Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, 19 मार्ग पुर्णपणे बंद
गडचिरोली जिल्ह्यातील 12 मोठे मार्ग व 7 छोटे मार्ग असे एकूण 19 मार्ग पुरामुळे बंद आहेत. तिसर्यांदा गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवेल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गडचिरोली : गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अनेक भागात गंभीरपुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गोसीखुर्द धरणाचे (Gosikhurd Dam) 33 दरवाजे सोडल्यामुळे वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या चार नदींनी धोक्याची पातळी गाठली आहे. भामरागड सिरोंचा एटापल्ली मुलचेरा चामोर्शी देसाईगंज या तालुक्यातील संपर्क जिल्हा मुख्यालयाचे पूर्णपणे तुटलेला आहे. भामरागड (Bhamragad) तालुक्यातील जवळपास दीडशे घरे पाण्याखाली गेल्याने तिथून 193 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने केले आहे. त्यामुळे सध्यातरी धोका टळला आहे.
19 मार्ग पुरामुळे बंद आहेत
गडचिरोली जिल्ह्यातील 12 मोठे मार्ग व 7 छोटे मार्ग असे एकूण 19 मार्ग पुरामुळे बंद आहेत. तिसर्यांदा गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवेल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरे पाण्याखाली आहेत. त्याचबरोबर पीक देणारे सुपीक जमीन पुराच्या पाण्याखाली गेले. यावर्षी मोठा फटका पुराच्या गडचिरोली जिल्ह्याला बसला असून शेतकऱ्यांचे यात खूप मोठे नुकसान झाले आहे.
जाणून घ्या कोणते मार्ग बंद आहेत
- देवलमारी रस्ता
- लाहेरी ते बिनागुंडा (गुंडेनुर नाला)
- आलापल्ली ताडगाव भामरागड रस्ता (पर्लकोटा नदी, चंद्रा नाला, पेरमिली नाला, कुमरगुडा नाला)
- गडचिरोली-आरमोरी रस्ता (पाल नदी गोगाव जवळ)
- गडचिरोली-चामोर्शी रस्ता (शिवनी नाला)
- आष्टी आलापल्ली रस्ता (दिना नदी)
- निझमाबाद सिरोंचा जगदलपूर रस्ता (सोमनपल्ली नाला)
- आष्टी गोंडपिपरी रस्ता (वैनगंगा नदी)
- अहेरी बेजुरपल्ली परसेवाडा लंकाचेन रस्ता (लंकाचेन नाला)
- अहेरी मोयाबीनपेठा वटरा रस्ता (वटरा नाला)
- अहेरी गडअहेरी देवलमारी रस्ता (गडअहेरी नाला)
- भेंडाळा गणपूर बोरी अनखोडा रस्ता (अनखोडा नाला)
- वडसा वळण मार्ग (वैनगंगा नदीच्या बॅकवाटर मुळे)
- आरमोरी ब्रम्हपूरी रस्ता (वैनगंगा नदी)
- खरपुंडी दिभना बोदली रस्ता (लोकल नाला)
- हरणघाट चामोर्शी रस्ता (दहेगांव नाला, दोटकुली नाला)
- चामोर्शी शंकरपूर हेटी मार्कंडादेव फराडा मोहोली रामाळा घारगांव दोडकुली हरणघाट रस्ता (मार्कंडादेव जवळील नाला)
- तळोधी आमगांव भाडभिडी रेगडी देवदा रस्ता (हिवरगांव नाला)