 50 फ्लॅट होते. यात 200 ते 250 लोक राहत होते. सध्या पोकलेन आणि अन्य साहित्यासह बचावकार्य सुरु आहे. स्थानिकांनी 10-12 लोकांना बाहेर काढलं आहे.

LIVE Updates:

  • पुण्याहून एनडीआरएफची तीन पथके महाडकडे तातडीने रवाना
  • माणगाव,पेण, तळा, पाेलादपूर, पनवेल, रोहा, अलिबाग, खोपोली, मुरुड, सुधागड येथून गॅस कटर्स, ॲम्बुलन्स,जनरेटर, जेसीबी, डंपर, डॉक्टर्स, पोकलेन, पाणी, बिस्किट्स तसेच मदत कार्यासाठी इतर आवश्यक साधन सामग्री मोठ्या प्रमाणावर तात्काळ पाठविण्यात आली आहे.
  • एनडीआरएफच्या पथकांना घटनास्थळी लवकरात लवकर पोहाेचण्यासाठी ग्रीन कॉरिडोरची व्यवस्था
  • मेडिकल कॅम्प साठी नोडल ऑफिसर म्हणून श्रीवर्धन प्रांताधिकारी अमित शेडगे यांची नियुक्ती
  • जखमींना तात्काळ उपचार मिळण्यासाठी माणगावमधील राऊत हॉस्पिटल, निकम हॉस्पिटल, राठोड हॉस्पिटल, बेडेकर हॉस्पिटल, वक्रतुंड हॉस्पिटल, पटेल हॉस्पिटल, माळी हॉस्पिटल, यादव हॉस्पिटल, रानडे हॉस्पिटल, पाटणकर हॉस्पिटल, चव्हाण हॉस्पिटल, कामेरकर हॉस्पिटल तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपजिल्हा रुग्णालय आणि महाड शहरातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, भोसेकर हॉस्पिटल नांदगावकर हॉस्पिटल, म्हामुणकर हॉस्पिटल, डॉ. फैजल देशमुख हॉस्पिटल भूलतज्ञ, आर्थोपेडिक, जनरल सर्जन, बालरोगतज्ञ यांच्यासह सज्ज
  • पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, पनवेल प्रांताधिकारी दत्तात्रय नवले यांच्या समन्वयातून एमजीएम हॉस्पिटल कळंबोली, बेलापूर डी.वाय.पाटील हॉस्पिटल तसेच ज्युपिटर हॉस्पिटल आवश्यकता भासल्यास महाड दुर्घटनेतील जखमींवर उपचार करण्यासाठी सज्ज
  • रोहा प्रांताधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या समन्वयातून जिंदाल स्टील हॉस्पिटल महाड दुर्घटनेतील जखमींच्या उपचारार्थ सज्ज
  • मदतीसाठी रिलायन्स नागोठणे, पोस्को कंपन्याही सरसावल्या पुढे
  • जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांचे महाड जवळील सर्व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना तात्काळ रक्तदानासाठी आवाहन
  • सुधागड तहसिलदार दिलीप रायण्णाजिल्हाधिकाऱ्यांचे तारिक गार्डन इमारतीचे बिल्डर, आर्किटेक्ट आणि कॉन्ट्रॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेशवार यांच्याकडून उद्याच रक्तदान शिबिराचे आयोजन
  • आतापर्यंत आठ जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात आले असून सात जण जखमी तर एकाचा मृत्यू
  • संपूर्ण परिस्थितीवर पालकमंत्री आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांचे संपूर्ण लक्ष, घटनास्थळावरील सर्व यंत्रणांशी समन्वय.
  • मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार पालकमंत्री कु.आदिती तटकरे,खासदार सुनिल तटकरे, आमदार भरत गोगावले तसेच जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या सतत संपर्कात.
  • पावसामुळे दुर्घटनास्थळी मदतकार्यात अडथळा. मात्र मदत व बचाव कार्य गतीने सुरू ठेवण्यास यंत्रणांचे शर्थीचे प्रयत्न
  • जवळजवळ 10 मिनिटे ही इमारत डगमगत असल्याची स्थानिकांची माहिती, यानंतर इमारतीतील अनेकांनी इमारतीतून बाहेर पळून आजुबाजुला आसरा शोधला.
  • आतापर्यंत 16 जणांना वाचवण्यात यश
  • महाड इमारत दुर्घटनेतील बचावकार्य युद्धपातळीवर करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश, अजित पवार यांनी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनाही दूरध्वनी करुन बचाव आणि मदतकार्य युद्धपातळीवर करण्याचे निर्देश, अजित पवार खासदार सुनील तटकरे आणि स्थानिक आमदार भरत गोगावले यांच्या संपर्कात
  • महाड विभागातील सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी, इमारतीचा मलबा काढण्याचं काम सुरु, माणगाव विभाग, श्रीवर्धन विभाग येथून अतिरिक्त कुमक बोलावली.
  • महाराष्ट्रातील रायगड येथील इमारत दुर्घटना अत्यंत दुःखद आहे. मी एनडीआरएफच्या महासंचालकांशी बोललो आहे. त्यांना रायगडमध्ये सर्व सहकार्य करण्याच्या सूचना केल्या आहेत. ते मदतकार्याचा समन्वय साधतील. प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना : अमित शाह
  • मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी महाड इमारत दुर्घटनेची माहिती घेतली, आमदार भरत गोगावले आणि जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यासोबत चर्चा, जलदगतीने बचावकार्य आणि मदतकार्यासाठी शासनातर्फे सर्वोतपरी सहकार्य करण्याचं आश्वासन
  • माणगावहून 25 कामगार, एक गॅस कटर, एक गनसेट, 2 जेसीबी, 2 डंपर, 3 रुग्णवाहिका महाडमधील दुर्घटनास्थळाकडे रवाना
  • आतापर्यंत 15 लोकांना इमारतीखालून बाहेर काढण्यात यश, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं
  • महाड दुर्घटनेनंतर तळेगाव दाभाडे येथून एनडीआरएफच्या 3 टीम घटनास्थळी रवाना, स्थानिक प्रशासनाशी चर्चा करुन नेमकी परिस्थिती लक्षात आल्यावर अधिक टीम घटनास्थळाकडे निघणार

200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती

महाड शहरात काजळपुरा परिसरात पाच मजली इमारत कोसळली आहे. या इमारतीच्या मलब्याखाली जवळपास 200 ते 250 रहिवासी अडकल्याची भीती आहे. जेसीबीच्या मदतीने मलबा हटवण्याचे काम सुरु आहे. बचाव पथक आणि इतर यंत्रणा घटनास्थळी पोहचत आहे. आतापर्यंत 8 ते 10 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. ही घटना अत्यंत भयावह आहे. या इमारतीत जवळपास 47 ते 50 फ्लॅट्स आहेत. त्यामुळे 200 ते 250 नागरिक अडल्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार माणिकराव जगताप यांनी दिली.

इमारत कोसळल्यामुळे मोठा ढिग निर्माण झाला आहे. हा ढिग बाजूला करुन नागरिकांना वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. स्थानिकांनी तातडीने जेसीबी लावून ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे. हा ढिगारा उपसायला जवळपास दीड ते दोन दिवस लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंरच खरी परिस्थिती कळेल. दरम्यान, इमारतीतील एकाही व्यक्तीसोबत अद्याप संपर्क होऊ शकलेला नाही.

आज संध्याकाळी सव्वासहा वाजेच्या सुमारास ही इमारत कोसळली. या इमारतीचं नाव ‘तारिख गार्डन’ असं होतं. या इमारतीचं बांधकाम निकृष्ठ दर्जाचं होतं, असा आरोप स्थानिकांनी केला आहे. सध्या पोलीस, अग्नीशमन दलाचे जवान आणि बचाव पथक यांच्याकडून ढिगारा उपसायचे काम सुरु आहे. लाईटचीदेखील व्यवस्था करण्यात येत आहे, जेणेकरुन रात्रीच्या वेळी देखील ढिगारा उपसायचे काम सुरु राहिल.

नेमकं काय घडलं?

महाड परिसरात काजळ परिसरात ही इमारत होती. तारीक गार्डन असं या इमारतीच नावं आहे. महाड शहरातील ही 5 मजली इमारत संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास कोसळली. ही सुमारे 10 वर्षे जुनी इमारत आहे. या इमारतीत जवळपास 50 कुटुंब आहेत. यापैकी 200 लोक ढिकाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती, शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी टीव्ही 9 मराठीला दिली.

आतापर्यंत दहा बारा लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे. जे लोक जखमी आहेत त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

ढिगारा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता

तब्बल पाच मजली इमारत पत्त्यासारखी कोसळली. इमारतीचा पाया खचल्यामुळे ती आहे तशीच खाली बसली. एखादी इमारत तयारी करुन पाडली जाते, अगदी तसंच वाटावं अशी ही इमारत जागच्या जागी खाली बसली. इमारतीचा राडारोडा उपसण्यासाठी दोन दिवस लागण्याची शक्यता आहे. स्थानिकांनी हा ढिगारा उपसण्याचं काम सुरु केलं आहे. आता एनडीआरएफचं पथकही घटनास्थळी दाखल होत आहे.

संबंधित बातम्या :

मुंबईत मुसळधार पावसाने इमारतीचे 2 मजले कोसळले, घरांतील माणसं धावतपळत बाहेर

नाशिकमधील धोकादायक वाड्यांचा प्रश्न ऐरणीवर, 1 हजार 32 जुन्या वाड्यांना नोटीस

Bhanushali Building collapse | दुर्लक्ष नाही, पण लोकांना घरातून खेचून बाहेर काढू शकत नाही : महापौर

संबंधित व्हिडीओ :

Mahad Building Collapse

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.