बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार

वाशीतील फोर्टिस रुग्णालयाने बिलासाठी डॉक्टरचाच मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं आहे (Fortis hospital vashi deny dead body of doctor).

बिलासाठी फोर्टिस रुग्णालयाचा आडमुठेपणा, नवी मुंबईतील नामांकित डॉक्टरचा मृतदेह देण्यास नकार
Follow us
| Updated on: Sep 10, 2020 | 12:58 AM

नवी मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. ते अगदी रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळण्यापासून तर अगदी शेवटी उपचाराचे बिल देण्यापर्यंत सामान्य नागरिकांची अडवणूक होतानाची उदाहरणं समोर आली आहेत. नवी मुंबईत एका नामांकित डॉक्टरवर आणि त्याच्या कुटुंबावरही अशीच वेळ आल्याचं समोर आलंय. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर बिलासाठी रुग्णालयाने डॉक्टरचाच मृतदेह ताब्यात देण्यास नकार दिल्याचं पाहायला मिळालं आहे (Fortis hospital vashi deny dead body of doctor).

या प्रकरणात महानगरपालिकेच्या आदेशालाही खासगी रुग्णालयांकडून केराची टोपली दाखवल्याचं समोर आलं आहे. आताही असाच प्रकार घडला आहे. ऐरोलीचे नामांकित डॉ. विलास कुलकर्णी यांचे नुकतेच कोरोनाने निधन झाले. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने वाशीच्या फॉर्टिस रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांनी मेडिक्लेम कंपनीकडून बिल मंजूर झाल्याची पावती रुग्णालयाला दाखवूनही पैशासाठी अट्टाहास करण्यात आला.

डॉ. विलास कुलकर्णी यांच्या उपचाराचे साडेचार लाख रुपयांचे बिल मिळाले नसल्याचे कारणही देण्यात आले. या प्रकारानंतर प्रतिष्ठित डॉक्टरांनी रुग्णालय प्रशासनाला समज दिल्यानंतर अखेर 4 तासांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. यामुळे आधीच आपल्या घरातील व्यक्ती गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांना मोठ्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामुळे असा आडमुठेपणा करणाऱ्या डॉक्टरांवर आणि रुग्णालयांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

“5 सप्टेंबरला 62 वर्षांचा कोव्हिड-19 पॉझिटिव्ह रुग्ण, ज्याचे आमच्याकडे उपचार सुरु होते. त्याचे शरीरांतर्गत गुंतागुंतीमुळे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल रुग्णाच्या कुटुंबातील सदस्यांना समुपदेशन करण्यात आले आणि विहित प्रक्रियेचा सल्ला दिला. कोणत्याही परिस्थितीत मृतदेह परिवाराकडे सुपुर्त करण्यामध्ये विलंब होऊ दिला नाही.विद्यमान मार्गदर्शक तत्त्वांच्या अनुशंघाने सर्व रुग्णालयांनी विस्तृत कागदपत्रे सांभाळणे आवश्यक आहे आणि मृतदेह सुपुर्त करण्यापूर्वी प्रक्रियात्मक कागदपत्रांचे विधिवत पालन करणे आवश्यक आहे. अशा सर्व प्रक्रियांचे विधिवत पालन करुनच आमच्या टीमने मृतदेहाची औपचारिकता लवकर करण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न केले, जेणेकरुन अंत्यसंस्कार लवकरात लवकर करता येतील. आपदाग्रस्त कुटुंबियांचा शोकात आम्ही सहभागी आहोत”, असं रुग्णालयाने स्पष्ट केलं.

हेही वाचा :

आरोग्य कर्मचाऱ्यावर दबाव आणून दहशतीचा प्रयत्न, सामनातून विरोधकांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe | तुकाराम मुंढेंची कोरोनाविरुद्धची लढाई यशस्वी, 12 दिवसात कोरोनावर मात

ठाण्यात 72 वर्षीय कोरोना रुग्णाची रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी घेत आत्महत्या

Fortis hospital vashi deny dead body of doctor

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.