नवी मुंबई: नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत फोडाफोडीचं राजकारण चांगलंच रंगलं आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे नगरसेवक फोडल्याने पक्षातील गळती थांबवण्यासाठी आता थेट भाजप नेते गणेश नाईकच रिंगणात उतरले आहेत. शिवसेनेच्या गुंडांना अजिबात घाबरू नका. काही लफडे झाले तर मला अर्ध्या रात्री फोन करा. मी येईल. इथल्याच काय आंतरराष्ट्रीय गुंडांनाही गणेश नाईक माहीत आहे, असं गणेश नाईक यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीत शिवसेना विरुद्ध गणेश नाईक असा सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहे. (ganesh naik slams shiv sena in party program)
नेरुळ येथे गणेश नाईक यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नाईक अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेकडून होत असलेल्या फोडाफोडीवरही त्यांनी टीका केली. शिवसेनेकडून दम देऊन नगरसेवक फोडले जात आहेत. शिवसेनेच्या गुंडागर्दीला घाबरू नका. काही लफडे झाले तर मला अर्ध्या रात्री फोन करा. मी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी हजर राहील. हे गुंडले इथले नसून आंतरराष्ट्रीय गुंड फिरतात ना त्यांनाही गणेश नाईक माहीत आहे, असं नाईक म्हणाले.
जाणाऱ्यांचे देव भले करो
तुम्ही आमचे जितके नगरसेवक फोडणार त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू, असा इशाराही त्यांनी यावेळी विरोधकांना दिला. त्यामुळे नवी मुंबईतील विशेषतः शिवसेनेचे कुठले नगरसेवक गणेश नाईक यांच्या तंबूत शड्डू ठोकतील याची उत्सुकता नवी मुंबईकरांना लागली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे नवी मुंबईतील नगरसेवक फोडाफोडीला उधाण आले आहे. मागीलवर्षी सुरेश कुलकर्णी यांच्यासह चार नगसेवकांनी नाईक यांची साथ सोडली होती. आतापर्यत १४ नगरसेवक नाईक यांची साथ सोडून विरोधकांकडे डेरे दाखल झाले आहेत. यावर नाईक याना विचारले असता १९९७ पासून अनेक नगसेवक आमची साथ सोडून जात आहेत. तरी देखील नवी मुंबईकरांनी सत्तेचे दान आमच्याच पारड्यात टाकले आहे. त्यामुळे महाविकास आघाडी असो अथवा कोणतीही मोठी आघाडी असो महापौर आमचाच होणार, असा दावा त्यांनी केला आहे. तर जाणाऱ्यांचे देव भले करो, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
तुम्ही दोन नगरसेवक फोडले त आम्ही चार फोडू
तुम्ही आमचे दोन नगरसेवक फोडले तर आम्ही तुमचे चार फोडू, चार फोडले तर आठ फोडू, तुम्ही जितके फोडला त्याच्या दुपटीने आम्ही तुमचे नगरसेवक फोडू आणि मी एकदा एखादी गोष्ट डोक्यात घेतली तर ती केल्याशिवाय राहत नाही, असा इशाराही त्यांनी दिल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. आजमितीला नवी मुंबईत शिवसेनेचे सर्वाधिक माजी नगरसेवक हे गणेश नाईक यांचे शिष्य राहिले आहेत. त्यामुळे पूर्वाश्रमीच्या द्रोणाचार्याला कुठले एकलव्य पुन्हा एकदा गुरूदक्षिणा देऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का देणार? अशी चर्चा सध्या नवी मुंबईत रंगू लागली आहे. (ganesh naik slams shiv sena in party program)
VIDEO : Pune Water Supply : पुणे शहरांचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद राहणार#Pune #PuneWaterSupply pic.twitter.com/m58SsCjoCY
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2021
संबंधित बातम्या:
नवी मुंबईत महाविकास आघाडीमध्ये धुसफूस, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खोळंबा होणार?
गुटखा किंग राजन गुप्ताला अटक, शिवसेना पदाधिकारी असल्यानं खळबळ
राणे महाराष्ट्राचे दबंग नेते, झोप विसरून मेहनत करतात; फडणवीसांची स्तुतीसुमनं
(ganesh naik slams shiv sena in party program)