Loksabha Election 2023 : इंडिया आघाडीमध्ये गँगवॉर सुरु… लोकसभा निवडणुकीआधी शिंदे गटाचा मास्टरस्ट्रोक
आमच्या महायुतीत खूप चांगला समन्वय आहे. पक्षवाढीसाठी त्या त्या पातळीवर काम करावे लागते. त्यासाठी लोकसभा निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या त्या विभागात हे निरीक्षक काम करणार आहेत.
मुंबई | 5 डिसेंबर 2023 : पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तीन मोठ्या राज्यात भाजपची सत्ता आली. या निवडणुकीचा परिणाम महाराष्ट्रातही होणार आहे. भाजपला मिळालेल्या या यशामुळे शिंदे गट आणि अजितदादा गटामध्ये उत्साह आहे. तर, इंडिया आघाडीमध्ये निराशेचे पसरले. अशातच इंडिया आघाडीची होणारी बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. यावरून शिंदे गटाने जोरदार टीका केलीय. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनाही टोला लगावलाय. त्याचसोबत शिंदे गटाने आगामी लोकसभेसाठी निरीक्षक जाहीर करत मास्टरस्ट्रोकही मारलाय.
नरीमन पाँईट येथील शिवसेना (शिंदे गट) येथील बाळासाहेब भवन या पक्ष कार्यालयात प्रवक्त्या आमदार मनीषा कायंदे यांनी लोकसभा निरीक्षकांची यादी जाहीर केली. यावेळी बोलताना त्यांनी इंडिया आघाडीवर टीका केलीय. इंडिया आघाडीच्या बैठकीला नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि अखिलेश यादव यांनी पाठ फिरवली. इंडिया आघाडीमध्ये आता गँगवॉर सुरु झाले आहे. त्यांच्यात आपसात वाद सुरु झाले आहेत, अशी टीका आमदार मनीषा कायंदे यांनी केली.
इंडिया आघाडीच्या नेत्यांचे एकमेकांवर दोषारोप सुरू आहेत. त्यांचे अलायन्स टिकणं कठीण आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या राज्याच्या निकालानंतर ‘मन मन मोदी’ असे म्हणायची वेळ आली आहे, असे आमदार कायंदे म्हणाल्या. बीड येथे शासन माझ्या दारी हा उपक्रम झाला. यावरून उद्धव ठाकरे यांनी टीका केली. त्याला उत्तर देताना ‘एक माजी मुख्यमंत्री राज्य सरकारच्या चांगल्या कार्यक्रमाला बोगस म्हणतायत हे दुर्दैव आहे. अनेक मुख्यमंत्री होऊन गेले त्यानी असे कधी म्हटलं नाही. १ कोटीहून अधिक लोकांना यातून फायदा झालाय असे त्या म्हणाल्या.
उद्धव ठाकरे हे धारावी येथे मोर्चा काढणार आहेत. त्यावर बोलताना ‘तुम्ही मुख्यमंत्री असताना धारावीसाठी काय केलं हे त्यानी सांगावं. आता त्यांचा स्वार्थ काय आहे हे तेच सांगू शकतील. मात्र, सरकार एकेक प्रकल्प राबवत असताना असा प्रश्न उपस्थित करणं चुकीचे आहे. माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी ही घराणेशाही त्यांच्यात आहे. सोनिया गांधी यांचेही तसेच आहे. मी आणि माझी मुल एवढंच त्या पहात असतात अशी जोरदार टीका मनीषा कायंदे यांनी यावेळी केली.
बीड येथील कार्यक्रमात भाजप नेत्या पंकजा मुंडे या सहभागी झाल्या. ही चांगली गोष्ट आहे. आमच्या महायुतीत खूप चांगला समन्वय आहे. पक्षवाढीसाठी त्या त्या पातळीवर काम करावे लागते. त्यासाठी लोकसभा निरीक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. त्या त्या विभागात हे निरीक्षक काम करणार आहेत, अशी माहिती आमदार कायंदे यांनी दिली.
शिंदे गटाचे ११ विभागीय संपर्क नेते जाहीर
मंत्री उदय सामंत – कोकण विभाग
नरेश म्हस्के – ठाणे पालघर
सिद्धेश कदम आणि किरण पावसकर – मुंबई उपनगर
आनंदराव जाधव – मराठवाडा | लातूर, नांदेड, हिंगोली, धाराशिव
अर्जुन खोतकर – मराठवाडा | जालना, संभाजीनगर, परभणी, बीड
भाऊसाहेब चौधरी – उत्तर महाराष्ट्र | नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नगर
विजय शिवतारे – पश्चिम महाराष्ट्र | सातारा, सांगली, कोल्हापूर
संजय माशिलकर – पुणे सोलापूर
दीपक सावंत – पूर्व विदर्भ | नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली
विलास पारकर – पश्चिम विदर्भ | बुलढाणा, अकोला, अमरावती
विलास चावरी – पश्चिम विदर्भ | वाशीम, यवतमाळ, वर्धा
कोणत्या नेत्यावर कोणत्या लोकसभेची जबाबदारी
नंदुरबार – राजेश पाटील
धुळे – प्रसाद ढोमसे
जळगाव – सुनील चौधरी
रावेर – विजय देशमुख
बुलढाणा – अशोक शिंदे
अकोला – भूपेंद्र कवळी
अमरावती – मनोज हिरवे
वर्धा – परमेश्वर कदम
रामटेक – अरुण जगताप
नागपूर – अनिल पडवळ
भंडारा-गोंदिया – आशिष देसाई
गडचिरोली चिमूर – मंगेश काशीकर
चंद्रपूर – किरण लांडगे
यवतमाळ वाशीम – गोपीकिशन बजौरीया
हिंगोली – सुभाष सावंत
नांदेड – दिलीप शिंदे
परभणी – सुभाष साळुंखे
जालना – विष्णू सावंत
छत्रपती संभाजी नगर – अमित गिते
दिंडोरी – सुनील पाटील
नाशिक – जयंत साठे
पालघर – रवींद्र फाटक
भिवंडी – प्रकाश पाटील
रायगड – मंगेश सातमकर
मावळ – विश्वनाथ राणे
पुणे – किशोर भोसले
शिरुर – अशोक पाटील
नगर – अभिजित कदम
शिर्डी – राजेंद्र चौधरी
बीड – डॉ विजय पाटील
धाराशिव – रवीद्र गायकवाड
लातूर – बालाजी काकडे
सोलापूर – इरफान सय्यद
माढा – कृष्णा हेगडे
सांगली – राजेश क्षीरसागर
सातारा -शरद कणसे
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – राजेंद्र फाटक
कोल्हापूर – उदय सामंत
हातकणंगले – योगेश जानकर