महाराष्ट्रात 25 ठिकाणी धाडी, 1.50 कोटींचे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स जप्त, प्रशासनाची धडक कारवाई

अन्न व औषध प्रशासन विभागाने बनावट मास्क आणि सॅनिटायझर्सची विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई सुरु केली आहे (FDD action against Duplicate Mask and Sanitizer).

महाराष्ट्रात 25 ठिकाणी धाडी, 1.50 कोटींचे बनावट मास्क आणि सॅनिटायझर्स जप्त, प्रशासनाची धडक कारवाई
Follow us
| Updated on: Mar 20, 2020 | 9:42 PM

मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उपयोगात येणाऱ्या बनावट मास्क आणि सॅनिटायझर्सची विक्री सुरु आहे. अनेक ठिकाणी विनापरवाना विक्रीही होत आहे. त्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे (FDD action against Duplicate Mask and Sanitizer). आतापर्यंत राज्यातील विविध भागात 25 धाडी टाकून सुमारे दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,  अशी माहिती अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिली आहे.

मास्क आणि सॅनिटायजर्सच्या तपासणी व शोध कार्यात अमरावती, औरंगाबाद, बृहन्‍मंबुई, कोकण विभाग, नाशिक नागपूर,  पुणे विभाग, गुप्तवार्ता मुख्य व इतर विभाग यांच्यामार्फत या कारवाई  करण्यात आल्या. आतापर्यंत 2 हजार 604 ठिकाणी  तपासणी करण्यात आली.  यात  विनापरवाना उत्पादित सॅनिटायजर्स, मुदतबाह्य सॅनिटायजरवर नवीन मुदतीचं लेबल चिटकवून विक्री करण्यात आल्याचे प्रकार समोर आले. त्याचप्रमाणे अवैधरित्या वस्तूंचं उत्पादन आणि खरेदी बिलं सादर न करता मालाची विक्री असेही प्रकार समोर आले. या प्रकारांची अनियमितता लक्षात आल्यानंतर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

आतापर्यंत राज्यभरात अन्न आणि औषध प्रशासनाने पोलिसांच्या मदतीने 25 धाडी टाकल्या.  यात अंदाजे 1 कोटी 47 लाख 54 हजार 559 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याच बरोबर कोरोना आजार दूर करणारे आयुर्वेदिक औषधे आणि कोरोना प्रतिबंधक गाद्या या प्रकारच्या  खोट्या जाहिराती करणारे, विक्री करणारे आणि या प्रक्रियेत सहभागी असणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

कोरोना विषाणुच्या प्रतिबंधक उपाय योजनांच्या  पार्श्वभूमीवर अन्न व औषध विभागाला सतर्क राहून कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासंदर्भात नुकतीच सर्व औषध विक्रेत्यांसोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत ग्राहकांना सॅनिटायजर्स आणि मास्क योग्य त्या किमतीत उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात सर्व दुकानांवर मास्क आणि सॅनिटायझर उपलब्ध होतील. नागरिकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपल्या तसेच आपल्या आजुबाजूच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहनही डॉ. शिंगणे यांनी केलं आहे.

संबंधित बातम्या:

कोरोनाचा प्रादुर्भाव तिसऱ्या टप्प्यात पोहोचू नये, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पंतप्रधान मोदींना विनंती

पुण्यात तीन दिवस व्यापार बंद, मात्र किराणा, दूध, औषधे, भाजीपाला सुरु राहणार

7000 मृत्यू, अमेरिकेत संचारबंदी, फ्रान्स लॉकडाऊन, कोरोनासमोर महाशक्तिशाली देशही हतबल

CoronaVirus: अमेरिकेत कोरोनावरील पहिल्या लसीची चाचणी, लवकरच बाजारात उपलब्ध होणार

FDD action against Duplicate Mask and Sanitizer

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.