जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?

गडचिरोली/नागपूर : गडचिरोली नक्षली हल्ल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी 25 एप्रिलपासून या हल्ल्याची तयारी सुरु केली होती. इतकंच नाही तर जवानांवर हल्ला करुन, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. जवळपास 100 पेक्षा जास्त नक्षलवादी इथे दबा धरुन बसले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती दलाच्या जवानांवर […]

जवनांचा मृत्यू होईपर्यंत 100 नक्षलवादी थांबले, हल्ला नेमका कसा झाला?
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

गडचिरोली/नागपूर : गडचिरोली नक्षली हल्ल्यानंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्षलवाद्यांनी 25 एप्रिलपासून या हल्ल्याची तयारी सुरु केली होती. इतकंच नाही तर जवानांवर हल्ला करुन, जवानांच्या मृत्यूची खात्री केल्यानंतर नक्षलवादी घनदाट जंगलात पसार झाले. जवळपास 100 पेक्षा जास्त नक्षलवादी इथे दबा धरुन बसले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शीघ्र कृती दलाच्या जवानांवर हल्ला करताना या परिसरात 100 पेक्षा जास्त नक्षलवादी होते. स्फोट होताच जवानांच्या मृत्यूची खात्री करुन नक्षली पसार झाले. 25 एप्रिलपासून हा भ्याड हल्ला करण्याची तयारी नक्षलवाद्यांनी सुरु केली होती. छत्तीसगड आणि गडचिरोलीतील नक्षलवाद्यांचे चार-पाच दल एकत्र येऊन एक कंपनी तयार करण्यात आली. जवानांना सापळ्यात अडकवण्यासाठी वाहनांची जाळपोळ केली. शीघ्र कृती दलाचे जवान खासगी वाहनातून निघाले असता, त्याची प्रत्येक माहिती खबऱ्यांमार्फत नक्षलवाद्यांपर्यंत पोहोचत होती. नक्षलवाद्यांच्या स्थानिक दलाने हल्ल्याचा कट रचला आणि इतर दलाची मदत घेतली. हल्ला केल्यानंतर लगेच नक्षलवादी दंडकारण्यात पळून गेले. दंडकारण्य हे छत्तीसगड, महाराष्ट्र आणि झारखंड या तीन राज्यांच्या मध्ये असलेलं घनदाट जंगल आहे. इथे केवळ नक्षलवादीच जातात.

पोलीस महासंचालक घटनास्थळी

दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे सकाळी 09:15 वा. घटनास्थळी आले. त्यांनी हल्ला झाला त्या ठिकाणची पाहणी केली. पोलीस महासंचालकांसोबत गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आणि जिल्हाधिकारी शेखर सिंगही होते.

जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन   

सध्या जांभूळखेडा परिसरात कोबिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु करण्यात आलं आहे. नक्षलवाद्यांनी हा हल्ला कसा केला त्या ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.

नक्षलवाद्यांचा हल्ला 15 जवान शहीद

नक्षलवाद्यांनी बुधवारी 01 मे रोजी गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर भूसुरुंग स्फोट घडवला. या स्फोटात 15 जवान शहीद झाले आहेत. शिवाय चालकाचाही मृत्यू झाला. पोलिसांच्या नक्षलविरोधी पथकाच्या दोन गाड्यांवर नक्षलवाद्यांनी लक्ष्य केलं. महाराष्ट्र दिनी नक्षलवाद्यांनी आयईडी स्फोट घडवून हा हल्ला केल्याचं सांगण्यात येत आहे. नक्षलवाद्यांनी मंगळवारी रात्रीच रस्त्याचं काम सुरु असलेल्या ठिकाणी तब्बल 30 वाहने पेटवून दिली. त्यानंतर बुधवारी पुन्हा नक्षल्यांनी भूसुरुंग स्फोट घडवून भीषण हल्ला केला.

हल्ला नेमका कुठे झाला?

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांभूळखेडा आणि लेंढारी गावादरम्यान ही घटना घडली. लेंढारी गावाजवळ वळण आहे, या ठिकाणी भूसुरुंग घडवला. हा जंगलाचा भाग आहे. मंगळवारी नक्षलवाद्यांनी ठेकेदारांची वाहने जाळली होती. ही घटना पाहण्यासाठी, त्याच्या तपासासाठी पोलिसांचं शीघ्र कृती दल जात होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. नक्षवाद्यांना माहित होत गाड्या जाळल्यानंतर तपासासाठी पोलीस येणार. त्यामुळे त्यांनी एकप्रकारे सापळा लावला होता, असं म्हटलं जात आहे.

संबंधित बातम्या: 

गडचिरोलीतील नक्षली हल्ल्यात बीड जिल्ह्यातील जवानालाही वीरमरण

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील 2 जवान शहीद 

गडचिरोलीतील शहिदांची यादी, मराठवाडा, विदर्भातील जवानांचा समावेश

जनाची नाही, मनाची लाज असेल तर राजीनामा द्या, शरद पवार मुख्यमंत्र्यांवर कडाडले

नक्षल्यांना सडेतोड उत्तर देऊ, मी स्वत: तिथे जातोय : पोलिस महासंचालक

गडचिरोलीत नलक्षलवाद्यांकडून भ्याड हल्ला, 16 जवान शहीद

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांचा कर्दनकाळ ‘सी-60 फोर्स’चं ट्रेनिंग कसं होतं?

गडचिरोली हल्ला : नक्षलवाद्यांना जवानांच्या खासगी गाडीची माहिती पुरवणारे गद्दार कोण?

आधी गाड्या पेटवून ट्रॅप लावला, खासगी गाडीतून आलेले जवान नक्षलींच्या जाळ्यात अडकले!

गडचिरोली हल्ला : आयईडी ब्लास्ट इतका घातक का असतो?

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.