कंटेनर-टिप्परची झाली समोरासमोर धडक ; कारण नसताना दुचाकीस्वार मध्येच अडकले आणि…

अपघातग्रस्त वाहनांच्यामुळे रस्त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लांबलचक कंटेनर व टिप्पर ऐन रस्त्यात अडकल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता.

कंटेनर-टिप्परची झाली समोरासमोर धडक ; कारण नसताना दुचाकीस्वार मध्येच अडकले आणि...
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 5:38 PM

गडचिरोली : ऐन उन्हाळ्याच्या दिवसातच लांब असलेल्या कंटेनर व टिप्परची समोरासमोर धडक होऊन घाटात  अपघात झाला आहे. याचवेळी दोन दुचाकीस्वार या वाहनांच्यामध्ये अडकले होते. या विचित्र अपघातात दोन ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला आहे. 5 एप्रिल रोजी दुपारी सव्वा दोन वाजता कुरखेडा तालुक्यातील डोंगरगाव पाटीजवळ ही घटना घडली आहे. कोरची-कुरखेडा मार्गावर कंटेनर व टिप्परची मोठी रहदारी असते. 5 रोजी दुपारी कंटेनर (सीजी 04- एनटी- 1113) छत्तीसगडहून महाराष्ट्रात येत होता, तर टिप्पर (एमएच 14 एचयू – 1862) छत्तीसगडकडे जात होते. डोंगरगावजवळ पाटीजवळील घाटात या दोन्ही वाहनांचा समोरासमोर अपघात झाला.

ही धडक एवढी जबरदस्त होती की टिप्पर रस्त्याच्या मधोमध उलटला तर कंटेनरच्या समोरील भागाचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, याचवेळी त्या ठिकाणाहून दुचाकी (एमएच 33 डी- 9116) व अन्य एक दुचाकी जात होत्या. त्याचवेळी कंटेनर आणि टिप्परची समोरासमोर धडक झाली आणि त्यामध्ये दुचाकीसवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. तिघांनाही कुरखेडा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात दाखल करण्यात आले होते.

या अपघातातील दोन मृतांसह एक जखमी असे तिघेही मालेवाडा (ता. कुरखेडा) येथील रहिवासी असून त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरु होते. पुराडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू केला आहे.

या मार्गावर अपघातग्रस्त वाहनांच्यामुळे रस्त्यात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. लांबलचक कंटेनर व टिप्पर ऐन रस्त्यात अडकल्याने रहदारीला अडथळा निर्माण झाला होता. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्यासाठी भरउन्हात पुराडा पोलीस प्रयत्न करत आहेत.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.