टायगर इज बॅक… लवकरच मैदानात, महेश गायकवाड यांच्या बॅनर्सची कल्याण-डोंबिवलीत चर्चा

भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारात जखमी झालेले शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महेश गायकवाड यांची प्रकृती आता सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. त्यांच्या स्वागतासाठी कल्याण - डोंबिवलीमध्ये लावलेल्या बॅनर्सची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.

टायगर इज बॅक... लवकरच मैदानात, महेश गायकवाड यांच्या बॅनर्सची कल्याण-डोंबिवलीत चर्चा
Follow us
| Updated on: Feb 16, 2024 | 10:23 AM

सुनील जाधव, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, कल्याण | 16 फेब्रुवारी 2024 : भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगर पोलिस स्टेशनमध्ये केलेल्या गोळीबारामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला. या गोळीबारात शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील हे दोघेही गंभीर जखमी झाले. २ फेब्रुवारीला झालेल्या या हल्लानंतर तब्बल १४ दिवसांपासून महेश गायकवाड यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्ते व समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण असून कल्याण पूर्वेत मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात येत आहे.

गायकवाड यांच्या स्वागतासाठी बॅनरबाजी

मृत्यूच्या दाढेतून परत आलेले महेश गायकवाड यांच्या स्वागतासाठी कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात बॅनर्स लावण्यात आले आहेत. ‘ गोर गरीबाचा कैवारी’… ‘टायगर इज बॅक’, हेच प्रेम हेच आशीर्वाद, जनतेचा रथ पुन्हा लवकरच मैदानात येणार, महेश गायकवाड कल्याणकर तुमचे स्वागत करीत आहोत अशा आशयाचे बॅनर सगळीकडे झळकत आहेत. तर दुसरीकडे महेश गायकवाड शहर प्रमुख, माजी नगरसेवक, भावी आमदार अशा आशयाचे बॅनरही काही ठिकाणी झळकत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

14 दिवसांपासून उपचार सुरू

उल्हासनगर हिल लाईन पोलीस ठाण्यात, वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या कार्यालयात गणपत गायकवाड यांनी शुक्रवार 2 फेब्रुवारीला महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादावरून गोळ्या झाडल्या होत्या. या गोळीबारात महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे दोघांना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. गेल्या 14 दिवसांपासून त्या दोघांवरही उपचार सुरू होते. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असल्याने दुपारी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे. तब्बल 14 दिवसानंतर घरी परतत असल्याने महेश गायकवाड व राहुल पाटील यांचे, कार्यकर्ते व समर्थकांकडून दुपारी जंगी स्वागत करत. ठाण्यात व कल्याण मध्ये शक्ती प्रदर्शन देखील करण्यात येणार आहे.

'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, राज-उद्धव ठाकरेंमध्ये काय संवाद?.
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.