Ambernath Road Fund : अंबरनाथमधील रस्त्यांसाठी साडेचौदा कोटींचा निधी, टोलेजंग इमारतींना आता मिळणार अग्निसुरक्षा

शासनाचा निधी मिळत नसल्यानं या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत नव्हती. मात्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याने या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी शासनानं निधी मंजूर केलाय.

Ambernath Road Fund : अंबरनाथमधील रस्त्यांसाठी साडेचौदा कोटींचा निधी, टोलेजंग इमारतींना आता मिळणार अग्निसुरक्षा
अंबरनाथमधील रस्त्यांसाठी साडेचौदा कोटींचा निधीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 8:31 PM

अंबरनाथ : अंबरनाथ शहरातील रस्त्यांच्या कामांसाठी शासनाने साडेचौदा कोटी रुपयांचा निधी (Fund) मंजूर केला आहे. आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji Kinikar) यांच्या प्रयत्नाने हा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून शहरातल्या दोन महत्त्वाच्या रस्त्यांची कामं मार्गी लागणार आहेत. तर नगरपालिकेच्या ताफ्यात सुसज्ज फायर ब्रिगेड (Fire Brigade) देखील येणार आहे. अंबरनाथ शहराच्या पश्चिम भागातील रेल्वे स्टेशन ते कल्याण बदलापूर राज्य महामार्ग आणि पूर्व भागातील न्यू बॉंबे हॉटेल ते राहुल नगर हनुमान मंदिर या दोन रस्त्यांची कामं गेल्या अनेक वर्षांपासून रखडली होती. विकास आराखड्यात प्रस्तावित असलेले हे रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून फक्त कागदावरच होते.

प्रकल्पबाधित रहिवाशांचं पुनर्वसन करणार

शासनाचा निधी मिळत नसल्यानं या रस्त्यांच्या कामाला सुरुवात होत नव्हती. मात्र कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याने या दोन्ही रस्त्यांच्या कामासाठी शासनानं निधी मंजूर केलाय. आज अंबरनाथ नगरपालिकेत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार किणीकर आणि अंबरनाथ पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांनी ही माहिती दिली. दरम्यान, अंबरनाथ शहरात जे दोन नवीन रस्ते या निधीतून उभारण्यात येणार आहेत, त्या रस्त्यांच्या आरक्षित जागेत अनेक अतिक्रमणं आणि लोकांची राहती घरं आहेत. त्यामुळे हे रस्ते उभारताना अनेक घरं आणि अतिक्रमणं हटवावी लागणार असून या रहिवाशांचं पुनर्वसन सुद्धा केलं जाईल, अशी ग्वाही आमदार किणीकर यांनी दिली आहे.

सुसज्ज फायर ब्रिगेड खरेदी करण्यासाठीही शासनाकडून निधी

या रस्त्यांसोबतच अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका मिळून एक नवीन सुसज्ज फायर ब्रिगेड खरेदी करण्यासाठीही शासनाने निधी दिला आहे. ही फायर ब्रिगेड परदेशातून मागवण्यात येणार असून तिला 70 मीटर उंचीची हायड्रॉलिक शिडी आहे. त्यामुळे 22 मजल्यांच्या टोलेजंग इमारतीत लागलेली आग सुद्धा या शिडीच्या साहाय्याने विझवता येणार असून उंच इमारतींना अग्निसुरक्षा मिळणार आहे. (Funds of Rs 14.5 crore for roads in Ambernath, tall buildings will now get fire protection)

हे सुद्धा वाचा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.