भाजपचे ‘संकटमोचक’ अपघातग्रस्ताच्या मदतीला, गिरीश महाजनांमुळे बाईकस्वारावर वेळीच उपचार
गिरीश महाजन यांनी गाडी थांबवत जखमी बाईकस्वाराला आपल्या गाडीने पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
जळगाव : भाजपचे संकटमोचक नेते म्हणून ओळखले जाणारे माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रस्त्यावरील अपघातग्रस्त जखमीला तात्काळ स्वतःच्या गाडीतून रुग्णालयात दाखल केले. महाजनांनी आपण संकटमोचक आणि आरोग्यदूत असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले. (Girish Mahajan helps Bike accident victim in Jalgaon)
जळगावातील पाचोरा-वरखेडी मार्गावर गिरीश महाजन स्वतःच्या गाडीने प्रवास करत होते. त्यावेळी एक बाईकस्वार रस्त्याने भरधाव वेगात जात होता. मात्र खड्डा चुकवण्याच्या नादात त्याचा तोल गेला आणि रस्त्यावर पडला.
अपघातात गंभीर जखमी झाल्यामुळे तो रक्तबंबाळ झाला होता. यावेळी गिरीश महाजन यांनी तात्काळ गाडी थांबवत जखमी बाईकस्वाराला स्वतः आपल्या गाडीत बसवले. त्यानंतर पाचोरा येथील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले.
संबंधित बाईकस्वार हा वरखेडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी बी. सी. पवार असल्याची माहिती आहे. जखमीवर योग्य वेळी उपचार सुरु करण्यात आल्याने उपस्थितांनी आमदार गिरीश महाजन यांचे कौतुक केले.
आमदार गिरीश महाजन यांच्या मदतीला त्याच रस्त्याने मागून येत असलेले पिंपळगाव हरेश्वर येथील शिवसैनिक देवीदास पाटील आणि रवींद्र गीते यांनी सहकार्य केले, त्यामुळे एकप्रकारे भाजप आणि शिवसेनेने एकत्रित मदत केल्याची भावना व्यक्त झाली.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा, रिक्षाचालकाला भररस्त्यात थुंकी पुसायला लावलीhttps://t.co/LTAdpOgjSY#kolhapur #antispitmovement
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 27, 2020
संबंधित बातम्या –
हात धुवा, सॅनिटायझर लावा असं बोंबलून चालणार नाही, खांद्याला खांदा लावून काम करा : गिरीश महाजन
(Girish Mahajan helps Bike accident victim in Jalgaon)