Gadchiroli News : आजारी चिमुकल्याला कडेवर घेऊन आई बापाने कशीबशी नदी ओलांडली, अजून किती दिवस…

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या भामरागड तालुक्यातील विदारक दृश्य पाहायला मिळालं आहे. बाळाचा जीव वाचविण्यासाठी कुटुंबाने छातीभर पाण्यातून वाट काढली आहे.

Gadchiroli News : आजारी चिमुकल्याला कडेवर घेऊन आई बापाने कशीबशी नदी ओलांडली, अजून किती दिवस...
Gadchiroli tribal people do not get health facilitiesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 06, 2023 | 9:56 AM

गडचिरोली : महाराष्ट्रात (Maharashtra) अशी अनेक गाव आहेत. जिथं अद्याप महाराष्ट्राच्या शासकीय सुविधा पोहोचल्या नाहीत. त्यामुळे त्या लोकांना एखाद्या गोष्टीसाठी किती संघर्ष करावा लागतो हे अनेकदा पाहायला मिळालं आहे. आरोग्य, शिक्षण या व्यवस्था गरजेच्या असताना सुध्दा तिथंपर्यंत पोहोचल्या नसल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. छत्तीसगड सीमेच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा (binagunda) गावातून एक कुटुंब चिमुकला आजारी असल्यामुळे कित्येक किलोमीटर पायी चालत लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात (primary health center) दाखल झाले आहे. विशेष म्हणजे बाळाचा जीव वाचविण्यासाठी कुटुंबाने छातीभर पाण्यातून काढली वाट काढली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नाहीत. कुठलीही तक्रार न करता कुटुंब लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचले. तब्बल 18 किलोमीटर पायी चालत त्यांनी दवाखाना गाठला. पुजारी-बुवाबाजी यांना स्थान न देता आदिवासी कुटुंबाची आरोग्य केंद्राकडे ओढ सध्या वाढली आहे.

हे सुद्धा वाचा

गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातल्या भामरागड तालुक्यात विदारक दृश्य बघायला मिळाले. बाळाचा जीव वाचविण्यासाठी कुटुंबाने छातीभर पाण्यातून वाट काढली. छत्तीसगड सीमेच्या टोकावर असलेल्या बिनागुंडा गावातून हे कुटुंब निघाले होते. जिल्ह्यातील आरोग्य सुविधा सामान्य माणसांपर्यंत पोहोचत नसताना कुठलीही तक्रार न करता हे कुटुंब लाहेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात पोचले. तब्बल 18 किलोमीटर पायी चालत व पुजारी -बुवाबाजी यांना स्थान न देता आदिवासी कुटुंबाने आरोग्य केंद्राकडे धाव घेतली. या भागातील बारमाही वाहणारे नाले- नद्यांमधून आदिवासींनी आधुनिक उपचाराची कास धरली असताना शासन मात्र सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याचं पाहायला मिळत आहे.

Non Stop LIVE Update
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील
ही आक्रोशाची लाट देवेंद्र फडणवीस यांचा कार्यक्रमच करणार- जरांगे पाटील.
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक
आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून फडणवीस सत्तेत, शहाजीबापू पाटील आक्रमक.
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप
ठाकरे त्यांच्या आजाराचा सहानुभूतीसाठी वापर करतात, कोणी केला आरोप.
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?
भाजपाच्या काही आमदारांना डच्चू मिळणार,तर काही नेत्यांचे पुनर्वसन?.
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?
IRS अधिकारी समीर वानखेडे निवडणूकीच्या रिंगणात, या पक्षाकडून उमेदवारी?.
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?
भाजपाच्या 110 उमेदवारांची यादी उद्या येण्याची शक्यता, कोणाला संधी?.
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक
पाडापाडी करायची की लढायचं? जरांगे यांची 20 तारखेला बैठक.
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !
विरोधक-सत्ताधारी दोघेही 'मुख्यमंत्री पदा'चा चेहरा जाहीर करेनात !.
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय
आमदार राजेंद्र शिंगणे यांना पुतणीचाच विरोध ? सिद्धखेड राजात नेमकं काय.
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?
एकनाथ शिंदे यांच्या 'त्या'वक्तव्यावर अजितदादा का खुदूखुदू हसले ?.