Rajendra Shingne Corona Positive | अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह

अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Rajendra Shingane Corona Positive)

Rajendra Shingne Corona Positive | अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे कोरोना पॉझिटिव्ह
राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री
Follow us
| Updated on: Feb 16, 2021 | 6:46 PM

मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingne) यांना कोरोनाची (Corona) लागण झाली आहे. मंत्री शिंगणे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं राजेंद्र शिंगणे म्हणाले आहेत. त्यांनी कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विटद्वारे दिली आहे.  (Food and Drugs Administration Minister Rajendra Shingne tested corona Positive)

राजेंद्र शिंगणे काय म्हणाले?

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.

राजेंद्र शिंगणेंचे ट्विट

राजेंद्र शिंगणे सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विदर्भातील प्रमुख नेत्यांपैकी ते आहेत. दरम्यान, महाविकासआघाडी सरकारमध्ये राजेंद्र शिंगणे यांनी पाचव्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली.

गृहराज्यमंत्री सतेज पाटील कोरोना बाधित

काँग्रेस नेते आणि गृहराज्यमंत्री सतेज पाटील (Satej Patil)यांना 9 फेब्रुवारीला कोरोनाची (Corona) लागण झाली होती. सतेज पाटील यांनी त्याबाबत ट्विट करुन माहिती दिली. कोरोनावर मात करुन लवकरच आपल्या सेवेसाठी हजर होईन, असं सतेज पाटील म्हणाले आहेत.

गृहमंत्री अनिल देशमुख कोरोनामुक्त

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाल्याचं 2 फेब्रुवारीला समोर आलं होतं. गृहमंत्र्यांनी स्वत: ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. अनिल देशमुख कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

संबंधित बातम्या:

मोठी बातमी : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण

गृहमंत्र्यांनंतर गृहराज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, सतेज पाटील कोरोनाबाधित

(Food and Drugs Administration Minister Rajendra Shingne tested corona Positive)

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.