अनिल देशमुख यांना कोणत्या पक्षात जायचं होतं? गिरीश महाजन यांचा गौप्यस्फोट, राजकीय वर्तुळात खळबळ
आपली चौकशी सुरू आहे. आपण जामीनावर आहेत. आपल्याकडे जे पेपर आणि पुरावे आहेत ते ईडीकडे ठेवा आहे असा सल्लाही गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना दिला आहे.
नाशिक : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) हे मनी लाँड्रिंग प्रकरणात तुरुंगात असतांना त्यांना भाजपची ( BJP ) ऑफर आली होती तेव्हा जर ऑफर स्वीकारली असती तर महाविकास आघाडी सरकार आधीच कोसळलं असतं पण मी ती स्वीकारली नाही कायद्यावर विश्वास ठेवला असा खळबळजनक दावा अनिल देशमुख यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. मात्र त्यानंतर भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन ( Girish Mahajan ) यांनी अनिल देशमुख यांनाच भाजपमध्ये यायचे होते असा गौप्यस्फोट केल्यानं राजकीय वर्तुळात ( Political News ) खळबळ उडाली आहे.
भाजपचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांच्याबाबत गौप्यस्फोट केला आहे. अनिल देशमुख यांना कुठलाही प्रस्ताव दिला नव्हता, उलट अनिल देशमुख यांनीच भाजपमध्ये येण्यासाठी प्रस्ताव दिला होता.
अनिल देशमुख यांनी निवडणूक होण्यापूर्वी भाजपमध्ये येण्यासाठी दोनदा प्रस्ताव दिला होता. पण सुदैवाने ते राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडून आले. आता झालेल्या गोष्टीवर त्यांनी बोलू नये.
आपली चौकशी सुरू आहे. आपण जामीनावर आहेत. आपल्याकडे जे पेपर आणि पुरावे आहेत ते ईडीकडे ठेवा आहे असा सल्लाही गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांना दिला आहे.
अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतांना गिरीश महाजन यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून नेमका दावा कुणाचा खरा असा सवालही उपस्थित झाला आहे.
अनिल देशमुख यांनी मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक झाली होती. 13 महीने जवळपास अनिल देशमुख तुरुंगात होते. नुकतीच त्यांची जामिनावर सुटका झाली आहे. त्याच दरम्यान त्यांना ही ऑफर आल्याचा दावा त्यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात म्हंटलं होतं. तुरुंगात असतांना ऑफर आली होती मी ती नाकारत तडतोड केली नाही. तेव्हा ती ऑफर स्वीकारली असती तर सरकार अडीच वर्षापूर्वीच पडले असते. पण माझा न्यायावर विश्वास होता म्हणून बाहेर येण्याची वाट पाहत होतो.
त्यावरच गिरीश महाजन यांनी अनिल देशमुख यांच्यावर पलटवार केला आहे. त्यावरून आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यामुळे येत्या काळात अनिल देशमुख महाजन यांच्या दाव्यावर काय बोलतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. एकूणच देशमुख विरुद्ध महाजन असा नवा सामना सुरू झाला आहे.