“भाजपने आधी स्वतःचं घर सांभाळावे”; शिवगर्जना यात्रेत या नेत्यानं भाजपवर तोफ डागली

| Updated on: Feb 27, 2023 | 11:26 PM

भाजपने जरी इतर पक्षांवर आणि ठाकरे गटावर टीका करत असले तरी त्यांनी आधी आपल्या घरात काय चालले आहे त्याचीही एकदा तपासणी करावी अशी जहरी टीका त्यांना भाजपवर केली आहे.

भाजपने आधी स्वतःचं घर सांभाळावे; शिवगर्जना यात्रेत या नेत्यानं भाजपवर तोफ डागली
Follow us on

चंद्रपूर: ठाकरे गटाच्या शिवगर्जना यात्रेला सुरुवात झाल्यापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावरून शिवसेना आणि भाजपवर सडकून टीका केली जात आहे. त्यातच पुण्याच्या कसबा आणि चिंचवड पोटनिडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड तापले आहे. शिवसेना आणि ठाकरे गटाकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तर दुसरीकडे शिवगर्जना यात्रा चालू झाल्यापासून ठाकरे गटाकडून शिवसेना आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला जात आहे.

आजही चंद्रपूरमधील शिवगर्जना यात्रेत ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यानी शिवसेनेतील बंडखोर आमदारांना गद्दार म्हणत भाजपवरही जोरदार निशाणा साधला आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी रावसाहेब दानवे याणि सुधीर मुनगंटीवार यांना लक्ष्य करत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या राजकारणाचे किस्सेही त्यानी यावेळी सांगितले.

यावेळी चंद्रकांत खैरे यांनी सांगितले की, रावसाहेब दानवे यांनी संभाजीनगर येथे निवडणुकीत मला निवडणुकीत पाडले, तर सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपुरात अहीर यांना पराभूत केले.

त्यामुळे भाजपने आधी स्वतःचे घर सांभाळावे व नंतर इतरांवर टीका करावी असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. चंद्रपूरच्या शिवगर्जना यात्रेत बोलताना त्यांनी ही कडवट टीका केली आहे.

माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भाजपवर कडवट टीका करताना त्यांनी भाजपमध्येच असलेल्या राजकारणाची बाजू मांडली.

2019 च्या निवडणुकीत औरंगाबाद लोकसभा क्षेत्रातून तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी विरोधात काम करून मला पाडण्याचे काम केले आहे. तर त्यांच्याप्रमाणेच चंद्रपुरातही केंद्रीय मंत्री भाजपचे हंसराज अहीर यांना भाजपच्या मुनगंटीवार यांच्याकडून पाडण्यात आले आहे.

भाजपने जरी इतर पक्षांवर आणि ठाकरे गटावर टीका करत असले तरी त्यांनी आधी आपल्या घरात काय चालले आहे त्याचीही एकदा तपासणी करावी अशी जहरी टीका त्यांना भाजपवर केली आहे.

तर एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्या आमदारांनी बंडखोरी केली आहे त्या आमदारांना गद्दार म्हणत त्यांनी त्यांच्यासारखे गद्दार उद्धव ठाकरे यांच्या गटात नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले आहे.