कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या

दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसला (APMC Market food rate decrease) आहे.

कोबी तीन रुपये किलो, टोमॅटो दहा रुपयांखाली, नवी मुंबई APMC मार्केटमध्ये भाज्यांच्या किमती गडगडल्या
Follow us
| Updated on: Aug 07, 2020 | 10:28 AM

नवी मुंबई : दोन दिवस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबईसह नवी मुंबईलाही बसला (APMC Market food rate decrease) आहे. त्यासोबतच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटलाही याचा मोठा फटका बसल्याचे दिसत आहे. पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक बाजारात भाजीपाल्यांच्या दरात 70 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्यामुळे भाज्या आता स्वस्त झाल्या आहेत. तर बाजारात 50 टक्के माल अजूनही शिल्लक राहिला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे (APMC Market food rate decrease).

दोन दिवसात कोबीचा भाव 3 रुपये किलो, टोमॅटो 5 ते 10 रुपये किलो, पडवळ 8 रुपये किलो, भेंडी 10 रुपये किलो, फरसबी 12 रुपये किलो, वांगी 5 रुपये किलो, दुधी 7 रुपये किलो या किमती सध्या बाजारात विक्रीसाठी चालू आहेत.

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक 275 गाड्यांची आहे. तसेच दरही 60 ते 70 टक्क्यांनी उतरले आहेत. साधारणपणे लॉकडाऊन काळात बाजारात 300 गाड्यांची आवक असतात. आज एपीएमसी भाजीपाला मार्केटमध्ये 275 गाड्याची आवक झाली असून बाजारात मोठ्या प्रमाणात भावात घसरण झाली आहे. त्यामुळे 15 दिवसांपासून महागड्या भाज्या खरेदी करणाऱ्यांना आता दिलासा मिळत आहे.

“या दोन दिवसात आमचं खूप पटीने नुकसान झालं आहे. जवळजवळ 50% माल तसाच शिल्लक राहिला आहे. या वादळीपावसामुळे कोणी मार्केटमध्ये खरेदी करायला आलं नाही आणि बाजारामध्ये 70% घसरण झाली आहे. 30% माल असाच ठेवून कुजून जात आहे, त्यामुळे माल फेकावा लागत आहे. या पावसामुळे एपीएमसी भाजीपाला घाऊक मार्केटमध्ये देखील खूप नुकसान झालं आहे. ग्राहक नसल्या कारणाने माल ठेवून ठेवून खराब होऊन फेकायला लागत आहे”, असं व्यापारी रविंद्र जाधव यांनी सांगितले.

घाऊक बाजारातील किलोचे दर रुपयांत

लाल भोपळा 5 ते 7

भेंडी नं. 1- 15 ते 18

भेंडी नं. 2- 10 ते 12

फ्लॉवर 5 ते 8

कोबी 3 ते 5

दुधी भोपळा 7 ते 9

टोमॅटो 5 ते 10

वांगी 5 ते 7

तोंडली 8 ते 10

पडवळ 8 ते 10

ढोबळी मिरची 10 ते 15

कारली 8 ते 10

संबंधित बातम्या : 

नवी मुंबईत चार महिन्यांनी मॉल सुरु, एका दिवसात बंद

Navi Mumbai Rain | नवी मुंबईत मुसळधार पाऊस, रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक कोंडी

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.