Sharad Pawar | शरद पवारांवर टीका करणाऱ्या निलेश राणेंना भाजपा नेत्याकडून घरचा आहेर
Sharad Pawar | निलेश राणेंची टीका भाजपाच्या एका माजी खासदाराला पटली नाही. त्याने उघडपणे नाराजी व्यक्त केली. अमित शाहंकडे या विषयाची तक्रार करणार असल्याच त्याने म्हटलं आहे.
पुणे : माजी खासदार निलेश राणे यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दल एक टि्वट केलं होतं. निलेश राणेंनी खूप बोचऱ्या शब्दात टीका केली होती. “निवडणूक जवळ आली की, पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात. कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार” असं टि्वट निलेश राणेंनी केलं होतं. निलेश राणेंनी केलेल्या या टि्वटचे राजकीय पडसाद उमटण स्वाभाविक होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने निलेश राणेंवर पलटवार केलाच.
पण आता पुण्यातील भाजपा नेते आणि एका माजी खासदाराने निलेश राणे यांच्यावर टीका केली आहे. “निलेश राणेंनी शरद पवारांबद्दल केलेल्या टीकेचा मी वैयक्तिक निषेध करतो” असं या माजी भाजपा खासदाराने म्हटलं आहे.
मीडियाने बंदी घालावी
संजय राऊत, निलेश राणे यांच्यावर पक्षाने आणि मीडियाने बंदी घातली पाहिजे, अशी मागणी माजी खासदार संजय काकडे यांनी केली आहे. “कुत्रा आणि इतर जनावरांच्या उपमा दिल्या जातात. संजय राऊत आणि निलेश राणे यांच्याकडे मीडियाने जाऊ नये” असं आवाहन संजय काकडे यांनी केलं आहे.
निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात,
कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार. pic.twitter.com/1Rot33Ldct
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 7, 2023
शरद पवारांना धमकी
निलेश राणेंबाबत अमित शहा आणि पक्षाच्या श्रेष्ठीना मी पत्र लिहणार आहे, असं पुण्यातील भाजपा नेते आणि माजी खासदार संजय काकडे यांनी म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. ‘तुझा लवकरच दाभोळकर होणार’
ट्विटरवरून एका व्यक्तीने ही धमकी दिली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार भाX खाव तुझा लवकरच दाभोळकर होणार, अशी धमकी फेसबुकवरून देण्यात आली आहे. तर सौरभ पिंपळकर याने ट्विटर अकाऊंटवरून शरद पवार यांना धमकी दिली आहे.