युवकाची हत्या करणारा जहाल नक्षलवाद्याला बेड्या; इतकी वर्षे करत होता भयानक गुन्हे

भामरागड येथे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अन्य दोन संशयित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे.

युवकाची हत्या करणारा जहाल नक्षलवाद्याला बेड्या; इतकी वर्षे करत होता भयानक गुन्हे
Follow us
| Updated on: Mar 15, 2023 | 11:09 PM

गडचिरोली : नक्षलवाद्यांकडून गडचिरोली भागात गेल्या काही दिवसांपासून कारवायांना ऊत आला होता. त्यामुळे पोलिसांनी जोरदार मोहीम राबवली होती. फेब्रुवारी ते मे महिन्यादरम्यान नक्षलवादी टीसीओसी कालावधी साजरा करतात. या दरम्यान ते सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, पोलीस दलावर हल्ले करुन त्यांच्या जवळील शस्त्रे लुटणे, रस्ते व इतर प्रकारच्या सरकारी कामात अडथळे आणून जाळपोळ करणे अशा देशविघातक कृत्य केली जातात. याच टीसीओसी कालावधीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली पोलीस दलाने एका जहाल नक्षलवाद्यास 14 मार्च रोजी अटक करण्यात आली आहे.

उपविभाग भामरागड अंतर्गत येणाऱ्या पोमकें नारगुंडा हद्दीतील मौजा मर्दहुर गावातील रहिवासी असलेला युवक साईनाथ नरोटी (वय 26) या तरुणाची 9 मार्च रोजी रात्रीच्या दरम्यान नक्षलवाद्यांनी त्याची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे या घटनेचा तपास गडचिरोली पोलीस दलाने सुरु केला होता.

त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी माहिती घेतली असता मृत साईनाथ नरोटी याच्या हत्या करण्यामध्ये जहाल नक्षली प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे (वय 27,रा. भामरागड) याचा सहभाग असल्याचे तपासात निष्पण झाले होते.

त्यामुळे 14 मार्च रोजी मिळालेल्या माहितीनुसार मर्दहूर गावापासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावरील जंगल परिसरात विशेष अभियान पथकाच्या जवानांनी नक्षलविरोधी अभियान राबवण्यात आले होते. त्यानंतर जहाल नक्षली प्रकाश ऊर्फ देविदास ऊर्फ आडवे मुरे गावडे याला अटक करण्यात आले.

नक्षली गावडे हा मार्च 2000 मध्ये पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर भरती झाला होता. त्यानंतर 6 महिने कार्यरत राहून सप्टेंबर 2000 मध्ये प्लाटुन दलम उत्तर गड गोंदिया डिव्हीजनमध्ये त्याची बदली करण्यात आली होती. त्यानंतर 2007-08 मध्ये सेक्शन डेप्युटी कमांडर या पदावरही तो कार्यरत होता.

त्यानंतर 2009 ते जुलै 2011 पर्यंत प्लाटून ए कमांडर या पदावरही तो कार्यरत होता. त्यानंतर जुलै 2o11 ते फेब्रुवारी 2012 पर्यंत देवरी दलममध्ये दलम कमांडर म्हणूनही तो कार्यरत होता.

गावडे याच्यावर विविध प्रकारचे एकूण 22 गुन्हे दाखल झाले होते. त्यामध्ये 10 खुन, 8 चकमक, 1 दरोडा, 2 जाळपोळ व 1 इतर यांचा समावेश आहे.

त्याचा मृतक साईनाथ नरोटे याच्या हत्येमध्ये सक्रीय सहभाग असल्याची खात्री झाल्याने त्याच्यावर पोस्टे भामरागड येथे त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर अन्य दोन संशयित आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास गडचिरोली पोलीस करत आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.