“तिन्ही पक्ष एकत्र आले तर,भाजपची जागा…” ठाकरे गटाच्या नेत्यानं थेट सत्ताधाऱ्यांना दिला इशारा दिला

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागताच आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होताच ठाकरे गटासह मित्र पक्षांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

तिन्ही पक्ष एकत्र आले तर,भाजपची जागा... ठाकरे गटाच्या नेत्यानं थेट सत्ताधाऱ्यांना दिला इशारा दिला
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 7:10 PM

अहमदनगर : कसबा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता येणाऱ्या निवडणुकांवर आपला विश्वास व्यक्त केला आहे. कसबा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीने वेगळा राजकीय प्रयोग केल्यामुळे त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या नेत्याने विजय प्राप्त केल्याचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले तर जिथे तीस ते चाळीस वर्षे भाजपचा आमदार आहे ती जागासुद्धा भाजपची जाऊ शकते असा विश्वास प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला आहे.

राज्यात एकनाथ शिंदे यांनी बंड करून महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यातच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतारही व्हावं लागले होते.

तेव्हापासून राज्यातील राजकारण ढवळून निघाले होते. त्यानंतर आता पु्न्हा एकदा कसबा पोटनिवडणुकीवरून हा वाद चिघळला आहे.

ज्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारला सत्तेतून बाहेर खेचले होते. ते पद्धती चुकीची होती. मात्र ज्या पद्धतीने हे सरकार सत्तेत आले आहे तसेच उद्धव ठाकरे यांचा अपमान केला आहे.

त्यामुळे राज्यातील जनता बंडखोर आमदारांवर आणि या शिंदे-फडणवीस सरकारवर जनता तीव्र नाराज असल्याचेही प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.एकनाथ शिंदे यांच्यामुळे राज्यात ही एक नवीन संस्कृती महाराष्ट्रात येऊ घातली आहे असा टोलाही त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला आहे.

एकनाथ शिंदे यांनी बंड करुन मुंबई-सूरत-गुवाहटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन मविआचे सरकारला पायउतार व्हावे लागले होते.

त्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामाही द्यावा लागला होता. मात्र हे जनतेच्या अजिबात पचनी पडली नाही राज्यातील सुज्ञ जनतेला हे आवडलं नाही.

या घटनेची तीव्र भावना लोकांमध्ये असून लोक मतदानाची वाट पाहत आहेत असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आहे.

कसबा पोटनिवडणुकीचा निकाल लागताच आणि महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होताच ठाकरे गटासह मित्र पक्षांनी त्याचे जोरदार स्वागत केले.

त्यामुळे आता महाविकास आघाडीसह मित्र पक्षानीही त्यांचे समर्थन करत आगामी निवडणुकांविषयी त्यांनी विजयाची खात्रीही व्यक्त केली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेष असून 200 हून अधिक जागा आम्ही निवडून आणू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

माजी राज्यमंत्री आणि आमदार प्राजक्त तनपुरे यांनी कायदा सुव्यवस्थेविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, पोलिसांवरती दबाव वाढवून राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडत चालली आहे. मात्र सरकारला त्याचे काहीही देणं घेणं नाही त्यांना फक्त सरकार टिकवायचे असा टोला त्यांना लगावला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.