Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा तुफान डान्स, पण या कारणामुळे महिलांनी फिरवली पाठ

त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,तर राष्ट्र विकास सेनेच्या महिला कार्यकर्त्या त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्या होत्या

Gautami Patil : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तरुणांचा तुफान डान्स, पण या कारणामुळे महिलांनी फिरवली पाठ
gautami patilImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2023 | 9:05 AM

सांगली : प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या (Gautami Patil lavni show) अदाकारांनी सांगलीकर (sangli) घायाळ झाल्याचे काल पाहायला मिळाले. तरुणांची प्रचंड गर्दी कार्यक्रमाला होती, तर महिलांनी कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. प्रथमच कार्यक्रम वादा विना शांततेत झाल्याची जोरात चर्चा सोशल मीडियावर (social media viral video) होती. सांगलीतील जिल्ह्यातील गौतमी पाटीलच्या एका कार्यक्रमात एका इसमाला मृत्यू झाला होतो. त्याचबरोबर गौतमी पाटील पाहण्यासाठी प्रचंड पब्लिक आलं होतं, त्याची राज्यभर चर्चा झाली होती. सोशल मीडियावर अधिक चर्चेत असलेल्या गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला अधिक गर्दी पाहायला मिळते.

विरोध केल्याने पोलीस बंदोबस्त चोख

प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हीच्या अदाकारांनी सांगलीकर पुन्हा घायाळ झाले. मिरज तालुक्यातील नांद्रे येथे गौतमी पाटीलच्या लावणीच्या कार्यक्रमाला तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. तर या कार्यक्रमाकडे महिलांनी पाठ फिरवली असं चित्र पाहायला मिळालं. दरम्यान लावणी उधळून लावण्याचा इशारा राष्ट्र विकास सेनेकडून देण्यात आला होता. मात्र त्यासाठी पोहोचलेल्या राष्ट्र विकास सेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी लावणी पाहण्यासाठी महिला नसल्याचे कारण देत आंदोलन स्थगित केले.

ख्वाजा कबीर बाबा दर्गाह ऊरुसानिमित्त प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन

सांगलीच्या मिरज तालुक्यातील नांद्रे येथील ख्वाजा कबीर बाबा दर्गाह ऊरुसानिमित्त प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या लावणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. आपल्या अदाकारीने गौतमी पाटीलने सांगलीकर रसिकांना घायाळ केले. गौतमी पाटीलच्या लावणी शो पाहण्यासाठी यावेळी हजारोंच्या संख्येने तरुणांनी गर्दी केली होती. एकापेक्षा एक बहारदार असा नृत्याविष्कार यावेळी गौतमी पाटीलने सादर केला, ज्याला तुफान प्रतिसाद मिळाला. तर गौतमी पाटीलचा लावणी शो उधळून लावण्याचा इशारा राष्ट्र विकास सेनेकडून देण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

राष्ट्र विकास सेनेच्या महिला कार्यकर्त्या त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्या होत्या

त्यामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता,तर राष्ट्र विकास सेनेच्या महिला कार्यकर्त्या त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहचल्या होत्या,मात्र सदर कार्यक्रमाला महिला नसल्याने लावणी उधळून लावण्याचे आंदोलन रद्द केलं. तर सांगलीतील हा कार्यक्रम खूप छान झाला, प्रेक्षकांना त्याचा उत्तम आस्वाद घेतला,असं मत व्यक्त करत मागे ज्या काही घटना घडल्या आहेत, त्या जुन्या झाल्या आहेत,असे मत यावेळी गौतमी पाटील हिने व्यक्त केलं.

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.