Ganesh Chaturthi 2024 LIVE : परळी शहरामध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन

| Updated on: Sep 09, 2024 | 8:19 PM

Ganesh Chaturthi 2024 LIVE in Maharashtra : आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. गणरायाची सेवा करण्यासाठी गणेशभक्त सज्ज आहेत. पुढचे दहा दिवस सगळे भाविक गणेशभक्तीत तल्लीन होतील. घराघरात भक्तिमय आणि प्रसन्न वातावरण असणार आहे. वाचा गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स,,,

Ganesh Chaturthi 2024 LIVE : परळी शहरामध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन
गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्सImage Credit source: tv9

आज गणेश चतुर्थी… सर्वत्र उत्साहाचं वातावरण… लाडक्या गणरायाच्या आगमनाने सर्वत्र प्रसन्न वातावरण आहे. घराघरात गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील गणराय विराजमान झालेत. बाप्पाच्या आगमनाने मंगलमय वातावरण निर्माण झालं आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर या शहरांसह कोकणातील गणेशोत्सवाचे अपडेट तुम्हाला आमच्या लाईव्ह ब्लॉगमध्ये पाहायला मिळतील. तसंच ठिकठिकाणच्या गणपती मंडळांचे आणि घरगुती मंडळांचे सजावटीबाबतची माहिती या ब्लॉगमध्ये तुम्हाला वाचायला मिळणार आहे. त्यामुळे आज आणि पुढचे दहा दिवस आम्हाला फॉलो करा. सर्व अपडेट्स मिळवा एका क्लिकवर…

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 07 Sep 2024 08:33 PM (IST)

    अध्यक्ष आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात होणार

    परळी शहरामध्ये नाथ प्रतिष्ठानच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाचं नामांकित सिनेतारकांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. रश्मिका मंदाना आणि कृती सेनोन यांच्या उपस्थित कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. नाथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरवात होणार आहे.

  • 07 Sep 2024 08:17 PM (IST)

    गणपतीच्या दरबारातही रंगतंय राजकारण, आरोपांच्याही फैरी

    राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाला आगमन झालं आहे. अनेक राजकीय नेत्यांच्या घरीही बाप्पा विराजमान झाले आहेत. काही नेत्यांनी सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देत बाप्पाचा आशीर्वाद घेतला आहे. अशात गणपतीच्या दरबारातही राजकारण रंगतं असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या बांद्रा कलानगर परिसरात असलेल्या नवसाला पावणाऱ्या खेरनगरच्या राजाला शिवसैनिकांनी साकडं घातलं आहे. वांद्रे विधानसभेत शिवसेनेचाच उमेदवार जिंकावा, यासाठी शिवसेना महिला पदाधिकार्यांचं बाप्पाला साकडं घातलं आहे. तसेच शिवसैनिकांनी वरूण सरदेसाई यांना हरवणार असल्याचाही निर्धार केला आहे. वरुण सरदेसाई यांचं ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांच्या यादीत नाव असून त्यांना वांद्रे पूर्वेतून तिकीट मिळणार असल्याची शक्यता आहे वरूण सरदेसाई कोविड काळात केलेल्या घोटाळ्याच्या पैशातून प्रत्येक सार्वजनिक मंडळांना 25 हजार देत असल्याचं आरोप शिवसेना विभाग प्रमुख कुणाल सरमळकर यांनी केला आहे.

  • 07 Sep 2024 07:24 PM (IST)

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भक्तांची गर्दी

    पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. दगडूशेठ मंदीर ट्रस्टकडून यंदा हिमाचल प्रदेशमधील जटोली मंदिराची प्रतिकृती सकरण्यात आली आहे. दत्त संप्रदायाचे ज्ञानराज महाराज माणिकप्रभू यांच्या हस्ते श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची सकाळी 11 वाजून 11 मिनिटांनी प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर दुपारी 12नंतर भक्तांना दगडूशेठ बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घेण्यासाठी खुलं करण्यात आलं आहे. दगडूशेठ गणपती मखरात विराजमान झाल्यानंतर पहिल्याच दिवशी भाविकांनी लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गर्दी केलीय.

  • 07 Sep 2024 06:52 PM (IST)

    अबुधाबीचे क्राउन प्रिन्स 9 सप्टेंबरला भारत दौऱ्यावर

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून, अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान 9-10 सप्टेंबर 2024 रोजी भारताला अधिकृत भेट देतील. अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स यांचा हा पहिलाच भारत दौरा असेल. त्यांच्यासोबत यूएई सरकारचे अनेक मंत्री आणि व्यावसायिक शिष्टमंडळ देखील असेल

  • 07 Sep 2024 06:37 PM (IST)

    हरियाणाचे माजी मंत्री बच्चन सिंह आर्य यांची भाजपाला सोडचिठ्ठी

    हरियाणाचे माजी मंत्री बच्चनसिंग आर्य यांनी तिकीट न मिळाल्याने नाराज होऊन भाजपचा राजीनामा दिला आहे. जेजेपीचे बंडखोर आमदार रामकुमार गौतम यांना सफिडॉनमधून भाजपचे तिकीट मिळाल्याने संतापलेले बच्चन सिंग आर्य यांनी 4 ओळींमध्ये राजीनामा पत्र लिहून भाजपचे प्राथमिक सदस्यत्व सोडण्याची घोषणा केली.

  • 07 Sep 2024 06:18 PM (IST)

    इंजिनिअर रशीद यांच्या पक्षाने जम्मू-काश्मीर निवडणुकीसाठी जाहीरनामा केला जाहीर

    तुरुंगात असलेले खासदार इंजिनिअर अब्दुल रशीद शेख यांच्या अवामी इत्तिहाद पक्षाने जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यात देशभरातील वेगवेगळ्या तुरुंगात बंद असलेल्या राज्यातील सर्व लोकांची बिनशर्त सुटका करण्याचे आश्वासन दिले आहे.

  • 07 Sep 2024 06:01 PM (IST)

    लखनौच्या ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक मोठी इमारत कोसळली

    उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील ट्रान्सपोर्ट नगरमध्ये एक मोठी इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक लोक ढिगाऱ्याखाली गेल्याची शक्यता आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि प्रशासनाचे पथक दाखल झाले.

  • 07 Sep 2024 03:51 PM (IST)

    डॉ. नीलम गो-हे त्यांच्या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना

    महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो. राज्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपतीबाप्पांचे आगमन झाले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ. नीलमताई गो-हे यांच्या पुण्यातील ” सिल्वर रॉक्स” या निवासस्थानी गणरायाची विधिपूर्वक स्थापना करण्यात आली.

  • 07 Sep 2024 03:40 PM (IST)

    राजेंद्र राऊत यांच्या तोंडी फडणवीस यांचे शब्द- मनोज जरांगे पाटील

    माझं ध्येय आहे गोरगरीब मराठ्याला आरक्षण देणे, गोरगरीब मराठा सोबत मी आहे आणि गोरगरीब मराठे माझ्यासोबत आहेत. मराठ्यांपुढे राजेंद्र राऊत सारखे लोक चिल्लर आहेत. असे किती पण येतात राजेंद्र राऊत यांना दोष देऊन उपयोग नाही, त्यांची भाषा ही देवेंद्र फडणवीस यांची भाषा आहे. फितुरीचे चे संस्कार पुन्हा एकदा ते महाराष्ट्राला दाखवायला लागले, असा आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.

  • 07 Sep 2024 03:32 PM (IST)

    अशोकराव चव्हाण यांच्या निवासस्थानी उत्साहात गणरायाची स्थापना

    खासदार अशोकराव चव्हाण यांच्या नांदेड येथील निवासस्थानी उत्साहात गणरायाची स्थापना करण्यात आली. शांतता टिकून राहावी असे अशोक चव्हाण यांनी गणरायाकडे साकडे घातले.

  • 07 Sep 2024 03:21 PM (IST)

    आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना

    नांदेड दक्षिणचे काँग्रेसचे आमदार मोहन हंबर्डे यांच्या निवासस्थानी गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय त्यांना सरकारने सरसकट मदत करावी, अशी मागणी त्यांनी केली. महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री व्हावा ,पुन्हा आम्हाला महाराष्टाची सेवा करण्याची संधी मिळावी असं साकडं गणरायाकडे घातलं .मी कॉंग्रेसमधून आमदार झालो आणी कॉंग्रेसकडूनच निवडणुक लढवणार आहे , मी भाजपात जाणार नाही, असे ते म्हणाले.

  • 07 Sep 2024 03:10 PM (IST)

    बाप्पा सर्वांचे दुःख हरण करो- नितीन गडकरी

    गणपती विद्येचे दैवत आहे, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान ही मोठी शक्ती आहे. येणारा काळात भारत विश्व गुरु बनणार, तिसरी अर्थव्यवस्था बनणार याचा संबंध विध्येही आहे. भगवान गणपती आपल्याला विश्वगुरू बनण्याच आशीर्वाद देतील या ज्ञानामुळे आपला विकास होईल पण विश्वाचा कल्याण होईल गणेशाचा आशीर्वाद आमच्याही मागे राहील, सुखकर्ता आणि दुःखहर्ता असं गणपतीचं वर्णन आहे. सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे नितीन गडकरी म्हणाले.

  • 07 Sep 2024 03:00 PM (IST)

    आमदार समीर कुणावार यांच्या घरी गणेश आगमन

    हिंगणघाटचे आमदार समीर कुणावार यांच्याकडे बाप्पांचं आगमन झाले. विधिवत पूजा अर्चा करत बाप्पांची प्रतिष्ठापना केली. गणेशोत्सवाला कुणावार कुटुंबीय एकत्र येतात. कुणावार यांचे भाऊ, कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात.

  • 07 Sep 2024 02:57 PM (IST)

    आमदार भास्करराव जाधव यांच्या घरी गणेशाचे आगमन

    जाधव यांचे ढोलकी वादन आणि ढोलकीच्या अभंग गायन लक्षवेधले..

  • 07 Sep 2024 02:30 PM (IST)

    अभिनेता शिव ठाकरे याच्या अमरावतीच्या घरी गणपती बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेचा मोठा सोहळा

    ढोल पथकाच्या निनादात होणार बाप्पाचे आगमन. स्वतः शिव ठाकरे करतोय ढोल वादन..

  • 07 Sep 2024 02:14 PM (IST)

    आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या “गौरव” निवासस्थानी विराजमान झाले गणपती बाप्पा…

    बुद्धीची देवता, सर्वांचे आराध्य दैवत असणाऱ्या गणरायाचे आज घराघरांत वाजत-गाजत स्वागत झाले आहे. त्याच अनुषंगाने आज आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या आग्रोळी येथील “गौरव” निवासस्थानी “श्रीं” चे आगमन झाले असून आमदार मंदाताई म्हात्रे यांनी विघ्नहर्ताची मनोभावी पूजाअर्चा करून आरती करीत प्राणप्रतिष्ठा केली.

  • 07 Sep 2024 02:07 PM (IST)

    काँगेस नेत्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान

    आमदार यशोमती ठाकुर यांनी मनोभावे गणपती बाप्पाची पूजा अर्चना केली. तसेच बळीराजा सुखी समृद्धी होवो अस साकळ त्यांनी लाडक्या गणराया कडे घातलं..

  • 07 Sep 2024 01:57 PM (IST)

    Marathi News: धुळे जिल्ह्यात 661 गणपती मंडळांची नोंदणी

    धुळे जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या धुमधडाकात साजरा होत आहे. यावर्षी पडलेल्या चांगल्या पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापारी आणि सर्वसामान्यांमध्ये आनंद असल्याने गणेश मंडळांनी देखील मोठ्या उत्साहात उत्साह साजरा करण्याचा ठरवला आहे. यंदा धुळे जिल्ह्यात 661 गणपती मंडळांनी पोलिसांकडे नोंदणी केली.

  • 07 Sep 2024 01:44 PM (IST)

    Marathi News: रोहित पवार यांच्या यात्रेला सुरुवात

    राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आज अष्टविनायकापैकी एक असलेल्या सिद्धटेक गणेश मंदिरात पूजा करून स्वाभिमान जनसंवाद यात्रेला सुरुवात केली. या स्वाभिमान यात्रेच्या माध्यमातून कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात जाऊन ग्रामदैवत मंदिरात स्वच्छता केली जाणार आहे.

  • 07 Sep 2024 01:29 PM (IST)

    कास पठारावर फुले उमलली

    जागतिक वारसा स्थळ असणाऱ्या कास पुष्प पठाराचा यावर्षी हंगाम पावसामुळे सप्टेंबर महिन्यात सुरू झाला आहे. सध्या या कास पठारावर विविध फुलांच्या शंभरहून अधिक प्रजाती उमलू लागल्या आहेत. यावर्षी पडलेल्या मुसळधार पावसाने फुलांचा भर कमी असला तरी सप्टेंबर महिन्याच्या शेवटी कास पठारावर मोठ्या प्रमाणात फुले येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

  • 07 Sep 2024 01:10 PM (IST)

    Marathi News: केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना

    पुण्याच्या मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना झाली आहे. सकाळी साडेनऊच्या सुमाराला पारंपरिक पद्धतीने बाप्पांची मिरवणूक काढण्यात आली. साडे अकराच्या सुमाराला गणेश प्रतिष्ठापना करण्यात आली.

  • 07 Sep 2024 01:10 PM (IST)

    Marathi News: दिलीप वळसे पाटील यांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा

    राज्यभरामध्ये आज गणपती बाप्पाचे मोठ्या थाटामाटात आगमन होत आहे. प्रत्येकाच्या घरोघरी आज गणपती बाप्पा विराजमान होत आहेत. सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील घरी आज गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.

  • 07 Sep 2024 12:58 PM (IST)

    माझा राजा लुटारू नव्हता, मी खपवून घेणार नाही – देवेंद्र फडणवीस

    त्यांच्या सरकारलाच खंडणी सरकार म्हटलंय, त्यांना सर्व ठिकाणी खंडणीच दिसेल, असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांना लगावला.

    माझा राजा लुटारू नव्हता, माझ्या राज्याला लुटारू म्हटलेलं मी खपवून घेणार नाही, असा स्पष्ट इशाराही फडणवीस यांनी दिला.

  • 07 Sep 2024 12:45 PM (IST)

    उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी दाखल

    शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, , रश्मी ठाकरे  आदित्य ठाकरे हे लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पोहोचले. बाप्पाच्या चरणी मस्तक टेकवून केली प्रार्थना.

  • 07 Sep 2024 12:31 PM (IST)

    लाडक्या बाप्पांचे परभणीत मोठ्या थाटात आगमन

    लाडक्या बाप्पांचे परभणीत मोठ्या थाटात आगमन, परभणीचे खासदार संजय जाधव यांच्या घरी विराजमान झाला लाडका बाप्पा.  पुढचे दहा दिवस खासदार जाधव यांच्या घरी गणरायाचा मुक्काम असणार.  विधिवत पूजाअर्चा करत  गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली.

  • 07 Sep 2024 12:11 PM (IST)

    लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकऱ्यांचे मला आशीर्वाद आहेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    आज गणपत्ती बाप्पा आला आनंद झाला आहे, राज्यात आनंदमय वातावरण आहे. मी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतो. राज्यात अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत, विकास आणि कल्याणकारी योजनेची सांगड घालण्याचे काम केले आहे.  विरोधकांना सद्बुधी देवो.  देशात महाराष्ट्र हे ग्रोथ इंजिन आहे

    लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडक्या पत्रकारांचे मला आर्शिवाद आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

  • 07 Sep 2024 11:57 AM (IST)

    अमरावतीत दोन मजली इमारत कोसळली

    अमरावतीच्या परतवाडा येथे दोन मजली इमारत कोसळली. ढिगाऱ्याखाली दबून 74 वर्षीय वृद्ध आशा उमेकर यांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमी. मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली असल्याची माहिती. घटनास्थळी परतवाडा पोलीस व जिल्हा आपत्ती पथक दाखल.

  • 07 Sep 2024 11:56 AM (IST)

    गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे यांचं मोठ वक्तव्य

    गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी मोठ वक्तव्य केलं आहे. येणारं सरकार महाविकास आघाडीचे असेल असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत. महाराष्ट्राची राजकारणाची स्थिती सध्या चांगली राहिलेली नाही. जनता महागाईने, फोडाफोडीच्या राजकारणाने त्रस्त आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच पुढच सरकार येऊ दे, यासाठी मी गणरायाकडेही साकडं घातलं आहे.

  • 07 Sep 2024 11:24 AM (IST)

    एकनाथ खडसे यांच्या घरी गणरायाचं आगमन

    मुक्ताईनगर –  एकनाथ खडसे यांच्या घरी पारंपारिक पद्धतीने गणरायाचं आगमन झालं. खडसे कुटुंबीयांनी विधिवत पूजा करत गणरायाची स्थापना केली. बळीराजा सह नागरिक सुखी समाधानी राहू दे, अशी प्रार्थना खडसेंनी गणरायाकडे केली.

  • 07 Sep 2024 11:15 AM (IST)

    राजधानी दिल्लीत देखील गणेश उत्सवाची धूम, महाराष्ट्र सदन प्रशासनामार्फत गणपतीची स्थापना

    राजधानी दिल्लीत देखील गणेश उत्सवाची धूम, दिल्लीतील महाराष्ट्र सदन प्रशासनामार्फत गणपतीची स्थापना.

    जुन्या महाराष्ट्र सदनात थोड्याच वेळात श्री गणेशाची स्थापना होणार.  स्थापनेपूर्वी बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत मोठ्या प्रमाणावर मराठी भाषिक सहभागी झाले.

  • 07 Sep 2024 10:47 AM (IST)

    Maharashtra News: छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख पदी राजू शिंदे यांची निवड

    छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख पदी राजू शिंदे यांची निवड… शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली राजू शिंदे यांची निवड… राजू शिंदे यांच्या निवडीनंतर संजय शिरसाट यांच्या विरोधातला उमेदवार निश्चित… राजू शिंदे यांना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्याची शक्यता.. पश्चिम विधानसभा मतदारसंघातून चंद्रकांत खैरे देखील आहेत इच्छुक…

  • 07 Sep 2024 10:35 AM (IST)

    Maharashtra News: जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक, राजौरी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त

    जम्मू काश्मीर विधानसभा निवडणूक… निवडणुकीच्या निमित्ताने राजौरी जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त… जम्मू-काश्मीरमध्ये 90 जागांच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबरला… आतापासूनच सुरक्षा दल आणि निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी.. दुसरा टप्पा 25 सप्टेंबर आणि तिसरा टप्पा 1 ऑक्टोबर रोजी… 8 ऑक्टोबरला होणार जम्मू-काश्मीर विधानसभेचा फैसला

  • 07 Sep 2024 10:27 AM (IST)

    Maharashtra News: धावत्या रेल्वेत गणपती स्थापन होण्याची गेल्या 28 वर्षांची परंपरा खंडीत

    धावत्या रेल्वेत गणपती स्थापन होण्याची गेल्या 28 वर्षांची परंपरा खंडीत.. 28 वर्षांची परंपरा खंडीत झाल्याची दुर्दैवी घटना… चाकरमान्यांनी रेल्वे स्थानकावर जमत रेल्वे प्रशासनाचा केला निषेध..

  • 07 Sep 2024 09:57 AM (IST)

    खासदार स्मिता वाघ यांच्या घरी बाप्पाचं आगमन

    जळगाव लोकसभेच्या खासदार स्मिता वाघ यांच्या घरी 1991 सालापासून मोठ्या भक्ती भावाने गणेशोत्सव हा साजरा केला जातो.  स्मिता वाघ यांच्या घरी त्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात बाप्पाचं स्वागत होतं. 1991 साली लग्न झाल्यानंतर सासरी आल्यानंतरही त्यांनी ही परंपरा कायम ठेवली. दहा दिवसांच्या बाप्पाची त्या प्राण प्रतिष्ठापना करत असतात.

  • 07 Sep 2024 09:45 AM (IST)

    सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं जल्लोषात स्वागत

    अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी ही मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाचे आगमन झालं आहे. यावेळी सोनालीने टीव्ही 9 मराठीशी संवाद साधला. दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साह कायम आहे. गेली पाच वर्षे ती घरीच मूर्ती बनवत आहे, असं सोनालीने सांगितलं. यंदा सोनाली कुलकर्णीने बाल रूपातील गणपती बाप्पाची मूर्ती साकारली आहे.

  • 07 Sep 2024 09:30 AM (IST)

    छत्रपती संभाजीनगरमध्ये गणेशोत्सवाला सुरुवात

    छत्रपती संभाजीनगरचे ग्रामदैवत संस्थान गणपतीची आज स्थापना होणार आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते थोड्याच वेळात स्थापना होणार आहे. संस्थान गणपती मंदिरातच संस्थान गणपतीची स्थापना केली जाणार आहे. माजी महापौर नंदकुमार घोडेले यांचीही उपस्थिती असणार आहे.

  • 07 Sep 2024 09:15 AM (IST)

    पुण्यातील मानाचा पहिला गणपती कुठे विराजमान होणार?

    पुण्यातील मानाचा पहिला गणपती कसबा गणपती यंदा सिद्धटेक मंदिरात विराजमान होणार आहे. सिद्धटेक मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. मानाच्या कसबा गणपतीची मिरवणूक ही पालखीमधून निघते. ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक निघणार आहे.

Published On - Sep 07,2024 9:06 AM

Follow us
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार
लाडक्या बहिणींनो खुशखबर! 'या' महिन्यानंतर 2100 रुपये मिळणार.
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी
मोफत अन्न बंद करण्यावरून भिकाऱ्यांवर नेम, विखेंच्या प्रतिष्ठेची कोंडी.
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू
'त्याला भाजप संपवतो...म्हणून शिंदे अन् दादांची नार्को टेस्ट करा'- कडू.
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा
मतदारांचा अपमान,संजय गायकवाडांची घसरली जीभ तर अजितदादांचीही उर्मट भाषा.
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप
2 कोटींच्या खंडणीची डील थेट मुंडेंच्या सरकारी बंगल्यावर? धसांचा आरोप.
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.