Central and Western Railway : मध्य रेल्वे मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज; पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करावीत, महाव्यवस्थापकांचे अधिकाऱ्यांना निर्देश

आगामी पावसाळ्यात सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडे छाटणे, खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर इ. तयारी मध्य रेल्वेने पावसाळ्यासाठी केली आहे.

Central and Western Railway : मध्य रेल्वे मान्सूनच्या तयारीसाठी सज्ज; पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करावीत, महाव्यवस्थापकांचे अधिकाऱ्यांना निर्देश
प्रातिनिधिक छायाचित्र.Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 8:47 PM

मुंबई : आता एप्रिल महिना संपत असून मे महिना सुरू होणार आहे. मे महिन्याच्या मध्यावधीत राज्यातील बऱ्याच भागात अवकाळी पावसाची हजेरी असते. तर त्यांनंतर जुनमध्ये पावसालाच (Rain) सुरूवात होते. त्यावेळी पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या (Central and Western Railway) दळणवळणात कोणताही अडथळा नको म्हणून महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मान्सूनच्या (Monsoon) तयारीचा आढावा घेतला. यावेळी प्रधान विभागप्रमुख आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकही यावेळी उपस्थित होते. मुंबई विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधित रेल्वेने केलेल्या पावसाळ्याच्या तयारीचे सादरीकरण केले. यावेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना लाहोटी म्हणाले की, पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करावीत. सर्व असुरक्षित ठिकाणी 24×7 देखरेख ठेवण्याची आणि राज्य सरकार (State Government) आणि महानगरपालिका यांच्याशी जवळीक साधून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी

यावेळी आगामी पावसाळ्यात सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडे छाटणे, खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर इ. तयारी मध्य रेल्वेने पावसाळ्यासाठी केली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने आपल्या उपनगरीय नेटवर्कवर तसेच घाटांवर मान्सूनच्या खबरदारीच्या उपाययोजना पूर्ण केल्या आहेत. अखंडित सेवा सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई उपनगरीय नेटवर्कवर 19 ठिकाणी अधिक उच्च वॅटेज पंप

मध्य रेल्वेने अतिवृष्टीदरम्यान पाणी साचणारी 19 संवेदनशील ठिकाणे निवडण्यात आली आहेत. त्या ठिकाणी 83 पंप देण्याची योजना आहे. यावर्षी एकूण १४९ पंप दिले जाणार आहेत. त्यापैकी रेल्वे 118 पंप आणि बृहन्मुंबई महानगरपालिका उर्वरित 31 पंप पुरवणार आहे. यावर्षी पूर येऊ नये म्हणून पूरप्रवण ठिकाणी पंपांची क्षमता आणि पंपांची संख्या वाढवण्यात आली. यासाठी मेन लाईनवर मस्जीद, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळक नगर ही ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत.

नाल्यांचे गाळ काढणे

मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागातील 59 किलोमीटर नाल्यांचे गाळ काढणे आणि साफ करणे. सध्या आणखी 59 किलोमीटर नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे.

कल्व्हर्टची साफसफाई

मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागांवरील 38 कल्व्हर्ट्स स्वच्छ केले आहेत. सध्या आणखी 45 कल्व्हर्ट्सच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे.

झाडांची छाटणी

7893 वेगवेगळ्या ठिकाणी झाडे कापण्याचे व छाटण्याचे काम हाती घेण्यात आले असून काम प्रगतीपथावर आहे.

गाळ काढणे

मध्य रेल्वेने मुख्य आणि हार्बर मार्गावरील साफसफाई आणि 1.75 लाख घनमीटर गाळ काढण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

घाट विभाग – बोल्डर स्कॅनिंग आणि ड्रॉपिंग

घाट विभागात 334 नग स्कॅनिंग आणि ड्रॉपिंगचे काम हाती घेण्यात आले असून आणखी 260 नगांचे काम प्रगतीपथावर आहे. याशिवाय घाटात बोल्डर्स पडू नयेत यासाठी बोल्डर जाळी आणि बोगदा पोर्टलचे कामही हाती घेण्यात आले आहे.

जलमार्गाची क्षमता वाढवणे

कुर्ला आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान सूक्ष्म बोगद्याद्वारे पाईप पुशिंग, 70 मीटर लांबीच्या 1.8 मीटर व्यासाच्या दोन पाइपलाइन पुश करण्यात आल्या आहेत ज्यामुळे पुलाची क्षमता वाढली आहे. त्याचप्रमाणे, टिळक नगर ब्रिज येथे जलमार्ग वाढवण्यात आला असून टिळक नगर स्थानकावर आरसीसी बॉक्सेस टाकून जलमार्गाची क्षमता वाढवण्यासाठी 4.9 मीटर अतिरिक्त ओपनिंग तयार केले आहे. तसेच, पनवेल आणि कर्जत दरम्यानच्या सध्याच्या पुलाला लागून असलेल्या पुलाच्या जलमार्गात आरसीसी बॉक्स टाकून सुधारणा केल्याने जलमार्गाची क्षमता वाढली आहे. पाण्याचा प्रवाह वाढवण्यासाठी बदलापूर ते वांगणी दरम्यान 1.8 मीटर व्यासाचा पाइप टाकण्यात आला आहे. मध्य रेल्वेने महत्त्वाच्या वालधुनी पुलाच्या पीएसबी स्लॅबसह स्टील गर्डर बदलले आहे.

महत्त्वाची कामे पूर्ण करण्याचे लक्ष्य

• या पावसाळ्यात केलेल्या कामाच्या परिणामकारकतेसाठी शीव -कुर्ला परिसरातील 3 ठिकाणे निरीक्षणाखाली असतील. • राहुल नगर नाला, चुनाभट्टी येथील पंपिंगची व्यवस्था या पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यात येईल. • कर्वे नगर नाला सुधारणेचे काम मुंबई महानगर पालिका द्वारे केले जाणार आहे आणि त्याचा खर्च अजमेरा बिल्डर्सकडून वसूल केला जाणार आहे. • प्रियदर्शनी, चुनाभट्टी येथे जलवाहिनीखाली साठलेले काँक्रीट साफ करण्याच्या कामासाठी सल्लागाराची नियुक्ती करणे.

महत्वाची चालू असलेली कामे

• विद्याविहार, कर्वे नगर, संतोषी माता नाला येथील नाल्यांचे रुंदीकरण. • विद्याविहार, कर्वे नगर, संतोषी माता नाला येथील नाल्यांचे रुंदीकरण. • चुनाभट्टी येथे मुंबई महानगर पालिका (एमसीजीएम) नाल्याला नव्याने बांधलेल्या रेल्वे कल्व्हर्टच्या जोडणीचे काम. • घाट विभागात 145 असुरक्षित ठिकाणी सीसीटीव्ही आणि फ्लड लाइट बसवणे.

महत्वाची कामे पूर्ण

• मशीद, सँडहर्स्ट रोड, हिंदमाता- दादर- परळ परिसरात सूक्ष्म बोगद्याची कामे पूर्ण.

इतर महत्वाची कामे पूर्ण

• मस्जिद, भायखळा, माटुंगा आणि शीव -कुर्ला भागात फ्लड गेट्स बसवणे. • एमएसएफ जवान + आरपीएफ कर्मचारी दृत प्रतिसाद दल म्हणून राहतील. • एनडीआरएफच्या सहकार्याने आरपीएफ फ्लड रेस्क्यू टीम तयार करण्यात आली. • गर्दीचे गंभीर पादचारी पूल निवडून तेथे गर्दी नियंत्रणासाठी कर्मचारी तैनात. • बोगदा आणि घाटातील सुधारित दळणवळण व्यवस्था. (लीकी केबल आणि VHF) • असुरक्षित ठिकाणी अतिरिक्त कायम चौकीदार

24X7 नियंत्रण कक्ष

मध्य रेल्वे नियंत्रण कार्यालय, चोवीस तास कार्यरत असून हवामान विभाग, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि पूरप्रवण भागात नियुक्त कर्मचार्‍यांशी सतत संपर्कात आणि सतत अपडेट ठेवण्यासाठी कायम संपर्क ठेवेल.

इतर बातम्या :

Gunratna Sadavarte : जेलमधून बाहेर आल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंनी मानले भाजप नेत्यांचे आभार, म्हणाले माझी हत्या झाली तर…

Jignesh Mevani : आमदार जिग्नेश मेवाणींवरील कारवाई चुकीची, खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या, काँग्रेसची राज्यपलांकडे मागणी

Kalyan Crime : कल्याणमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.