नादच खुळा! 2001 मध्ये नववी नापास तरी जिद्द कायम, गडी वयाच्या 38 व्या वर्षी दहावी पास
अकोला शहरातल्या तुकाराम चौकात चायनीज खाद्यपदार्थांची गाडी चालवणारे गजानन प्रकाश गवई यांना शिक्षणाचे महत्त्व कळले. मागील काळात घरच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं होतंय. मात्र, वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी शिक्षणाची वाट धरली आणि 38 वर्षाचे गजानन गवई यांनी काल सोमवारी दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.
दहावीच्या परीक्षेचा निकाल काल जाहीर झाला. दहावीच्या निकालात शंभर टक्के गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं कौतूक होतांना पाहिलेत. मात्र, 2001 मध्ये वर्ग नववीत सर्वच विषयात नापास झाल्यावरही जिद्द न सोडता 22 वर्षानंतर पट्टयानं नवव्या वर्गात प्रवेश घेतला आणि पासही झाला, पुढं दहावीत गेला, आणि आता दहावीत त्याने बाजी मारली. वयाच्या 38 व्या वर्षी दहावी गाठणाऱ्या व्यक्तिचं सध्या सगळीकडे कौतुक होत आहे. विशेष म्हणजे कुटुंबातला पाहिलेचा दहावी पास झाल्याचा मानही मिळवला. ही गोष्ट आहे, अकोला शहरातल्या रतनलाल प्लॉट भागात राहणाऱ्या गजाननं गवई या व्यक्तिची.
अकोला शहरातल्या तुकाराम चौकात चायनीज खाद्यपदार्थांची गाडी चालवणारे गजानन प्रकाश गवई यांना शिक्षणाचे महत्त्व कळले. मागील काळात घरच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण अपुरं राहिलं होतंय. मात्र, वयाच्या 37 व्या वर्षी त्यांनी शिक्षणाची वाट धरली आणि 38 वर्षाचे गजानन गवई यांनी काल सोमवारी दहावी बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली.
रतनलाल प्लॉट येथे राहणारे गवई चार वर्षांपासून तुकाराम चौकात चायनीजचे दुकान लावतात. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. दुकानात काम करताना शिक्षण घेणाऱ्या मुलांसोबत त्यांचं बोलणं व्हायचं. आपले मुलंही त्यांच्याप्रमाणं शिकावी, असा विचार एक दिवशी मनात आला. पण घरी सर्व अशिक्षित. आपण शिकलो नाहीतर तर मुलांना प्रेरणा कुठून मिळणार? त्यांना मार्गदर्शन कोण करणार? या अस्वस्थ प्रश्नातून गजानन गवई यांनी जागृती रात्रशाळेत प्रवेश मिळवला. नववी परीक्षा उत्तीर्ण केली.
गजानन गवई हे सकाळी ७ वाजेपासून दुपारी 12 वाजेपर्यत डॉ. नरेंद्र सरदेसाई यांच्या रुग्णालयात काम करायचे. त्यानंतर 12 ते दुपारी 2 वाजेपर्यत डॉ. भाग्यश्री देशपांडे यांच्या पॅथॉलॉजी लॅबवर साफसफाईचे काम करायचे. पुढं बाजारात जाऊन भाजीपाला तसेच इतर सामान खरेदी करत सायंकाळी तुकाराम चौकात चायनीजचे खाद्यपदार्थ विकायचे. अशा दिनक्रमात रात्र शाळेचे वर्गही केले.
गवई यांनी असंख्य चटके सहन केलेत. पण हरायचे नाही अशी जिद्द कायम बाळगली. दहावीची परीक्षा देताना भीती मनात होती. मात्र शालेय मुख्याध्यापक सचिन लोखंडे यांनी वेळोवेळी त्यांना प्रोत्साहन दिले. त्यांचे मनोबलही वाढले. आज दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा आनंद शब्दात न मावणारा असल्याचे ते म्हटले. विशेष म्हणजे दहावीचा अभ्यास त्यांनी पहाटे पाच वाजता उठून तर कधीकाळी कामाच्या रिकाम्या वेळेत केला.
आता कुटुंबात गवई हे पाहिलेच दहावी पास
गजानन गवई यांचे वडील प्रकाश गवई याचं वर्ग 8 वी पर्यतचं शिक्षण झाले आहे. तर आई शांताबाई हे कधीचं शालेयत गेल्या नाही. त्यांना आणखी 1 भाऊ आणि 2 बहिण आहे. त्यापैकी सूरज गवई अन् सर्वात मोठी बहिण संध्या गवई (कंकाळ), लहान बहिण निशा गवई (डागर) हे तिघेही दहावी नापास आहे. त्यात पत्नी सोनू गवई हे देखील वर्ग पाचवीपर्यत शिकलेली आहे. आणि गवई यांचे मुले सध्या लहान असून सर्वात मोठी मुलगी आठव्या वर्गात शिकत आहे.
आता पत्नीलाही शिकवणार
गजानन गवई यांनी परिश्रमातून दहावी परीक्षा उत्तीर्ण केली. एक सुजाण पालक म्हणून आपण आपल्या मुलांचं जीवन घडवावं, असं त्यांचं स्वप्न. म्हणून स्वतः दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर आता गवई हे आपल्या पत्नी सोनू’लाही शालेयमध्ये दाखल करणार आहेत.