आग विझवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या 3 जवानांसह ७ जखमी

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. तेव्हा अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

आग विझवताना गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट, अग्निशमन दलाच्या 3 जवानांसह ७ जखमी
Follow us
| Updated on: Jan 10, 2021 | 8:10 AM

ठाणे: शनिवारी रात्री 11.30च्या सुमारास ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील राम नगर रोड क्रमांच 28 इथल्या एका रिक्षाच्या स्पेअर पार्ट्सच्या दुकानाला भीषण आग लागली होती. ही आग विझवण्यासाठी स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केलं. अग्निशमन दलाच्या जवानांनीही आग विझवण्यास सुरुवात केली. मात्र, त्यावेळी एका घरगुती गॅस सिलिंडरचा एक भीषण स्फोट झाला. या स्फोटात अग्निशमन दलाचे 3 जवान जखमी झाले आहेत.(Gas cylinder explodes while extinguishing fire in Thane)

अग्निशमन दलाचे जवान आग विझवण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी झाली होती. तेव्हा अचानक घरगुती गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, त्यात अग्निशमन दलाचे 3 जवान आणि 4 नागरिक जखमी झाले आहेत. जखमींना तातडीनं ग्लोबल हॉस्पिटल ठाणे इथं उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. सुदैवाची बाब म्हणजे यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, गॅस सिलिंडरच्या स्फोटात आजूबाजूची 3 ते 4 दुकानंही जळून खाक झाली आहेत.

डोंबिवली-ठाण्यात आगींचं सत्र कायम

डोंबवलीतील खंबाळ पाडा परिसरातील शक्ती प्रोसेस कंपनीला 18 डिसेंबर 2020 रोजी भीषण आग लागली होती. त्यावेळी आगीने रौद्ररुप धारण केलं होतं. धुराचे प्रचंड लोट उठत होते. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं. या आगीत संपूर्ण कंपनीच जळून खाक झाली होती. अग्निशमन दलाच्या जवानांनी सलग 4 तासांच्या अथक परिश्रमानं या आगीवर नियंत्रण मिळवलं होतं. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नव्हती. पण कंपनीतील जवळपास 6 कोटी रुपये किमतीचा कपड्याचा माल जळून खाक झाला होता. डोबिंवली परिसरात आगीच्या घटना सातत्यानं घडत असल्यामुळे बेकायदा भंगार गोदाम आणि केमिकल कंपन्यांवर कारवाईची मागणी होत आहे. मात्र, प्रशासनाकडून काही ठोस कारवाई होताना दिसत नाही

संबंधित बातमी:

डोंबिवली एमआयडीसीत कंपनीला भीषण आग, सहा कोटींचा माल जळून खाक

Gas cylinder explodes while extinguishing fire in Thane

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.