घरात अचानक पडलेल्या ‘त्या’ खड्ड्याबाबत भूगर्भ अभ्यासकांनी वर्तवला धक्कादाक अंदाज
चंद्रपूर शहरामध्ये एका घराच अचानाक पडलेल्या खड्ड्याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे. हा खड्डा कशामुळे पडला? मोठा सवाल सर्वांना पडला होता. अशातच याबाबत भूगर्भ अभ्यासकांनी धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.
चंद्रपूर शहरामध्ये महाकाली कॉलरी भागातल्या आमटे लेआउट या महसुली जागेवर शिवणकर यांच्या घरात 20 फुटी खड्डा फडला होता. शिवणकर बाहेर गावी गेले होते आले तर त्यांच्या घरामध्ये ह खड्डा पडला होता. घरातील महिलाही या खड्ड्यात पडलेली. त्यांना शिडी लावून बाहेर काढण्यात आलं होतं. हा खड्डा नेमका कशामुळे पडलेला याबाबत भूगर्भ अभ्यासकांनी धक्कादायक अंदाज वर्तवला आहे.
चंद्रपूर शहरातील रय्यतवारी कॉलरी भागातील घरात पडलेला वीस फुटी खड्डा म्हणजे धोक्याची घंटा असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. आमटे लेआऊट भागातील खचलेल्या घराच्या आसपासच्या दहा ते बारा घरांना वेस्टर्न कोल फील्ड लिमिटेड व मनपा प्रशासनाने नोटीस दिली आहे. या खोल खड्ड्यात अचानक पडलेल्या संगीता शिवणकर यांना या घटनेने जबर धक्का बसलाय. घरात त्यांच्या आसपास खेळणारी त्यांची मुले या घटनेत सुदैवाने बचावली.
चंद्रपूर शहर व जिल्ह्यात मोठ्या संख्येत कोळसा खाणी असताना एकीकडे अतिवृष्टी व दुसरीकडे खाणी योग्य रीतीने बूजवल्या न गेल्याने असे प्रकार घडल्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केलाय. महाकाली, रय्यतवारी, लालपेठ, दुर्गापुर या सर्व कोळसा खाणी चंद्रपूर शहरातच आहेत. विशेष म्हणजे या सर्व खाणी जुन्या आणि भूमिगत आहेत. अशा स्थितीत अतिवृष्टी व खाणी बुजवण्यातील अनियमितता यामुळे संपूर्ण शहर व विशेषतः कामगार वस्तीचा बहुतांश भाग धोकादायक क्षेत्रात असल्याचे चित्र आहे.
दरम्यान या घटनास्थळाला स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांनी भेट दिली. पीडित कुटुंबाला सुरक्षित स्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी दिले. वेस्टर्न कोल फिल्ड्स लिमिटेडच्या तज्ञ एजन्सी मार्फत या भागातील भूगर्भीय बदलाचा अहवाल तयार करण्यासाठीच्या सूचनाही त्यांनी दिल्या आहेत.