पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी दोन कोटींच्या निधीला मंजुरी; अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक

यंदा आषाढी वारीनिमित्त लाखो भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी ग्रामविकास विभागाकडून दोन कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोईसुविधांसाठी दोन कोटींच्या निधीला मंजुरी; अजित पवारांच्या उपस्थितीत बैठक
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 7:39 AM

पंढरपूर : गेले दोन वर्ष देशासह राज्यात कोरोनाचे (Corona) संकट होते. कोरोनामुळे अनेक निर्बंध घालण्यात आले होते. या निर्बंधांमधून पंढरपूरची आषाढी वारी (Ashadhi Wari) देखील सुटली नव्हती. कोरोनामुळे गेले दोन वर्ष वारकऱ्यांना आषाढी वारीला जाता आले नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने वारी निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार आहे. गेले दोन वर्ष वारीला जाता न आल्याने यंदा आषाढी वारीसाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. संभाव्य गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाकडून वारीचे नियोजन सुरू झाले आहे. विशेष म्हणजे राज्य सरकारने वारी मार्गावरील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी दोन कोटी 69 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या निधीतून वारकऱ्यांसाठी वारी मार्गावर सोई सुविधा उभारण्यात येणार आहेत. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली, या बैठकीमध्ये निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पन्नास टक्के निधी जिल्हा परिषदेकडून

आषाढी वारीनिमित्त अनेक संताच्या पालख्या या पंढरपूरमध्ये दाखल होत असतात. या पालख्यांसोबत हजारो वारकरी देखील पंढरीत दाखल होतात. हे वारकरी साधारणपणे पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत असतात. वारी काळात वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांना सोई सुविधा पुरवण्यात याव्यात यासाठी दोन कोटी 69 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. या पैकी पन्नास टक्के निधी ग्रामपंचायतींना जिल्हा परिषदेकडून देण्यात येणार आहे. तर उर्वरीत पन्नास टक्के निधी हा ग्रामविकास विभागाच्या वतीने देण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा

मोठ्या संख्येने भाविक पंढरपुरात दाखल होणार

गेले दोन वर्ष राज्यात कोरोनाचे संकट होते. कोरोना काळात अनेक निर्बंध घालण्यात आले. आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपुरला विठूरायाच्या दर्शनासाठी जात असतात. शेकडो वर्षांपासून ही पंरपार सुरू आहे. मात्र कोरोनामुळे त्यात खंड पडला. कोरोनामुळे दोन वर्ष वारकऱ्यांना पंढरपूरला जाता आले नाही. परंतु आता कोरोना निर्बंध उठवण्यात आले आहेत. यंदाची वारी निर्बंधमुक्त वातावरणात पार पडणार असल्याने, यंदा मोठ्या संख्येने वारकीर पंढरपुरात दाखल होण्याची शक्यता आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.