Eknath Shinde | मराठी चित्रपट, मालिकांमधील ‘हे’ प्रसिद्ध चेहेर आज शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश

Eknath Shinde | महाराष्ट्रात सध्या सर्वत्र अजित पवार यांच्या बंडाचीच चर्चा आहे. पण शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. आज शिवसेनेचा एक माजी आमदार आणि प्रसिद्ध अभिनेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

Eknath Shinde | मराठी चित्रपट, मालिकांमधील 'हे' प्रसिद्ध चेहेर आज शिंदेंच्या शिवसेनेत करणार प्रवेश
eknath shindeImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 2:14 PM

मुंबई : महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला आहे. सर्वत्र अजित पवार यांच्या बंडाचीच चर्चा आहे. अजित पवारांनी काल धक्कातंत्राचा अवलंब केला. कोणाला कुठलीही कल्पना लागू न देता त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाण्याचा निर्णय घेतला. आपल्यासोबत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि दिग्गज नेत्यांना घेऊन गेले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला या बंडाचा फक्त विधिमंडळातच नाही, तर संघटना स्तरावरही फटका बसू शकतो.

अजित पवारांच्या या बंडानंतर विविध पद्धतीने राजकीय विश्लेषण सुरु आहे. काही राजकीय विश्लेषकांच्या मते भाजपाने एकाच दगडात अनेक पक्षी मारले आहेत. भाजपाने अजित पवारांना सोबत घेऊन एकनाथ शिंदे यांना पर्याय निर्माण केल्याच बोललं जातय.

शिंदे गटात इनकमिंग सुरु

एकनाथ शिंदे यांची वाढती राजकीय ताकद कमी करण्याचा भाग म्हणून अजित पवार यांच्या सरकार प्रवेशाकडे पाहिलं जातय. दरम्यान दुसऱ्याबाजूला शिवसेना शिंदे गटात इनकमिंग सुरुच आहे. ठाण्यात आज पक्ष प्रवेशाचा धडाका आहे.

ठाकरे गटाचा कुठला माजी आमदार शिंदेंसोबत जाणार?

माजी आमदार शिशिर शिंदे आज ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. याआधी ते मनसेमध्ये होते. मनसेच्या तिकीटावर ते आमदार झाले. आता हेच शिशिर शिंदे शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी उध्दव ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. ठाकरे गटाचे विलास पारकर देखील शिवसेनेत प्रवेश करतील. मराठी सिनेसृष्टीत कुठले अभिनेते शिवसेनेत प्रवेश करणार?

दरम्यान काही मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते आणि अभिनेत्री सुद्धा आज शिंदे गटात प्रवेश करतील. हार्दिक जोशी, अदिती सारंगधर, अक्षया देवधर आणि माधव देवचाके हे प्रसिद्ध चेहरे आज शिंदे गटात दाखल होतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आनंद आश्रम येथे हे प्रवेश होणार आहेत.

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....