गौतमी पाटीलने स्पष्टचं सांगितलं, माझ्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही म्हणत गौतमी पाटील भडकली…
गौतमी पाटील हिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत, गौतमी पाटील हीच्या व्हिडिओवर अक्षरशः लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असतो. तिच्या कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणी केली जात असतांना गौतमी पाटील हिने त्यावर उत्तर दिले आहे.
योगेश बोरसे, टीव्ही 9 मराठी, पुणे : गेल्या काही दिवसांपासून नृत्यांगणी गौतमी पाटील वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. तिच्या कार्यक्रमांवर बंदी घाला म्हणून मागणी केली जात आहे. तीच्या कार्यक्रमांना ठिकठिकाणी विरोध केला जात असल्याचेही समोर आले आहे. गौतमी पाटील हीच्या नृत्याने महाराष्ट्रातील तरुणांना अक्षरशः वेड लागलं आहे. याच काळात तीने अश्लील हावभाव करत नृत्य केल्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे गौतमी पाटीलवर जोरदार टीका देखील होत आहे. सोशल मीडियावर गौतमी पाटील हिचे अनेक व्हिडिओ, रील्स शेअर केले जात आहे. तरुणाईला गौतमी पाटील हिने अक्षरशः वेड लावलं आहे. गौतमी पाटीलवर अश्लील हावभाव करून लावणी करत असल्याचा आरोप अनेक कलाकारांनी केला असून तिच्या कार्यक्रमांवर बंदी घाला अशी मागणी केली जात आहे. अनेक लावणी कलाकारांनी गौतमी पाटीलवर नाराजी व्यक्त केली आहे.
गौतमी पाटील हिने केलेल्या अश्लील हावभावावर तीने जाहीर माफी मागितली होती, त्याबाबत व्हिडिओ देखील शेअर केला होता.
गौतमी पाटील हिचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत, गौतमी पाटील हीच्या व्हिडिओवर अक्षरशः लाईक आणि कमेंटचा वर्षाव होत असतो.
मात्र, याच काळात गौतमी पाटीलवर बंदी आणा, तिचे कार्यक्रम होऊ देऊ नका अशी मागणी होऊ लागल्याने गौतमी पाटील हिने टीव्ही 9 मराठीशी बोलतांना स्पष्टच सुनावलं आहे.
यामध्ये गौतमी पाटील म्हणाली, माझ्या कार्यक्रमांना विरोध का केला जातोय मला माहिती नाहीये, माझ्या कार्यक्रमांवर बंदी आणण्याचं काही कारण नाही.
माझ्या नृत्यात कुठेही अश्लीलता नाही, आधी जे झालं त्याबाबद्दल मी माफी मागितली आहे, लोकांना माझ्यावर आणि माझ्या कार्यक्रमांवर प्रेम आहे त्यामुळे माझ्या कार्यक्रमांना गर्दी होत असते,
मला महाराष्ट्राची सपना चौधरी म्हणत असतील तर ती चांगली गोष्ट आहे, कारण सपना चौधरी नाव मोठं आहे, माझ्या कार्यक्रमांमुळे प्रस्थापित अभिनेत्री नाराज असतील असं मला वाटत नाही.
माझ्या पुढील महिन्यापर्यंत तारखा बुक असून लवकर माझा मराठी चित्रपट आणि नवीन लावणी येत आहे असंही गौतमी पाटील हिने सांगितलं आहे.