माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका

चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे यांचे आज (25 एप्रिल) निधन झाले. (sanjay deotale passes away corona virus)

माजी मंत्री संजय देवतळे यांचे कोरोनामुळे निधन, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 3:58 PM

चंद्रपूर : जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तसेच भाजप नेते संजय देवतळे (Sanjay Deotale) यांचे आज (25 एप्रिल) निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील काही दिवसांपूसन त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांची प्राणज्योत मालवली. (Former minister Sanjay Deotale passes away due to heart attack was infected with Corona virus)

मागील 6 दिवसांपासून उपचार, अचानक हृदयविकाराचा झटका

संजय देवतळे यांना कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर खबरदारी म्हणून त्यांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर नागपूरमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. मागील सहा दिवसांपसून हे उपचार सुरु होते. मा६, आज अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे त्यांचे निधन झाले.

संजय देवतळे यांची राजकीय कारकीर्द

संजय देवताळे यांच्या अकाली निधनामुळे सर्व स्तरातून दु:ख व्यक्त होत आहे. ते 4 वेळा काँग्रेसच्या तिकिटावर वरोरा विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासह राज्याच्या पर्यावरण मंत्रिपदाचा कारभारासुद्धा त्यांनी सांभाळला होता. त्यानंतर त्यांनी  2014 च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी मात्र, त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2019च्या निवडणूक त्यांनी शिवसेनेच्या तिकिटावर लढवली होती. पुन्हा शिवसेनेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत देवतळे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपत नुकताच प्रवेश केला होता.

इतर बातम्या :

माझ्या भाकरीसाठी दुसऱ्याची भाकर कधी हिरावून घेणार नाही, पाणी घेतल्याचं सिद्ध झाल्यास राजकीय सन्यास घेईन : दत्तात्रय भरणे

अस्सल लोककलावंत ‘भारूडरत्न’ निरंजन भाकरे यांचं निधन

Corona Cases and Lockdown News LIVE : पुण्यातील धक्कादायक प्रकार, राहत्या घरात कोरोनाबाधित डॉक्टर आणि त्यांच्या बहिणीचा मृतदेह आढळला

(Former minister Sanjay Deotale passes away due to heart attack was infected with Corona virus)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.