सातारा : हत्येच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झालेल्या मारणे टोळीचा म्होरक्या कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणेला (Gajanan Marne) साताऱ्यातील मेंढा पोलिसांनी 6 मार्च रोजी पकडले. एखाद्या सिनेमातील दृश्य असावे अशा थररक पद्धतीने पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. मारणेच्या धावत्या कारसमोर आपली कार उभी करत पोलिसांनी मारणेला ताब्यात घेतले. गेल्या अनेक दिवसांपासून मारणे पोलिसांना गुंगारा देऊन बाहेर फिरत होता. गजा मारणेवर खून, मारामारी, खंडणी अशा प्रकारचे गंभीर गुन्हे नोंद आहेत. (Gajanan Marne Arrested by Satara Medha police cctv footage found)
पप्पू गावडे आणि अमोल बधे खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाल्यानंतर गजा मारणेच्या साथीदारांनी त्याची तळोजा कारागृहाबाहेरुन मिरवणूक काढली होती. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह द्रुतगती महामार्गावरुन पुण्याच्या दिशेने येत होता. या मिरवणुकीत जवळपास 300 गाड्या होत्या. यावेळी त्याच्या साथीदारांनी उर्से टोल नाका येथे थांबून फटाके वाजवून आरडा-ओरडा केला होता. या सर्वाचे ड्रोन कॅमराने चित्रीकरण करून दहशतीचे वातावरण निर्माण केले होते. तसेच उर्से टोल नाक्यावर गजा मारणे याने टोल न भरणे तसंच दहशत पसरवणे तसं वातावरण तयार करणे, असे गुन्हे मिरवणुकीनंतर गजा मारणेवर दाखल झाले होते.
त्यानंतर मागील कित्येक दिवसांपासून गजा मारणे पुणे पोलिसांना गुंगारा देऊन फरार होता. त्याने पुण्यातून पलायन करुन सातारा जिल्ह्यात प्रवेश केला होता. गेल्या अनेक दिवस पुणे पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साताऱ्याच्या जावळी तालुक्यातून गजा मारणेला मेढा पोलिसांनी 6 मार्चरोजी अटक केली होती. त्याचाच व्हिडीओ समोर आला आहे.
कल्याणमध्ये दिवसात दुप्पट रुग्णवाढ, महापालिकेकडून कडकडीत निर्बंध, नेमकं काय सुरु, काय बंद?https://t.co/quw7rEOFm0#KDMC #Kalyan #KalyanCoronaUpdate #KalyanDombivli
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 10, 2021
इतर बातम्या :
(Gajanan Marne Arrested by Satara Medha police cctv footage found)