Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसच्या टिळकभवनामध्ये दोन नाना आहेत, एकाने माझ्याकडे ४ कोटी मागितले, कोणी केला धक्कादायक आरोप ?

महाविकास आघाडीला महाराष्ट्र विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणूकीत पन्नाशी देखील पार करता आली नव्हती. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मोठ्या पराभवानंतर आता काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना गटातून सत्ताधारी पक्षात जाण्यासाठी तिकीट न मिळालेली मंडळींची रांग लागली आहे.

काँग्रेसच्या टिळकभवनामध्ये दोन नाना आहेत, एकाने माझ्याकडे ४ कोटी मागितले, कोणी केला धक्कादायक आरोप ?
Follow us
| Updated on: Feb 01, 2025 | 4:06 PM

विधानसभा निवडणूकांनंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाला मोठी गळती लागली आहे. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षाचे नवीमुंबई ऐरोलीतील नेते काँग्रेस नेतृत्वाला दुगाण्या झाडत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करीत आहेत. आता या नेत्याने जाता जाता काँग्रेसवर मोठी तोफ डागली आहे. काँग्रेस भवन मध्ये दोन नाना आहेत. त्यापैकी एक नानाने माझ्याकडून चार कोटी रुपयांची लाच मागितली आणि तिकीट देतो म्हणाला या नाना कोण हे तुम्हीच शोधून काढा असा सल्ला त्यांनी प्रसारमाध्यमांना दिला आहे.

नवी मुंबईतील काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांना महाराष्ट्रातील काँग्रेस नेतृत्वावर दुगाण्या झाडल्या आहेत. नवीमुंबईत काँग्रेसला तिकीट मिळू नये म्हणून महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी भाजपाशी साठगाठ बांधली होती असा धक्कादायक आरोप रमाकांत म्हात्रे यांनी केला आहे. काँग्रेस भवनमध्ये दोन नाना आहेत.त्यापैकी एका नानाने आपल्याकडे तिकीटांसाठी चार कोटीची मागणी केली होती. काँग्रेस टिळक भवनातील काम करणाऱ्या व्यक्तीने मला सल्ला दिला की एक रुपयाही देऊ नका ? तुम्ही पक्षातील जुने नेते आहात असेही म्हात्रे यांनी म्हटले आहे.

सनसनाटी आरोप

काँग्रेसचे माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे यांनी काँग्रेसपक्षावर गंभीर आरोप करताना म्हटलेय की मला काँग्रेसपक्षाने भरभरून दिलं आहे.काँग्रेसभवनमध्ये 2 नाना आहेत त्यापैकी एकाने विधानसभा निवडणुकीच्यावेळी माझ्याकडे 4 कोटीची मागणी केली होती. टिळक भवनामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीने मला सांगितले की तुम्ही 1 रुपया ही देऊ नका तुम्ही एकनिष्ठ आहात.त्यानंतर आपण नागपूरला गेलो असता मला काही वेगळीच माहिती मिळाली. नवी मुंबईत काँग्रेसला एकही तिकीट मिळू नये यासाठी नवी मुंबईतील एका भाजपच्या नेत्याने काँग्रेसला 2 ते 3 कोटी रुपये दिले होते. म्हणून पक्षाच्या वाट्याला एकही जागा आली नाही असा सनसनाटी आरोप रमांकात म्हात्रे यांनी केला आहे.

हे सुद्धा वाचा

ऐरोलीमध्ये पक्ष प्रवेश होणार

नवी मुंबईच्या जिल्हाध्यक्ष पदाला स्टे दिला आहे. त्यामुळे आता नाना कोण ते तुम्ही शोधा मी काहीही बोलणार नाही असाही दावा रमाकांत म्हात्रे यांनी केला आहे. आपल्याला काँग्रेसच्या काही नेत्यांचे फोन आले होते. पैसे मागितल्याबद्दल तक्रार करण्यासाठी आपण बाळासाहेब थोरात, आणि विजय वडेट्टीवार यांना 15 दिवसांपूर्वी फोन देखील केले होते, पण त्यांनी फोन उचलले नाहीत.एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याला 8 तारखेची वेळ दिलेली आहे आणि त्यावेळी माझ्यासोबत 4 माजी नगरसेवक आणि युवक काँग्रेसचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहोत. मोठा पक्षप्रवेश झाला पाहिजे अशी शिंदे साहेबांची इच्छा आहे. शिंदे साहेब आणि मी एकमेकांना खुप वर्षांपासून ओळखतो.हा पक्षप्रवेश नवी मुबंईत ऐरोलीमध्ये पार पडणार असल्याचे रमाकांत म्हात्रे यांनी म्हटले आहे.

मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?
मुंडेंच्या जागी बीडच्या आमदाराला मंत्रिपद?मराठा आमदाराची लागणार वर्णी?.
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?
विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणुका; कोणाच्या गळ्यात पडणार माळ?.
नीलम गोऱ्हेंविरोधात 'मविआ'कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद जाणार?
नीलम गोऱ्हेंविरोधात 'मविआ'कडून अविश्वास प्रस्ताव, उपसभापतीपद जाणार?.
स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा कारनामा, पोलिसांचा ड्रेस घालायचा अन्...
स्वारगेट अत्याचारातील नराधमाचा कारनामा, पोलिसांचा ड्रेस घालायचा अन्....
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती
जालना मारहाण घटनेत आरोपीवर गुन्हा दाखल, पंकजा मुंडेंची माहिती.
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण
बीडमध्ये गुंडाराज! कुख्यात गुंडाची गरीबाला अमानुषपणे मारहाण.
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य
संतोष देशमुख हत्येचे विदारक फोटो पाहून तरुणाचं धक्कादायक कृत्य.
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप
सळईने चटके देणारा हैवान जरांगे पाटलांसोबत? फोटो दाखवत भुजबळांचे आरोप.
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्
VIDEO : ठाकरे-बावनकुळेंचा लिफ्टमधून एकत्र प्रवास; आधी हस्तांदोलन अन्.
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO
विधानभवनात गुलाबराव पाटलांनी आदित्य ठाकरेंना रोखून पाहिलं, बघा VIDEO.