महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन दलवाई (सिनियर) यांचे निधन; कट्टर काँग्रेसवासी अशी ओळख

पै. हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) हे खेड विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर १९६२ पासून निवडून येत. जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाईसाहेब चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असं सांगत.

महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन दलवाई (सिनियर) यांचे निधन; कट्टर काँग्रेसवासी अशी ओळख
महाराष्ट्राचे माजी मंत्री हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) यांचे निधन
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 12:16 AM

रत्नागिरीः महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि रत्नागिरीचे माजी खासदार हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) (Former MP Hussein Mistrikhan Dalwai) यांचे आज सायंकाळी निधन (Passed away) झाले. ते येत्या १७ ऑगस्ट रोजी वयाची शंभरी पूर्ण करणार होते. अस्खलित मराठी बोलणारे, संस्कृत, उर्दू, हिंदी आणि इंग्रजी भाषेवर विद्वत्तापूर्ण प्रभूत्त्व असणारे गोरेपान दलवाईसाहेब हे पहाता क्षणी त्यांच्याबद्दल आदर निर्माण होईल असे व्यक्तिमत्त्व होते. ते अत्यंत उत्साहाने आणि प्रसन्न चेहऱ्याने सामान्य माणसांच्या भेटीगाठी घेत असत. गेली सुमारे वीसबावीस वर्षे ते राजकारणापासून दूर होते. पण राजकारणी माणसांशी असलेले त्यांचे संबंध आजपर्यंत कायम होते. ते कट्टर काँग्रेसवासी (congress) होते, तरीही विरोधी पक्षातील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध ठेऊन होते.

त्यांचा उल्लेख सिनियर असा केला जातो, कारण पत्रकारिता आणि राजकारणातील आताच्या पिढीला माहित आहेत ते दुसरे हुसेन दलवाई. त्यांना ज्युनियर हुसेन दलवाई असे म्हटले जाते. सिनियर दलवाई हे उक्ताडचे म्हणजे चिपळूण शहराच्या हद्दीतील शेवटच्या टोकाचे रहिवासी होते.

सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचं नातं

पै. हुसेन मिस्त्रिखान दलवाई (सिनियर) हे खेड विधानसभा मतदार संघातून विधानसभेवर १९६२ पासून निवडून येत. जन्म व शिक्षण चिपळूणमध्ये वकिली मुंबईत आणि आमदारकी खेडमध्ये असे त्रिस्थळी असलेले दलवाईसाहेब चिपळूण ही आपली आई आहे आणि खेड ही मावशी आहे असं सांगत.

तालुक्याचा बराच भाग सुजलाम

दोन्ही तालुक्यातील सामान्य कार्यकर्त्यांशी जिव्हाळयाचं नातं ठेवीत. खेड आणि चिपळूणच्या दरम्यान आज जी लोटे-परशुराम ही औद्योगिक वसाहत दिसते, ती दलवाईसाहेबांनी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री नरेंद्र तिडके यांच्याकडे हट्ट धरून मंजूर करून घेतलेली आहे. आज खेड तालुका पाण्याने समृध्द आहे. त्याला कारणीभूत ठरलेला नातूनगरचा जलप्रकल्प दलवाईसाहेबांनीच मंजूर करून घेतला होता. आणि तालुक्याचा बराच भाग सुजलाम झाला.

मध्यम व लघु धरणांची निर्मिती

खेड तालुक्यात आज असलेली मध्यम व लघु धरणे दलवाईसाहेबांच्याच काळात झालेली किंवा त्यांनी आखणी केलेली आहेत. सुदैवाने त्यानंतर आमदार झालेले कै. तु. बा. कदम यांनी तेवढ्याच तळमळीने धरणांची अपुरी पूर्ण करून घेतली.

स्वेच्छेने निवृत्त झालेला नेता

आणीबाणीच्या काळात महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांच्या पुढाकाराने मोठा उठाव झाला. त्यासाठीच्या सर्व बैठका दलवाईसाहेबांच्या मुंबईतील ओव्हल मैदानासमोरच्या एम्प्रेस कोर्ट या निवासस्थानी होत. शरद पवार यांच्यासह काँग्रेसचे सर्व नेते तेथे एकत्र येत. त्यानंतरच्या काळात शंकररावांच्या जागी वसंतदादा पाटील यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली. त्यांनी आपल्या मंत्रीमंडळात दलवाईसाहेबांना मंत्री केले. त्यानंतर बॅ. अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना रत्नागिरी जिल्ह्याचेही विभाजन झाले. त्यावेळी दलवाईसाहेब राज्यसभेवर निवडून गेले व नंतर स्वेच्छेने निवृत्त झाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.