सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये राहून मदत?; हर्षवर्धन पाटलांचा पार्टी बदलताच गौप्यस्फोट

हर्षवर्धन पाटील अखेर शरद पवार गटात सामील झाले आहेत. आज झालेल्या जाहीरसभेत शरद पवार यांच्या उपस्थितीत पाटील यांनी प्रवेश केला. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले. आपण भाजप सोडू नये म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रस्ताव दिले होते, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे.

सुप्रिया सुळेंना लोकसभा निवडणुकीत भाजपमध्ये राहून मदत?; हर्षवर्धन पाटलांचा पार्टी बदलताच गौप्यस्फोट
हर्षवर्धन पाटील शरद पवार गटात सामील झाले आहेत.
Follow us
| Updated on: Oct 07, 2024 | 1:57 PM

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी अखेर भाजपला सोडचिठ्ठी देऊन शरद पवार गटात प्रवेश केला आहे. पार्टी बदलताच हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुप्रिया सुळे आमच्या भगिनी आहेत. तुम्ही चार वेळा खासदार झाल्या. तीन वेळा आमचा प्रत्यक्ष सहभाग होता. मात्र चौथ्यावेळी आमचा अदृश्य सहभाग होता, असा गौप्यस्फोट हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. भाजपमध्ये राहून सुप्रिया सुळे यांना मदत केल्याचं हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन पाटील यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी त्यांनी सभेला संबोधित करताना हा गौप्यस्फोट केला. आपण कधीच व्यक्तिगत निर्णय घेत नाही. कार्यकर्त्यांनी आग्रह धरला. तुम्ही हातात तुतारी घ्या असा आग्रह शरद पवार यांचा होता. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून निर्णय घेतला. शरद पवार यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला. काही पदरात पाडून घेण्यासाठी नाही, 10 वर्षात कुठल्याच संवैधावनिक पदावर नव्हतो. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. जी जबाबदारी टाका ती टाका, दिलेली जबाबदारी पार पडणार आहे. लोकशाहीमध्ये पक्षापेक्षा जनता महत्वाची आहे, मी जनतेचं ऐकलं, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

फडणवीसांनी पर्याय दिले

पक्ष सोडण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी दोन तास चर्चा झाली. फडणवीस यांनी काही पर्याय ठेवले. हे देतो, ते देतो म्हणाले. मात्र जनता त्याच्या पलिकडे गेलीय. 10 वर्षात या मतदारसंघात खूप अन्याय झाला, कार्यकर्त्यांना त्रास झाला. म्हणूनच मी हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय, असं हर्षवर्धन पाटील म्हणाले.

साहेबच बिग बॉस

कुठलंही काम टक्केवारी दिल्याशिवाय होत नाही. मलिदा गँग हा शब्द रोहित पवारांनी दिला आहे. लोकांमध्ये या सरकार विरोधात चीड आहे. इंदपुरची जनता परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही, असं सांगतानाच काल बिग बॉसचा निर्णय झाला, बारामतीचा बिग बॉस झाला. साहेब आपण बिग बॉस आहातच, असं पाटील यांनी म्हणताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

आमचं दुखणं वेगळं होतं

मी बारामतीचा जावई आहे. सुप्रिया ताई आपली आता जास्त जबाबदारी आहे. साहेबांना आता जास्त त्रास द्यायचा नाही. आपण आता जिल्हा बघायचा, विकासाचे नवे पर्व आणायचे आहे. तुमच्या लोकांनी मला सांभाळून घेतली पाहिजे, माझा काही त्रास होणार नाही. आमचं दुखणं वेगळं होतं, ते आता बाजूला गेलं, असं म्हणत पाटील यांनी अजित पवारांना नाव घेता टोला लगावला.

ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले..
ठाकरे सेनेला धक्का, किरण सामंत यांना तिकीट मिळणार? उदय सामंत म्हणाले...
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
साहित्यिकांमधील धमक कमी झालीय; राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा
बुजुर्ग म्हणावं तेच त्यांच्या नादी... राज ठाकरेंचा शरद पवारांवर निशाणा.
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'
'राज्याची सर्कस झालीये, कोणाच्या मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या तर...'.
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'
रावसाहेब दानवेंची सत्तारांवर टीका, 'बायका आमच्या अन् साड्या त्याच्या?'.
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'
सुप्रिया सुळेंकडून कौतुक; 'सूरज आम्हाला तुझा अभिमान, हृदयात जागा...'.
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा 'प्रहार', बच्चू कडूंना मोठा धक्का.
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?
'लाडक्या बहिणींना डायरेक्ट माल...', गुलाबराव पाटील नेमंक काय म्हणाले?.
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?
महाराष्ट्रात राजकीय भूकंप? नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य, रोख दादांकडेच?.
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.