Ganpati Visarjan 2023 LIVE : तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दिनांचा नाथा
Ganpati Visarjan and Celebration 2023 LIVE Updates : लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा क्षण हळूहळू जवळ येत आहे. ठिकठिकाणी गणपती मिरवणुकीला सुरुवात झालीये. गणेशभक्तांच्या डोळ्यात मात्र पाणी पाहायला मिळत आहे. गणपती विसर्जनाचे सर्व अपडेट वाचा एका क्लिकवर...
मुंबई | 28 सप्टेंबर 2023 : आज अनंत चतुर्दशी आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात दिवस आहे. ठिकठिकाणी गणपती मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह पुण्यातही लाडक्या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. अनेक सार्वजनिक गणेशमंडळांच्या मिरवणुकींना सुरुवात झाली आहे. त्यामुळे मुंबई पुण्यासह नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, नांदेड, बीड, सोलापूर यासह अन्य शहर आणि ग्रामिण भागातील गणपती विसर्जन तुम्हाला पाहता येणार आहे. ठिकठिकाणचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. या शिवाय राजकीय घडमोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. त्यासाठी आज दिवसभर हा लाईव्ह ब्लॉग फॉलो करा. एका क्लिकवर तुम्हाला तुमच्या शहरातील गणपती विसर्जनाची माहिती मिळणार आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
१६ अपात्र आमदारांबाबत सुप्रीम कोर्टात ६ ऑक्टोबरला सुनावणी
मुंबई : १६ अपात्र आमदारांबाबत सुप्रीम कोर्टात ६ ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे अशी माहिती मिळतेय. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्ष यांना दोन आठवड्याची वेळ दिली होती. ती वेळ 6 तारखेला संपत आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात ६ तारखेलाच सुनावणी होईल अशी शक्यता आहे.
-
जुहूच्या समुद्रात बुडून स्वयंसेवकाचा मृत्यू
मुंबई : मुंबईत गणेश विसर्जन दरम्यान जुहू समुद्रकिनाऱ्यावरून एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावर विसर्जनासाठी तैनात असलेल्या एका स्वयंसेवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. हसन युसूफ शेख असे मृताचे नाव आहे. तरुणाला महापालिकेच्या कुपर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे कूपर रुग्णालयातील डॉक्टरांकडून सांगण्यात आले.
-
-
गणेश विसर्जनासाठी आलेले दोन युवक पाण्यात बुडाले
कर्जत : भिवपुरी येथील उल्हासनदीत गणेश विसर्जनासाठी आलेले दोन भक्त पाण्यात बुडाले आहे. उकृळ येथील चौघे जण गणेश विसर्जन करण्यासाठी नदीत आले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते चोघे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. यातील एक जण सुखरूप बाहेर पडला तर दुसऱ्याचा मृतदेह मिळाला. तर दोघे जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती मिळतेय.
-
शिवमहिमा नृत्याने गणेश विसर्जन मिरवणूकीला आले भक्तीमय स्वरूप
वाशीम : गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये वाशीम येथील हेडा परिवाराने भव्य महाप्रसादाचे आयोजन केले, तब्बल ५० हजार भाविकांना बेसण, पोळी, भात आणि मिष्टान्न अशा महाप्रसादाची सोय केली आहे. हेडा परिवार मागील १३ वर्षांपासून विसर्जन मिरवणुकीत हरिद्वार येथील शिवमहिमा नृत्य कलाकारांना पाचारण करते. शिव महिमा कलाकारांनी पारंपारीक नृत्याविष्कार सादर करून भक्तीमय वातावरण निर्माण केले.
-
मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत शरद पवार सहभागी होणार, आमदार रवी राणा यांचा दावा
अमरावती : अजित पवार यांच्यानंतर आता 15 ते 20 दिवसात मोदींच्या नेतृत्वाखाली सत्तेत शरद पवार सहभागी होणार असा खळबळजनक दावा आमदार रवी राणा यांनी केलाय. शरद पवार केंद्रात आणि राज्यात मोदींना साथ देतील. राजकारणात काहीही शक्य नाही पण अशक्यही नाही असे ते म्हणाले.
-
-
Pune News : मानाचा पाचवा गणपती होणार विसर्जित
मानाचा पाचवा गणपती केशरीवाड्यातील टिळक गणपती विसर्जनासाठी दाखल झाला आहे. थोड्या वेळात मानाचा पाचवा गणपतीही विसर्जित होणार आहे.
-
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती विसर्जन घाटाकडे मार्गस्त
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपती अलका चौकातून विसर्जन घाटाकडे मार्गस्त झालाय. काही वेळामध्येच आता केसरीवाडा गणपतीचे विसर्जन केले जाईल.
-
मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतला समुद्रावरील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा
अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईत गणपती विसर्जन सुरू आहे. गणपती विसर्जन स्थळावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते याच गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त देखील ठेवण्यात आला आहे. मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरील पोलीस बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्थेचा मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी आढावा घेतला आहे.
-
Pune News : मानाचा चौथा गणपती तुळशीबाग घाटावर पोहोचला
मानाचा चौथा गणपती तुळशीबाग घाटावर पोहोचला आहे. अगदी थोड्याच वेळात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे.
-
दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक लक्ष्मी रोडवर दाखल झालीये. गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गणेशभक्तांनी लक्ष्मी रोडवर प्रचंड गर्दी केलीये.
-
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक अलका चौकात
मानाचा पाचवा केसरीवाडा गणपतीची मिरवणूक आता अलका चौकात पोहचलीये. यावेळी भाविकांनी मोठी गर्दी केल्याचे बघायला मिळतंय.
-
वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जोरदार तयारी
गुजरात: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेची तयारी सुरू आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 14 ऑक्टोबरला भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे.
गुजरात: तस्वीरें अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम से हैं, जहां आईसीसी विश्व कप 2023 की तैयारी चल रही हैं।
14 अक्टूबर को अहमदाबाद के नरेंद्र मोदी स्टेडियम में भारत का मुकाबला पाकिस्तान से होगा। pic.twitter.com/nyRilcJOVI
— ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2023
-
राहुल गांधी यांची दिल्लीतील फर्निचर मार्केटला भेट
दिल्ली : काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी कीर्ती नगर येथील फर्निचर मार्केटला भेट दिली आणि तेथील सुतारांशी चर्चा केली.
दिल्ली: कांग्रेस सांसद राहुल गांधी ने कीर्ति नगर में फर्नीचर बाजार का दौरा किया और वहां कारपेंटर से बातचीत की।
(तस्वीरें: कांग्रेस) pic.twitter.com/ZK63fadbFB
— ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2023
-
वनडे वर्ल्डकपसाठी माजी क्रिकेटपटू सौरव गांगुलीने टीम इंडियाबाबत केलं असं वक्तव्य
भारताचा माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली म्हणाला, ” विश्वचषक ही एक मोठी स्पर्धा आहे. भारत खूप चांगले खेळत आहे, ही आनंदाची बाब आहे. आम्हाला आशा आहे की पुढील 45 दिवस ते असेच चांगले खेळत राहतील.”
#WATCH कोलकाता: पूर्व भारतीय क्रिकेटर सौरव गांगुली ने कहा, "यह एक बड़ा विश्व कप होने जा रहा है। विश्व कप एक बड़ा टूर्नामेंट है। भारत बहुत अच्छा खेल रहा है, यह खुशी की बात है। हमें उम्मीद है कि वे अगले 45 दिनों तक इसी तरह अच्छा क्रिकेट खेलते रहेंगे।" pic.twitter.com/G0GTiBfHaK
— ANI_HindiNews (@AHindinews) September 28, 2023
-
ताश्कंदमधील गोदामात स्फोट, एक ठार आणि 162 जण जखमी
उझबेकिस्तानची राजधानी ताश्कंद येथे गुरुवारी एका गोदामात झालेल्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला तर 162 जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, गुरुवारी सकाळी दक्षिणेकडील ताश्कंदमधील एका गोदामात स्फोट झाला. परंतु एवढा मोठा स्फोट कशामुळे झाला हे अस्पष्ट आहे.
-
Ganpati Bappa Morya : मिरवणुकीसाठी भाविकांची तुफान गर्दी
मानाचे आणि अनेक मंडळाचे गणपती आता विसर्जनाच्या दिशेने निघाले आहे. राज्यातील अनेक शहरात मोठ्या संख्येने भाविक भक्त रस्त्यावर उभी आहेत. त्यांना या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायचे आहे. मिरवणुकीसाठी भाविकांनी तुफान गर्दी केल्याचे चित्र मुंबई, पुण, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अकोला, नांदेड, नागपूरसह सर्वच शहरात दिसत आहे. अबालवृद्धांसह अनेक नेते आणि कलाकारांचा मिरवणुकीत सहभागी आहेत.
-
Ganpati Bappa Morya : पुण्यातील मानाच्या कसबा गणपतीचं विसर्जन
पुण्यातील मानाच्या कसबा गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. भक्तीमय वातावरणात कसबा गणपतीचे विसर्जन करण्यात आले. रात्री जास्त उशीर होऊ नये यासाठी प्रशासन खबरदारी घेत आहे. तसेच भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी अनेक ठिकाणी सोयी-सुविधा देण्यात येत आहे. पोलीस प्रशासन पण सतर्क आहे.
-
Ganpati Bappa Morya : साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप
आज भाविकांनी लाडक्या बाप्पाला साश्रू नयनांनी निरोप दिला. मेघगर्जनेसह पाऊस पडत असताना कंठ दाटून आलेल्या भक्तांनी डोळ्यातील आश्रूंना वाट मोकळी करुन दिली. लहानग्यांना तर हुंदके आवरता आले नाही. भक्तीमय वातावरणात अनेकांनी लाडक्या बाप्पाला निरोप दिला आणि त्याच्याकडून पुढील वर्षी लवकर येण्याचे वचन घेतले.
-
Ganpati Bappa Morya : रस्ते भाविकांनी फुलले
मुंबई, पुण्यातील मानाचे गणपती मार्गस्थ झाले आहेत. इतर शहरातील बाप्पांनी पण आगेकूच सुरु केली आहे. बाप्पांची मनोभावे पुजा-अर्चना, आरती करुन त्यांना निरोप देण्यात येत आहे. प्रत्येक शहरातील रस्ते भाविकांनी फुलून गेले आहेत. सगळीकडे भक्तीमय वातावरण आहे. त्यातच अनेक ठिकाणी वरुणराजाने जलाभिषेक सुरु केल्याने भाविक सुखावून गेले आहेत. मिरवणुकीला थोरमोठ्यांसह लहान मुलांमध्ये उत्साह दिसून येत आहे.
-
श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक गणाधीश रथातून निघणार
पुण्याच्या प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ गणपतीची विसर्जन मिरवणूक यंदा गणाधीश रथातून निघणार आहे.
-
वसई आणि विरारमध्ये दहा दिवसांच्या बाप्पाचे थाटामाटात विसर्जन सुरु
वसई आणि विरार परिसरात दहा दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी पोलिस,पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. वसई – विरार हद्दीत कृत्रिम तलाव सह छोटेमोठे अशा 109 ठिकाणी बाप्पाचे विसर्जन होणार आहे.
-
लालबागच्या राजावर प्रवेशद्वाराजवळ पुष्पवृष्टी
लालबागच्या राजाची डोळ्याचं पारणे फेडणारी मिरवणूक सुरु झाली असून लालबागच्या राजावर प्रवेशद्वाराजवळ भक्तांनी पुष्पवृष्टी केली आहे.
-
Ganpati Visarjan 2023 | मानाचा तिसरा गणपती गुरूजी तालीमवर गुलालाची मोठी उधळण
पुण्याचा राजा आणि मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम बेलबाग चौकात आला असून मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून गुलालाची मोठी उधळण करण्यात आली. फुलांच्या “रामराज्य” रथात पुण्याचा राजा विराजमान झाला आहे.
-
Ganpati Visarjan 2023 | पुण्यातील मानाचा चौथा गणपती तुळशीबाग गणपती मंडई चौकात दाखल
पुणेकरांचा चौथा मानाचा गणपती तुळशीबाग गणपती मंडई चौकात दाखल झाला आहे. गुलाल उधळत, मोठ्या जल्लोषात गणरायाला निरोप दिला जात आहे. मिरवणुकीत भाविकांची गर्दी जमली आहे.
-
Ganpati Visarjan 2023 | पुण्याचे पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक मिरवणुकीत थिरकले
पुण्याचे पोलीस सह-आयुक्त संदीप कर्णिक विसर्जन मिरवणुकीत थिरकले. गुलालाची उधळण होत असताना खांद्यावर चढून नाचले. उद्योगपती पुनीत बालन यांच्यासोबत कर्णिक यांनी ठेका धरला. मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीत नाचण्याचा मोह कर्णिक यांना आवरला नाही.
-
Ganpati Visarjan 2023 | विसर्जन मिरवणुकांसाठी वाहतूक पोलिसांकडून नियंत्रण कक्ष स्थापन
गिरगाव, दादर, जुहू, मालाड, मालवणी टी जंक्शन आणि गणेशघाट पवई यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी वाहतूक पोलिसांनी नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत. गणेशमूर्तींच्या विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात आलं आहे.
-
Ganpati Visarjan 2023 | विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईत वाहतूक बदल
गणपती विसर्जन मिरवणुकांमुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन मुंबईत वाहतूक बदल करण्यात आले आहेत. अनेक भागांतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी 10 विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. आज मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत सीएसएमटी-कल्याण, ठाणे, बेलापूरदरम्यान विशेष लोकल धावणार आहेत.
-
Ganpati Visarjan 2023 | पुण्यातील मानाचा दुसरा गणपती बेलबाग चौकात
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती बेलबाग चौकात पोहोचला असून त्याठिकाणी देखावा, वादन आणि पारंपरिक खेळ सुरू आहेत. भस्म उधळत बेलबाग चौकात शीवतांडव नृत्य सादर केलं जात आहे.
-
Ganpati Visarjan 2023 | संस्थान गणपती विसर्जन मिरवणुकीला काही वेळात सुरुवात
छत्रपती संभाजीनगरमधली संस्थान गणपती विसर्जन मिरवणुकीला काही वेळात सुरुवात होणार आहे. पालकमंत्री संदीपान भुमरे, अतुल सावे, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, चंद्रकांत खैरे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे विसर्जन मिरवणूक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
-
Ganpati Visarjan 2023 | नाशिकमधील विसर्जन मिरवणूक
नाशिकमधील विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात होणार सुरुवात होणार आहे. पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत ही मिरवणूक होणार आहे. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत 20 हून अधिक सार्वजनिक मंडळांचा सहभाग असणार आहे.
-
Ganpati Visarjan 2023 : पुण्यातील केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात
पुण्यातील केसरीवाडा गणपतीच्या मिरवणूकीला सुरूवात झाली आहे. मानाच्या पाच गणपतींपैकी एक असलेल्या केसरीवाडा गणपतीची भव्य मिरवणून काढण्यात येत आहे. मिरवणूकीत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येत आहे.
-
Ganesh Visarjan 2023 : तेजुकायाचा गणपती लालबाग भागात दाखल
मुंबईचा मानाच्या गणपतींपैकी एक असलेला तेजुकाया गणपतीची भव्य मिरवणूक निघाली आहे. या मिरवणूकीत शेकडो भाविक सामिल झाले आहेत. गणपती मिरवणूक लालबाग भागापर्यंत पोहोचली आहे.
-
Ganesh Visarjan 2023 : मुंबईत गणेश विसर्जनासाठी 19 हजार पोलिस कर्मचारी तैनात
मुंबईत गणेश विसर्जनासाठी 19 हजार पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. मिरवणूकीवर ड्रोन आणि सीसीटीव्ही द्वारे नजर ठेवण्यात येत आहे. गणेश विसर्जानाच्या पार्श्वभूमीवर पोलिस कर्मचाऱ्याची सुट्टी रद्द करण्यात आली आहे.
-
Ganesh Visarjan 2023 : पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठा पोलिस बंदोबस्त
पुण्यात गणेश विसर्जनासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तब्बल 9 हजारांपेक्षा अधिक पोलिस कर्मचारी बंदोबस्ताची धुरा सांभाळत आहेत. विसर्जानाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.
-
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईचा राजावर स्थानिकांकडून पुष्पवृष्टी
मुंबईचा राजावर स्थानिकांकडून पुष्पवृष्टी करण्यात येत आहे. मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेल्या या गणपतीच्या मिरवणूकीत हजारोंच्या संख्येने भाविक सामील झाले आहेत.
-
Ganesh Visarjan 2023 : लालबागच्या राजाच्या मिरवणूकीला थोड्याच वेळात सुरूवात
लालबागचा राजा गणपतीच्या मिरवणूकीला थोड्याच वेळात सुरूवात होणार आहे. गिरगाव चौपाटीवर बाप्पाचे विसर्जन करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
-
Ganesh Visarjan 2023 : राजा तेजुकायाच्या मिरवणुकीला मोठी गर्दी
आज गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. मुंबईच्या मुंबईच्या राजा तेजुकाया गणपतीची भव्य मिरवणून काढण्यात येत आहे. मिरवणूकीला मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.
-
Ganpati Visarjan | जुहू बीचवर विसर्जनाची तयारी पूर्ण, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे ठेवणार लक्ष
मुंबईतील जुहू बीचवर विसर्जनाची तयारी प्रशासनाकडून पूर्ण झाली आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुहू समुद्रकिनारी होणाऱ्या विसर्जनावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवण्यात येणार आहे. विसर्जनादरम्यान भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी प्रशासन घेत आहे.
-
Ganpati Visarjan | गणेशगल्लीच्या गणरायावर फुलांची उधळण
मुंबईत मानाच्या गणपतींच्या विसर्जनला उत्साहात सुरूवात. मुंबईचा राजा अर्थात गणेशगल्लीच्या गणपतीवर भाविकांतर्फे फुलांची उधळण.
-
Ganpati Visarjan | तेजूकायाची विसर्जन मिरवणूक सुरू
बाप्पा निघाले गावाला, चैन पडेना आम्हाला.. अशीच भावना सध्या राज्यभर दिसत आहे. मुंबईतही तेजूकायाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीला उत्साहात सुरूवात. गुलाल उधळत, ढोल ताशांच्या गजरात भाविक मिरवणुकीत सहभागी.
-
Ganpati Visarjan | गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपतींच्या विसर्जनला सुरूवात
मुंबईतील गिरगाव चौपाटीवर घरगुती गणपती विसर्जनसाठी दाखल. ‘पुढच्या वर्षी लौकर या’ च्या गजरात साश्रू नयनांनी भाविकांचा बाप्पाला निरोप.
-
Ganpati Visarjan | बुलढाण्यात गणेश विसर्जनासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सज्ज
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बुलढाणा जिल्हा प्रशासन व पोलीस दल सज्ज आहे. मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी २५०० पोलीस , १५०० होमगार्ड व एक राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी तैनात केली आहे. संपूर्ण मिरवणुकीवर ड्रोन कॅमेरा द्वारे लक्ष ठेवले जाईल.
-
Ganpati Visarjan | लालबागच्या राजाला स्वरांजली बँड पथकाची सलामी
मुंबईत गणेश विसर्जनाला सुरूवात झाली आहे. लालबागचा राजाही मंडपाबाहेर आला आहे, लाडक्या गणरायाला स्वरांजली बँड पथक सलामी देत आहे. गुलाल उधळत, मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.
-
Ganpati Visarjan | मुंबईतील दादर चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण
मुंबईतील दादर चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. चौपाटीवर 25 जीव रक्षकांची तैनात करण्यात आले आहे. संपूर्ण दादर चौपाटी परिसरामध्ये बांबूची बारिकेटिंग केली गेली आहे. समुद्राला भरती येणार असल्यामुळे खोल समुद्रात निसर्जनासाोटी जाऊ नये, असे मनपाने सांगितले आहे.
-
Ganpati Visarjan | मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात
मुंबईच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. जल्लोषात विसर्जन मिरवणूक काढण्यात येत आहे. ढोल ताशाच्या गजरात बाप्पाची भव्य दिव्य अशी विसर्जन मिरवणूक सुरु झाली आहे.
-
Ganpati Visarjan | तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात
पुण्यातील मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपतीच्या मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे. पारंपारिक पालखीतून पुण्याच्या मानाच्या दुसऱ्या गणपतीची विसर्जन मिरवणूक ९.४५ मिनिटांनी सुरु होणार आहे.
-
Ganpati Visarjan | कसबा गणपतीची पूजा
कसबा गणपतीची पूजा सुरु झाली आहे. थोड्या वेळात गणपती बाप्पाची मिरवणूक निघणार आहे. कसबा गणपती पुणे येथील मानाचा पहिला गणपती आहे. विसर्जन मिरवणुकीत हा गणपती पहिल्या स्थानावर असतो.
-
Ganpati Visarjan | पुण्यात थोड्याच वेळात सुरू गणपती विसर्जन मिरवणुका
पुण्यात थोड्याच वेळात सुरू गणपती विसर्जन मिरवणुका सुरु होत आहे. पुण्यातील मंडई चौकापासून विसर्जन मिरवणूक सुरू होणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पहिल्या मानाच्या गणपतीची आरती करून मिरवणूक सुरू होणार आहे.
-
दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर चेंडा वादनला सुरुवात
पुण्यातील केरळी बांधव दरवर्षी चेंडा वादन करतात. केरळी पारंपरिक वाद्य वाजवून गणपती बाप्पाची सेवा करतात दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या बाहेर वादन सुरू झालं आहे. लाडक्या बाप्पाच्या सेवेसाठी हे गणेशभक्त दाखल झाले आहेत.
-
गणपती विसर्जनानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये वाहतूकीत बदल
सालाबाद प्रमाणे येणाऱ्या अनंत चतुर्दशी म्हणजेच लाडक्या गणपती बाप्पांचे विसर्जन तसेच ईद-ए-मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे,विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांना शहरात बंदी असेल तसेच पोलिसांना दिलेला पर्यायी मार्गांचा वापर करावा असे आवाहन देखील पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे याबाबत सविस्तर माहिती पोलीस आयुक्त मनोज लोहिया आणि वाहतूक शाखा सहाय्यक पोलीस आयुक्त धनंजय पाटील यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली आहे.
-
Pune Ganpati Visarjan 2023 : विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज
विसर्जन मिरवणुकीसाठी पुणे पोलीस प्रशासन सज्ज झाली आहे. 9 हजार पेक्षा अधिक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शहरभर तैनात करण्यात आले आहेत. शहरातील सर्व मुख्य रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 1800 पेक्षा अधिक सीसीटीव्हीची करडी नजर आज या मिरवणुकींवर असणार आहे. शहरात जड वाहनांना पूर्णपणे बंदी करण्यात आली आहे. 2000 पेक्षा अधिक गणेश मंडळांच्या गणपतीचं आज विसर्जन होणार आहे.
Published On - Sep 28,2023 7:35 AM