गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात लाठीमार; अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया काय?

छत्रपती संभाजीनगरातील सिल्लोड शहरातील उत्सवात प्रसिध्द नृत्यांगणा गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात हुल्लबाजी करण्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलीसांना सौम्य लाटीमार केला आहे. दरम्यान, मंत्री अब्दुल सत्तार यांनी या प्रकरणी पहिली प्रतिक्रीया दिली आहे.

गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमात लाठीमार; अब्दुल सत्तार यांची पहिली प्रतिक्रिया काय?
abdul sattar
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 3:38 PM

विनायक डावरुंग, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर | 4 जानेवारी 2024 : सिल्लोड शहरात गेले काही दिवस उत्सव सुरु आहे. काल या उत्सवात प्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या नृत्याच्या कार्यक्रमावेळी काही तरुणांनी धुडघूस घातल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. यावेळी या तरुणांना आवरण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला आहे. या कार्यक्रमात मंत्री अब्दुल सत्तार यांनी तरुणांना जाहीरपणे शिवीगाळ केल्याने वाद निर्माण झाला आहे. या वादावर अब्दुल सत्तार यांनी आता आपली बाजू मांडली आहे. या सोहळ्याला महिलांची संख्या देखील मोठी होती. पोलिसांनी लाठीमार केल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे. आता मंत्री अब्दुल सत्तार यांनी यामागे विरोधकांचे षडयंत्र असल्याचा आरोप केला आहे.

काल सिल्लोड शहरातील उत्सवात प्रसिद्ध लावणी नृत्यांगणा गौतमी पाटील हीच्या नृत्याचाही कार्यक्रम होता. पुण्याचा ऑर्केस्टा देखील होता. यावेळी काही तरुणांकडून हुल्लडबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आपल्या ग्रामीण शैलीत पोलिसांना या तरुणांना चांगला धडा शिकण्याचा आदेश स्टेजवरुनच दिला. या प्रकरणात त्यावरुन वाद निर्माण झाल्याने मंत्री अब्दुस सत्तार यांनी आपल्या वक्तव्याबद्दल खेद व्यक्त केला आहे. परंतू विरोधकांनी असे प्रकार करू नये. सिल्लोड शहराचा उत्सव आणखी काही दिवस चालणार आहे. येथे हजारो अबालवृद्धांची गर्दी होत असते. त्यामुळे महिला आणि लहान मुलांच्या मोठ्या संख्येमुळे हुल्लडबाजांनी राजकारण करु नये. अशा प्रकारे इतरांना त्रास होऊन गैरसोय होईल असे कृत्य करु नये. आपल्या ग्रामीण शैलीतील बोलण्याने कोणाचे मन दुखावले असेल तर मी त्याविषयी दिलगिरी व्यक्त करीत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

या पुढे अशी चुक करु नये

सिल्लोड शहरातील कार्यक्रमाला 60 ते 65 जमाव उपस्थित होता. या परिस्थितीत विरोधी पक्षाचे 5 ते 25 हुल्लडबाज या कार्यक्रम उधळून लावण्यासाठी आले होते. त्यांना कंट्रोल करण्यासाठी आमच्या ग्रामीण शैलीत माझ्या तोंडून शब्द निघाले. येथे वीस हजार महिला आणि लहान मुलांचा समावेश होता. अशा परिस्थितीत विरोध पक्षाने लहान मुले आणि महिलांची गर्दी असताना पुढे भविष्यात अशी हुल्लडबाजी करू नये अशी मी त्यांना हातजोडून विनंती करीत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हटले आहे.

Non Stop LIVE Update
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं
शरद पवारांच्या पत्नीला टेक्स्टाईल पार्कमध्ये जाण्यापासून रोखलं.
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य
'ही माझी शेवटची निवडणूक, माझा पुढचा वारसदार..', केसरकराचं मोठं वक्तव्य.
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप
'घड्याळाचे बटण दाबणार...',राष्ट्रवादीची जाहीरात वादात; आयोगाचा आक्षेप.
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट
..म्हणून विलासरावांनी मंत्री केल नाही; चित्रा वाघांकडून व्हिडीओ ट्विट.
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?
जेपी नड्डा आणि खर्गेंना निवडणूक आयोगाची नोटीस, कारण नेमकं काय?.
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?
'शरद पवारांना मी सोडायला नको होतं...', अजित पवार नेमकं काय म्हणाले?.
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा
राणांच्या सभेत राडा; शिवीगाळ, खुर्च्या फेकून मारल्या, अल्लाहच्या घोषणा.
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी
भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध अन् महायुतीत अजित पवारांची कोंडी.
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा
..तेव्हा गमंत केली आता नको, अजितदादांचा बारामतीकरांना विनंती वजा इशारा.
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली
दापोलीत दादागिरीवरून हल्लाबोल, बर्फावर झोपवण्याचं आव्हान; कोणात जुंपली.